Skip to main content

विचार

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 25/03/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

शिद्दत

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 24/03/2014 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात सावरकर जयंती होऊन गेली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपलं आयुष्य समर्पित केलेल्या असंख्य सेनांनीपैकी हा एक सेनानी, विनायक दामोदर सावरकर. एक युगपुरुषच म्हणावा लागेल; एक देवाचा अवतार. असीम देशभक्ती आणि ध्येयाचा पुतळा. अंदमान मधील तुरुंगात असताना त्यांनी जे हाल सोसले, ते वाचतानाही अंगावर काटा येतो. त्यांनी ते प्रत्यक्ष कसे सोसले असतील त्यांनाच ठाऊक. असेच आतोनात हाल भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक क्रांतिकारकाने कमी अधिक प्रमाणात सोसले होते.

कॅलिडोस्कोप ३

लेखक kurlekaar यांनी शनिवार, 22/03/2014 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
बेगम अख्तर “हमरी अटरियापे आओ सांवरिया, देखा देखी बलम हो जाये आओ साजन तुम हमरे द्वारे, सारा झगडा खतम हो जाये” ठुमरी “ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया” गझल पंकज मलिक. सी एच आत्मा व सेहगल ही मंडळी आमच्या आधीच्या पिढीतली. बेगम अख्तर देखिल त्याच पिढीतली. या पुरुष मंडळींच्या आवाजातला दर्दीला भारदस्तपणा अजून ऐकायला बरं वाटत असलं तरी एका दृष्टीने पाह्यला गेलं तर ही पुरुष गायक मंडळी किंचितशी कालबाह्य झालीयत, कारण नंतर तलत मेहमूद, गुलाम अली, भूपिंदर, जगजीत सिंग यांची inning सुरु झाली. तसं बेगम अख्तरचं नाहीं.

विज्ञानाच्या चष्म्यातून जाती

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 21/03/2014 10:35 या दिवशी प्रकाशित केले.

तुमचे पूर्वज किती ?

स्वत:च्या जातीविषयी अभिमान हे सर्व भारतीयांचे समान लक्षण आहे . आपल्या पूर्वजांविषयीचा अभिमान आणि मग त्यातून उद्भवणारा स्व जातीविषयक अभिमान मग त्यातूनच उगवणारा इतर जाती विषयीचा तुच्छतावाद हे भारतीय समाजाचे आणि परिणामि इथल्या अनेक धार्मिक , सामाजिक आणिक राजकीय विचारधारांचे प्रमुख अंग आहे . आनुवांशिकता , डी एन ए , असे विज्ञान सदृश शब्द वापरून या पुरातन मानसिकतेचे समर्थन केले जाते . प्रस्तुत लेखात आपण विज्ञानाच्या चष्म्यातून जातींकडे पहायचे आहे . चला तुमच्या आराम खुर्चीत जरा रेलून बसा .हातात एक गरम कॉफीचा वाफ़ाळता कप असू द्या . आपण मेंदूचा व्यायाम करणार आहोत .

मुक्काम व पोष्ट वाडे- २

लेखक kurlekaar यांनी गुरुवार, 20/03/2014 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
- मु. पो. वाडे ४ –लायब्ररी तेंव्हा कोंकणात कांही मोजक्याच गांवांत हायस्कुल असायचं. हायस्कुल असलेलं गांव प्रगत समजलं जायचं. वाड्याला तेंव्हा हायस्कुल होतं एवढंच आठवतंय. मी स्वतः तेंव्हा मराठी शाळेत म्हणजे नगरपालिकेच्या शाळेत बहुधा असणार आणि तेंव्हा हायस्कुल कडे पाहणं म्हणजे हायस्कुलवाल्यांनी कॉलेज कडे पाहण्यासारखं होतं. गेल्या वर्षी पाहिली ती हायस्कुल ची इमारत मात्र गोरी गोमटी-मध्यमवर्गीय वाटली—almost माझ्या लहानपणी पार्ले किंवा गिरगावातली एखादी शाळा असावी तशी. वाडयात शिक्षणाचं वारं बहुधा स्थानिक ब्राह्मण वर्गाकडून आलं व ते बरीच वर्षे त्याच वर्गाने टिकवुन धरलं.

नरेंद्र मोदींच्या रुपाने भाजपचे 'ओबिसी' राजकारण.

लेखक नानासाहेब नेफळे यांनी गुरुवार, 20/03/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ह्यांचा सध्या दणक्यात प्रचार चालू आहे. मोदीँना विकासपुरुष या टॅगखाली प्रोजेक्ट केले जात आहे. ज्या प्रमाणे त्यांनी गुजरातचा विकास केला त्याप्रमाणे ते भारताचा विकास करणार आहेत अशी आश्वासनांची खैरात टीव्ही ,सोशल मिडीया, रेडीओवर सतत करण्यात येत आहे .परंतु या विकासपुरुषाच्या प्रचारामागे भाजपची जातीय गणिते चालू आहेत, ज्याचा लेखाजोखा माध्यमं जनतेपर्यंत पोचवत नाही आहेत. आज पर्यंत भाजपाचे जे राजकारण राहीले आहे ते शेटजी भटजी या संज्ञेने ओळखले जाते.

अथ:वांगे पुराण

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 20/03/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
अथ: वांगे पुराण ७-८ वर्षांपूर्वी मामे बहिणीच्या लग्नात भंडाऱ्याला गेलो होतो. सीमांतपूजेच्या दिवशी रात्री भरपूर तेल असलेलीजहाल वांग्याची भाजी ताटात होती. एवढा जबरदस्त झणका होता कि जीभे बरोबर मेंदू ही सी सी करू लागला. नंतर कळले पाहुणे मंडळी पुणे, मुंबई, दिल्लीची असल्यामुळे तिखट थोड कमीच टाकल होत. वांग्यांना हिंदीत ‘थालीचे बैंगन ही म्हणतात वांग्याच्या भाजी शिवाय कुठलीही थाली पूर्ण होत नाही.

क्रिकेट आणि मी

लेखक kurlekaar यांनी मंगळवार, 18/03/2014 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट आणि मी क्रिकेट चं माझं वेड अगदी लहानपणापासून -म्हणजे चौथी पांचवी पासूनचं. तेंव्हा तो खेळ देखिल कळायचा नाहीं व इंग्रजीतील commentary सुद्धा. पण विजय हजारे खेळायला आला की मी रेडीओ जवळ बसुन राह्यचो. तेंव्हाची audio technology सुद्धा फारशी प्रगत नव्हती. फलंदाजाने फटका मारला की वाऱ्याची झुळुक यावी तशीच एक disturbance ची wave रेडीओवर यायची.पण तो एक चौकार होता का एकेरी वा दुहेरी धावा होत्या ते कळायचं नाही.

पापभीरू

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 17/03/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता.

दिल्लीची होळी -सल्तनत काळची- अमीर खुसरोच्या लेखणीतून

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 16/03/2014 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुद्राराक्षस या नाटकात मदनोत्सव उल्लेख आहे. वसंत ऋतूत सुंदर स्त्रिया [सर्व स्त्रिया स्वत:ला सुंदरच समजतात] आपल्या प्रेमी वर आम्र मंजरी फेकायच्या). कादंबरी या उपन्यास मध्ये कामदेवाच्या मंदिराचा उल्लेख आहे आणि पूजा करण्याचे वर्णन ही आहे. १३व्या शतकातल्या होळीचे [दिल्ली सल्तनत] अमीर खुसरोने सुन्दर वर्णन केले आहे. आज रंग है ऐ माँ रंग है, मोरे महबूब के घर रंग है। दैया री मोहे भिजोया री शाह निजाम के रंग में कपडे रंगने से कुछ ना होत है या रंग में मने तन को डुबाया री दैया री मोहे भिजोया री शाह निजाम के रंग में। ... ‘कपड्यांवर रंग टाकल्या ने काही होत नाही.