Skip to main content

विचार

फ़्यंड्री...!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 26/02/2014 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे.

एक झुंज तणावाशी!

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/02/2014 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून चालत असताना एक भिंतीवर चिटकवलेली जाहिरात नजरेस पडली. ‘स्ट्रेस मॅनेजमेंट कन्सल्टंट’ची. तसा रोजच्या संभाषणांमध्ये असंख्य वेळा आपल्या बोलण्यात हा शब्द येतो, ‘स्ट्रेस’, पण त्या संकल्पनेवर हवा तेवढा स्ट्रेस देत नसावं कुणी. म्हणूनच कदाचित अशा कन्सल्टंट्सचा जन्म होतो. पण मग हे कन्सल्टंट्स काय सांगत असावेत? असं तर नक्कीच काही नसेल जे आपल्याला ठाऊक नाही. हं, पण आपण आत्मसात केलेलं नाही असं बरंच काही असेल. असे विचार मनात चालू होते. मुळात ताण किंवा स्ट्रेस हा एखाद्या आजारासारखा असतो. जसा एखाद्या विषाणूचा प्रतिकार करण्यास माणसाचं शरीर असमर्थ ठरतं आणि मग आजार उद्भवतो.

तसा मी... असा मी, आता मी - १

लेखक रमताराम यांनी मंगळवार, 25/02/2014 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रास्ताविक: काही काळापूर्वी एक जुना मित्र भेटला. तो नि मी पूर्वी बरोबर असताना जसा 'मी' होतो तोच त्याच्या डोळ्यासमोर होता हे उघड होते. त्यावेळी माझी शारीरिक, मानसिक स्थिती, माझी रहाणी, माझ्या आवडीनिवडी, माझी राजकीय सामाजिक मते इ. बाबत आता मी बराच बदलून गेलो आहे याची जाणीव करून देणारी ती भेट होती. मग सहज विचार करू लागलो की हे जे बदल एका व्यक्तीमधे होतात, 'असा मी' चा 'तसा मी' होतो तो नक्की कसा? काय काय घटक यावर परिणाम करतात. यावर आमचे ज्येष्ठ मित्रांशी थोडे बोलणे झाले. त्यांनी याबाबत सरळ धागाच टाकावा असे सुचवले.

बाबा रामदेव यांचा उदय, एक आकलन

लेखक Atul Thakur यांनी सोमवार, 24/02/2014 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा रामदेव हे नाव आता सर्वतोमुखी झालेले आहे. योगापासुन सुरुवात करुन त्यांनी राजकारणात किंवा समाजकारणात म्हणुया प्रवेश केलेला आहे. मात्र हा लेख त्यांच्या राजकारणाचा किंवा समाजकारणाचा विचार करणारा नाही. त्यांच्या उदयामागची कारणे शोधणे हा या लेखाचा उद्देश आहे. आणि ही कारणे सामाजिक आणि योगिक दृष्टीकोनातुन तपासुन पाहण्याचा मानस आहे. रामदेवांचा उदयामागची कारणे शोधणे इतके महत्वाचे आहे काय? तर याचे उत्तर हे की अनेक योगसंस्था रामदेवांच्या अगोदरपासुन कार्यरत आहेत. मग रामदेवांनाच एवढी अभूतपूर्व प्रसिद्धी मिळण्याचे कारण काय? आपल्या समाजात असे काय बदल झालेत कि रामदेवांनाच लोकांनी इतकं डोक्यावर घ्यावं?

...आपुले मरण पाहिले म्या डोळा…....!!!!!!

लेखक विनोद१८ यांनी बुधवार, 19/02/2014 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, नुकताच माझ्या वाचनात दै. लोकसत्ता मधला एक अतिशय सुन्दर असा लेख आला. डॉ. ऋजुता पाटील-कुशलकर यानी आपले जीवघेण्या आजारातील अनुभव कथन केले आहे, त्याचा दर्जा उच्च आहे, विचार करायला लावणारा आहे म्हणुनच मिपावर प्रत्येकाने तो वाचावा असा आग्रह आहे. त्याची लिन्क खाली दिली आहे. http://www.loksatta.com/chaturang-news/the-deathbed-experience-373284/4… तो वाचुन प्रतिक्रिया काय द्यावी हे सुचत नाही, फक्त डॉ.

माझी मैत्रीण

लेखक दिव्यश्री यांनी मंगळवार, 18/02/2014 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
कोणताही पूर्वग्रह न ठेवता हा लेख वाचावा .मी ५० /१०० प्रतिसादांसाठी (ट्यार्पी) लिहिलेले नाही.यामध्ये कोणतीही झैरात/झायारात/जाहिरात करण्याचा हेतू /उद्देश नाही. बाकी आपल्या अनुभवांचे अर्थातच स्वागत आहे. माझी मैत्रीण ,जिने मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट आणि कठीण प्रसंगात मला साथ दिली ,आधार दिला, मला समजून घेतेलं आणि माझी खूप काळजी घेतली ती आमच्या प्यांटवाल्यांची आई ,अर्थातच माझ्या सासूबाई. :) अतिशय प्रेमळ ,नेहमी गोड बोलणाऱ्या ,कोणालाही कधीही न दुखावणार्या अशा माझ्या सासूबाई, सौ.सुमती.

लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 18/02/2014 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
१९ फेब्रुवारी हि आपणा सर्वांना प्रीय लोकोत्तर श्री छत्रपती शिवरायांची जयंती आहे. या निमीत्ताने मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून आणि मिपा. धाग्याच्या साहाय्यातून साकार झालेल्या अनुवाद प्रयास (अनुवाद (पर्याय १ला)) आपणा समोर सादर करत आहे. *मूळ इंग्रजी लेख : IS SHIVAJI NOT A NATIONAL HERO ??

फायदा घ्या बजेटचा

लेखक आयुर्हित यांनी मंगळवार, 18/02/2014 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून फ्रीज, टीव्ही, देशी बनावटीचे मोबाईल, छोट्या कार स्वस्त होणार आहेत. या अर्थसंकल्पात चिदंबरम यांनी अबकारी दर १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली तसेच छोट्या वाहनांसाठीचा अबकारी कर १२ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.