Skip to main content

विचार

पहाटे येणारी नर्स

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 19/07/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या धर्तीवर माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच. बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नासा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले.

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

लेखक माहितगार यांनी बुधवार, 16/07/2014 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्‍या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ? काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि.

विसंगती - सुसंगती

लेखक आतिवास यांनी बुधवार, 16/07/2014 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
विवेकानंद साहित्य' वाचणे म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट करणे असा आपल्याकडे आजही काही लोकांचा समज आहे. विवेकानंद साहित्य वाचणा-या व्यक्तीचे कौतुक तर होतेच पण ही व्यक्ती काहीतरी अवघड बाब करते आहे, असा समज होऊन त्या व्यक्तीकडे आदराने पाहण्याची प्रवृत्ती आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसते. अर्थात काही लोक विवेकानंद 'वाचणे' ही निरर्थक कृतीही समजत असावेत – पण ला तरी असे लोक अपवादानेच भेटले आहेत. आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच. मला स्वत:ला विवेकानंद अवघड कधीच वाटले नव्हते, वाटत नाहीत.

द ईएमआय ट्रॅप

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 16/07/2014 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन-तीन दशकांत, पैसा आणि त्याचं महत्त्व या गोष्टींत कमालीचा बदल होत गेलेला आहे. शिवाय बदलत गेलेत ते पैसा मिळवण्याचे आयाम, तो साठवण्याची परिमाणं, त्याच्या व्ययाच्या पद्धती, त्याचा व्यय करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि त्याच्या व्ययातून मिळणारं समाधान. lifestyleफार पूर्वी नाही, अगदी तीन एक दशकांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पना करूया. एखादी गोष्ट खरेदी करण्याची प्रक्रिया साधारण अशी असायची. सर्वप्रथम गोष्ट हवी आहे की तिची गरज आहे याचा विचार व्हायचा. अर्थातच गरज असल्यासच बहुदा तो पुढे नेला जात असे. मग त्या गोष्टीची किंमत किती हे बघणं आलं. ब्रँड वैगरे दुय्यम गोष्टी असत.

सत्याचा "बुरखा"फाश

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 13/07/2014 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल.

पाऊस दाटलेला

लेखक स्पा यांनी रविवार, 13/07/2014 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
Guess what? शेवटच्या ट्रेन मध्ये आहे, कर्जत.१२.४० करी रोड वरुन बसलेलो, आत्ता जेमतेम कुर्ल्यापर्यंत गाडी आलीये.अ.... आत्ता वाजलेत १.३०. तासभर होत आलाय.गाडी हलायची चिन्ह नाहीत.डब्यात जेमतेम चार डोकी.बाहेर मजबुत पाऊस पडतोय.डोळे मिटुन बसलोय.बाकी काहीच करू शकत नाही.पाउस निवांत एकतोय.आज सकाळी पण भिजलो, आत्ता येताना पण भिजलो,छत्री असुन नसल्यासारखी अख्ख्या मुंबइला वाकडा तिकडा कसाही धुतोय.डबा मस्त गार पडलाय.बाहेरुन पाउस आत गळतोय, मला काकडायला होतयं.डोंबोली अजुन लय लांब , त्यात ही शेवटची ट्रेन.कधी सुटेल पत्ता नाही.डोळे पेंगायला लागलेत..

कल्पित सत्य: भाग १, २ (सव्वाशेर तडका आणि बुमरेंग)

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 05/07/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
#कल्पित_सत्य (१)"सव्वाशेर तडका" सुचना: हा प्रसंग मला सुचलेला आणि पूर्णपणे काल्पनीक आहे पण तो सत्य व्हायला हवा का याचा विचार वाचकांनी करावा. एका न्यूज चैनेल चा फोटोग्राफर पाऊस न पडणाऱ्या एका भागात जातो. पाऊस न पडल्याने चिंतेत असलेला एक शेतकरी आकाशाकडे खूप आशेने बघत असतो. फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्या शेतकऱ्याला खूप राग येतो. तो फोटोग्राफरच्या कानाखाली एक ठेवून देतो. त्याचा कैमेरा हिसकावून घेतो आणि भेग पडलेल्या जमिनीत टाकून देतो. कैमेरा गेल्यामुळे फोटोग्राफर रडतो व शेतकऱ्याला मारायला धावतो.

भारताला वाघा सीमारेषेवरील प्रात्यक्षिकाची खरंच गरज आहे काय?

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 30/06/2014 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी उत्तरभारतात सहली निमित्त जावुन आलो. त्या सहली मध्ये एक ठिकाण हे "वाघा सीमारेषा (बॉर्डर)" होते . रोज संध्याकाळी सीमारेषेजवळ हा फक्त ६.०० ते ६.३० असा अर्ध्या तासाचा ध्वज संचालनाचा कार्यक्रम होतो. त्यासाठी अमृतसर येथुन २८ कि.मी. अंतर पार करुन सर्व पर्यटक खाजगी अथवा सार्वजनिक वाहन पकडुन दु. ३.०० वाजल्या पासुनच मुख्य कार्यक्रम स्थळाच्या सुमारे २.३० कि.मी. अलिकडे असलेल्या पहिल्या सुरक्षाकड्यापाशी रांग लावतात. आम्हालाही आमच्या संयोजकाने हा कार्यक्रम बघण्यासाठी दुपारी ४.३० ला तिथे नेले.

दमलेल्या तुमची आमची कहाणी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 29/06/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी.

एक वाचलेच पाहिजे असे पुस्तक...नशायात्रा....लेखक: तुषार नातू (उर्फ, माझ्या द्रुष्टीने आधूनिक वाल्मिकी...)

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 26/06/2014 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामध्ये बर्‍याच प्रकारची, किंबहूना अंगी नाना कळा असणारी बरीच माणसे असतात.