Skip to main content

विचार

भगवद्गीता: मुख्य देवतेला कसे ओळखावे?

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 09/03/2014 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
येsप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता:I तेsपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् I अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च l न तु मामभिजानन्ति तत्वेनातश्च्यवन्ति ते l (भगवद्गीता ६.२३ व २४) अर्थ: भगवंत म्हणतात, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुत: माझीच पूजा करतात. परंतु त्यांची ही पूजा चुकीच्या मार्गाने केलेली असते. खरं, म्हणजे मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वत: जाणत नाही त्यांचे पतन होते.

साहिर

लेखक रामदास यांनी रविवार, 09/03/2014 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
कवि माझा मित्र होता. मित्राच्या शब्दावर जीव टांगून ठेवायची आपली नेहेमीच तयारी होती. तो म्हणाला " मेरी वफ़ा का शौक़ से तू इम्तहान ले "* मी माझ्या प्रार्थनेत ही ओळ उधार घेतली आणि विधात्याने पण मान्य केली. आता झालेल्या परवडीची दाद मागायला मित्र पण हाताशी नाही. कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात , त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ? * साहिरच्या कविता आणि गाणी या संबंधी या निमीत्ते काही चर्चा व्हावी . *संजोपरावांचे आभार.

ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास

लेखक माहितगार यांनी रविवार, 09/03/2014 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्ती, कुटूंब, व्यवसाय, ते असंख्य सामाजिक, जातीय, धार्मीक, राजकीय, केवळ माझच (आमचंच खर) म्हणणार्‍या टोकाच्या भूमीका; व्यक्तीगत आणि समुहांच्या हिताची गणित अनेक संघर्षांना टोकाला नेत असतात. half filled glass ग्लास रिकामाच आहे अथवा भरलेलाच आहे या ह्ट्टांची टोकांची लोकानुनयाने मांडणी करत टोकाची नेतृत्व पुढे येतात.

घर खरेदी-विक्री व्यवहाराविषयी मदत हवी आहे

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी शनिवार, 08/03/2014 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, शक्यतो मी "मदत हवी आहे" असे लेख लिहित नाही पण माझ्या एका परिचितासाठी मदत हवी आहे. त्याचे झाले असे की त्यांनी एके ठिकाणी विकत घ्यायला एक घर बघितले.ते त्यांना आवडले आणि मागच्या शनीवारी त्यांनी त्यासाठीची टोकन रक्कम घरमालकाला दिली.२०% स्वतःचे पैसे आणि ८०% कर्ज असे नेहमीचे गणित होतेच.त्या २०% साठी त्यांच्या पालकांकडून आणि सासुरवाडीकडून काही पैसे उसने घ्यायचा त्यांचा इरादा होता.

जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/03/2014 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
एक रेषा असते जी जनुकांनी बद्ध असते. त्या किमान बंधनांपलीकडे तीने मला अमर्याद स्वातंत्र्य दिलेल असतं. पण या स्वातंत्र्यावरही बंधन येत असतात. काही मी माझी घालून घेतलेली असतात, काही काळ आणि परीस्थितीने येणारी असतात, काही कुटूंबातील, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील घटकांनी कधी कळत, कधी नकळत घातलेली असतात.

"खरा"सावरकर(भाषण) -श्री.शेषराव मोरे..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/03/2014 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २ फेब्रुवारी २०१४ ... ठिकाण:- सिंहगड रोड..सनसिटी जवळील एक ग्राऊंड.. वेळः-संध्याकाळी साडेसहाची, आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे... मोरे सरांचं सावरकर या विषयावरील भाषण. माझ्या सारख्यासाठी हा क्षण आयुष्यातील मोलाच्या क्षणांपैकी एक. का म्हणता? आमचे सावरकर प्रेम? = नाही त्यांच्या बुद्धीवादाचे वेड = अजिबात नाही मग उरलं काय? त्यांचा हिंदुत्ववाद ? = तत्वतः होय . अता तत्वतः होय.. असे का? याचे कारण सावरकरांनी हिंदुत्ववाद मांडला तसा शिवाजी सारख्या काही माणसांनी तो जगला जागवला आणि आमच्या पर्यंत पोहोचेल एव्हढी ऊर्जाही निर्माण करून ठेवली.

मुक्तविहारींची भाषणभरारी

लेखक पैसा यांनी मंगळवार, 04/03/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्‍या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्‍या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते. डोंबिवलीची ब्राह्मण सभा बरीच जुनी. १९३५ सालची स्थापना झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते.

बौद्धिक कृष्णविवर

लेखक माहितगार यांनी शनिवार, 01/03/2014 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
बौद्धिक कृष्णविवर: लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते. बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४] युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात.

शिवरात्र जागवोनी...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 28/02/2014 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या दिवसाच्या निमित्ताने! नेहमी कामानिमितानी शिवरात्रीला आणि श्रावणातही, निरनिराळ्या शंकराच्या देवळात जाणे होते. भक्त मंडळी शंकराच्या गाभार्‍याला जी काहि "कळा" आणवतात. ते साहून हे लेखन घडत आहे. मी अनेकदा अनेक देवळात देवळांच्या काम पहाणार्‍या मंडळींना या बद्दल सूचना आणि सहकार्य करायचा प्रयत्न केला आहे. पण हाती आले फक्त दारुण अपयश. मंदिरवाल्यांना "ग्राहक" वाढतील या दृष्टीनी काहि सुचवलं तर तेच हवं असतं..तीथे आंम्ही स्वच्छतेचा नारा लावलेला कुणा ऐकू जावा? सकाळी देऊळ उघडल्यापासून भक्त मंडळी शंकराचा जो काही महा-देव करतात तो पहाण्यासारखा असतो!