Skip to main content

विचार

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग दोन - टूथपेस्ट आणि ब्रशिंग

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 26/06/2014 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लहानांचे दंतोपचार : भाग दोन दात स्वच्छतेची घरगुती सफ़ाईची उपकरणे ... टूथपेस्ट आणि ब्रशिंग या उपकरणांचे साधारणपणे दोन प्रकार असतात. यांत्रिक आणि रासायनिक. यांत्रिक म्हणजे टूथब्रश , फ़्लॉस आणि इन्टरडेन्टल ब्रश रासायनिक प्रकार : टूथ पेस्ट्स, जेल, मलमे, माउथवॉश वगैरे. बर्‍याचदा रुग्णांची डेन्टिस्टकडून आग्रहाची अपेक्षा असते की डेन्टिस्टने त्यांना असे काही औषध / गोळी / मलम / रसायन द्यावे की ज्यायोगे दात कुठल्याही यांत्रिक उपकरणाने स्वच्छ करायची गरजच राहणार नाही, कधीच कीड लागणार नाही आणि सर्व त्रास संपेल.

मॅनेजमेंटचा गोडाचा शिरा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 24/06/2014 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी काहीजण व्यवसाय करतात, काही जण नोकरी करतात, तर काही जणांनी या पैकी एक केलेलं आहे. पैसे मिळवायला तुम्हाला ते करणं भाग असतं. आणि यात विशेषत: ज्यांनी नोकरी केलेली आहे, म्हणजे जे ऐलतीरावर राहिलेले आहेत त्यांना पैलतीरावरच्या माणसांचा नेहमीच (अपवाद असतीलच) त्रास झालेला आहे. सांगायचंच झालं तर ज्या प्राण्याला बॉस म्हणतात त्या प्राण्याचे लाड करण्यात, नखरे सहन करण्यात, एम्प्लॉयी किंवा कर्मचारी नामक व्यक्तीची काय तारांबळ होते, किती त्रास होतो, किती मनस्ताप होतो, राग येतो, हे ज्याचं त्याला ठाऊक आहे.

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग एक

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 23/06/2014 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
[ खालील उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्‍या दंतविकारांबद्दल आहेत. दंतविकार टाळण्यासाठी घेण्याच्या घरगुती काळजी ( Preventive Home Care) बद्दल पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही उत्तरे लिहिली आहेत. काही विशिष्ट असाधारण परिस्थितीत ( उदा. विशेष बालके, गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण इ.) तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे उपाययोजना करावी. ] प्रश्न १ : दंतक्षय ( दातांची कीड) म्हणजे काय? Dental Caries (दातांची कीड) हा एक तोंडामधल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. ( अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. काही गावांत कानात औषध घालून तोंडातून दातांचा किडा बाहेर काढून दाखवणारे रस्त्याकडचे कलाकार असतात.

पानिपत..... जाहल्या काही चूका

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 21/06/2014 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या २०१४च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचं पानिपत झालं याचं कारण त्यांच्याकडून काही चूका झाल्या. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पण ते करतील का ? वास्तविक आत्मचिंतन सगळ्यांनीच करायला हवं. जिंकणार्‍यांनी आणि हरणार्‍या दोघांनीही. असो सध्या काँग्रेसबाबत... .. २००४ साली UPA 1 आलं. मनमोहन त्याचे प्रमुख बनले. लोकांना फार आशा होत्या. बर्‍यापैकी शैक्षणिक करीयर आणि भूषवलेलं मोठं पद ही जमेची बाजू होती. पण शासनावर त्यांची किती पकड होती हा प्रश्नच होता.

अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भावले ========स्वच्छन्द मकरंद !!

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी शुक्रवार, 20/06/2014 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीच्या गुढगर्भी जे मला जे भासले !!!!घेई च्छन्द मकरंद . स्वच्छंद मकरंद, डॉ. दत्ता फाटक .

नियती ...

लेखक यश पालकर यांनी गुरुवार, 19/06/2014 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते. आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही.

<बरं मग>

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/05/2014 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्री श्री श्री विनायक प्रभूपाद स्वामीना अर्पण. आमची प्रेरणा . http://www.misalpav.com/node/27986 काय चिरंजीव. रीझल्ट कधी आहे? १२ तारखेला. ठीक आहे. तुझा नम्बर पितळे काकाना एस एम एस केलाय. अकरा तारखेला परत एकदा करा. पप्पा काय फरक पडणार आहे एका दिवसानी. तुला नाही मला पडेल.

आर्थीक घोटाळ्यांचे/गैरव्यवहारांचे अर्थशास्त्रीय समर्थन होऊ शकते ?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 28/05/2014 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्ट आचरण म्हणजे भ्रष्टाचार ह्या शब्दात पथभ्रष्ट म्हणजे आदर्श अथवा नैतीक मार्गापासून ढळलेला असा एक अर्थ पुर्वी गृहीत असावा. त्यामुळे मुळ शब्दाचा अर्थ सब्जेक्टीव्ह, अधिक व्यापकपणे वापरता येईल असा असावा पण शब्दांच्या अर्थछटा काळानुरूप बदलत जातात तसे इतर अर्थछटा मागेपडून आर्थीक गैरव्यवहार ही अर्थछटा अधिक पुढे येते आहे. (अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नैतीकता या दृष्टीने या शब्दाचे प्रयोजन या विषयावर एक वेगळा लेख होऊ शकेल तो येत्या काळात सवडीनुसार लिहिण्याचा बेत आहेच).

आजचा भारत आणि चित्रपट: 'वर्ल्ड वॉर झी'

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 23/05/2014 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील माझ्या मित्रानो (कौतिक करणारे माझे मित्र आणि मला शिव्याशाप देणारे सुद्धा माझेच मित्र ), मी इथे मिपावर काय टंकतो, त्यामागचं पगालापन इथे देत आहे, ते तुम्ही नेहमीप्रमाणेच खेळीमेळीने, कोणताही पूर्वग्रह न बाळगता, संयमाने समजून घ्यालच, असा मला तुमच्यावर विश्वास आहेच.

मुंगळा थिअरी

लेखक स्पा यांनी गुरुवार, 22/05/2014 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक मित्र आहे माझा,मैत्रीला वयाचे बंधन नसते म्हणतात तसे,बाबांच्या वयाचा आहे माझ्या,पण मी त्याला अरे तुरेच करतो.कधीतरीच बोलतो,पण भरभरून गप्पा होतात.एकटाच राहतो लग्न झालेले नाही.आई वडील केंव्हाच वारलेले.नातेवाईक सुद्धा जास्त नाहीत. पण पट्ट्या नेहमी आनंदात असतो.भयानक क्रियेटीव आहे.ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे.डोक्यात सतत नवीन नवीन कल्पना येत असतात.घरी लहान मुलांचे चित्रकलेचे क्लास घेतो.मध्येच विपश्यना काय करून येतो.तो काहीही कधीही करतो.काल बर्याच दिवसांनी बोलणे झाले.त्याला म्हटले तुला एकट्याला कंटाळा नाही का येत?