एक मित्र आहे माझा,मैत्रीला वयाचे बंधन नसते म्हणतात तसे,बाबांच्या वयाचा आहे माझ्या,पण मी त्याला अरे तुरेच करतो.कधीतरीच बोलतो,पण भरभरून गप्पा होतात.एकटाच राहतो लग्न झालेले नाही.आई वडील केंव्हाच वारलेले.नातेवाईक सुद्धा जास्त नाहीत. पण पट्ट्या नेहमी आनंदात असतो.भयानक क्रियेटीव आहे.ad agency मध्ये क्रियेटीव डायरेक्टर आहे.डोक्यात सतत नवीन नवीन कल्पना येत असतात.घरी लहान मुलांचे चित्रकलेचे क्लास घेतो.मध्येच विपश्यना काय करून येतो.तो काहीही कधीही करतो.काल बर्याच दिवसांनी बोलणे झाले.त्याला म्हटले तुला एकट्याला कंटाळा नाही का येत? तो म्हणाला रात्री कधी कधी घर खायला उठतं, मग डोक्यात त्याच वेळी भन्नाट कल्पना सुचायला लागतात.
म्हटल काय ?
तर म्हणे आपण आपले घर नेहमी आय लेवल वरून बघत असतो, गेली कित्येक वर्षे... आता डोळे मिटून कल्पना करायची कि आपण एका मुंगळ्या एवढ्या उंचीचे आहोत. आता दरवाज्यापासून घर बघायला सुरवात कर. लिविंग रूम बघ, सोफ्याखालुन कोण बाहेर तर येत नाहीये ना? गाडीच्या आकाराचा टिवी रिमोट. पोत्याच्या आकाराचे पडलेले पॉप कोर्न ..अक्ख घर हळू हळू फिर. किचन मध्ये जा, देव्हार्यात जा, लेणी बघतोस तशा मूर्ती दिसतील. अति प्रचंड.बेड वर फिर,हवे तिथे जा. आजूबाजूने हळू वर निट लक्ष देऊन निरीक्षण करत रहा.घाई नको .. एक एक objet नीट लक्ष देऊन तपासत रहा. कसा वेळ जाईल तुला समजणार नाही. वेगळा perspective मिळेल तुला, 3d visualiser आहेस, तुला अजून सोप्प जाईल.
आयला म्हटलं भारीये हे..
अजून एक फंडा ऐक, म्हटल ऐकवा
आता आपण डायनासोर च्या आकाराचे आहोत असे समज, आणि अक्खा एरिया त्या आय लेवेल वरून फिरून बघ,अजून धमाल येईल.
मेंदूला नेहमी पेक्षा काहीतरी वेगळे विश्लेषण करायला मिळते. मुलं खूप एन्जोय करतात अरे.
अजून एक वेगळा मेंदूचा व्यायाम सांगतो.
Eye - hand co ordination.
ह्यासाठी चित्रकार असलच पाहिजे असं काही नाही हा. एखादी तू बघितलेली वस्तू, व्यक्ती, किंवा काहीही रेखाटायचा प्रयत्न करायचा.इथे चित्र किती सुंदर आलंय ह्याला महत्व नाही तर तुझे डोळे, मेंदू आणि हात एकत्र आले कि कसे काम करतात हे तपासणे महत्वाचे आहे, समजा तू माझे चित्र काढायचा प्रयत्न केलास तर तिसर्या व्यक्तीला न सांगता समजायला हवे कि हा मीच आहे.
म्हटले मान गये उस्ताद..
तेवढ्यात त्याला काहीतरी अजून आठवले, म्हणाला मी वर्चुअल ट्रेक पण करतो. म्हटले आ ? कसा काय
म्हणतो समजा मी आत्ता ऑफिस मध्ये आहे.. खूप काम आहे, तर मी दहा मिनिट वेळ काढतो , रेस्ट रूम मध्ये जातो आणि डोळे बंद करतो.झोपा नाही काढत ऐक पुढे .. तर एका क्षणात मी भर पावसातल्या हरिश्चंद्र गडावर असतो. समोर भयंकर कोकण कडा पसरलेला आहे. तो मी हपापल्यासारखा बघतो.तो भयंकर पाउस माझ्यावर कोसळत असतो, मी पूर्ण भिजलेलो असतो.हातपाय गार पडलेले असतात,हो मी ते सर्व निट जाणवून घेत असतो.मी खरच थंडीने थडथडायला लागतो कडाडणाऱ्या विजा मला दिसतात.अंधारून आलेले आकाश मला दिसते.. पाण्यात बुडलेला तो हरिश्चंद्रेश्वर दिसतो.तेवढ्यात दहा मिनिटे संपतात आणि मी वास्तवात येतो. पण आधी पेक्षा मी दुप्पट तिप्पट ताजातवाना झालेला असतो, ट्रेक करून आलेलो असतो न नुकताच :)
मी एकटा असलो कि असे काहीकाही नवीन शोधून काढतो.. आणि आयुष्य मजेत जगतो
त्याच्याशी बोललं कि असा वेगळा काहीतरी धागा सापडतो , आयुष्य भरभरून जगायचा. बाय द वे त्याची ती मुंगळा थिअरी मी करून बघीतली, u cant imagine , आईशप्पथ खूप मजा आली :)
वाचने
11899
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता मी पयला.
काय केलत पहिला येउन?
In reply to आता मी पयला. by प्रचेतस
पयला येऊन अज्ञातवासातून बाहेर
In reply to काय केलत पहिला येउन? by स्पंदना
ही थियरी म्हणजे कोणती? मुंगळा
In reply to पयला येऊन अज्ञातवासातून बाहेर by प्रचेतस
मुंगळा आणि आय हॅण्ड दोन्ही.
In reply to ही थियरी म्हणजे कोणती? मुंगळा by llपुण्याचे पेशवेll
काल पास्न लै उचक्या लागल्या.
In reply to पयला येऊन अज्ञातवासातून बाहेर by प्रचेतस
प्रचंड कल्पनाशक्ती आहे
अपेक्षाभंग
ह्यात थेयरीत काही खास वाटलं
In reply to अपेक्षाभंग by प्रसाद गोडबोले
व्वा!!!
मस्त आहे मुंगळा थिअरी. मला
मस्तय, अशीच एक " बर्ड थिअरी "
मस्त आहे!
बेसिकली पैसा ताई , तो लहान
अगदी अगदी!
In reply to बेसिकली पैसा ताई , तो लहान by स्पा
छान आहे थिअरी! लेख आवडला.
मस्तयत थिअरीज. मनातल्या मनात
मुंगळा चष्मा घालुन पाहिला पण
त्यात काय नवल....
ही कल्पना छान आहे. लहान
प्रयोग मजेदार आहेत; करून
प्रयोग जबरी. मला बोर झालं तर
चालणं
In reply to प्रयोग जबरी. मला बोर झालं तर by बॅटमॅन
राशोमोन
In reply to चालणं by राही
थकेस्तोवर निरुद्देश इकडेतिकडे
In reply to प्रयोग जबरी. मला बोर झालं तर by बॅटमॅन
वटवाघळाला मांजर आवडणारच!
In reply to थकेस्तोवर निरुद्देश इकडेतिकडे by कवितानागेश
मस्त !!!
मुंगळा थिअरी मस्त आहेच आणि
ही मुंगळा थ्योरी जी आहे ना
हि मुंगळा थियरी माहीती नव्हती
मस्त
हाहा
In reply to मस्त by नंदन
असेही परिक्षण.
In reply to हाहा by स्पा
लेख आवडला.
फारच छान
असाही विरंगुळा.
??
हाहा!
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
स्पाऊ धमाल थेअरी आहे ब्वा!
शेम टू शेम!
In reply to स्पाऊ धमाल थेअरी आहे ब्वा! by स्पंदना
पां डुब्बाचा धागा... राखुन
रोफ्ल, बुव्या लय माजलायेस तु,
@बुव्या लय माजलायेस तु, >>>
In reply to रोफ्ल, बुव्या लय माजलायेस तु, by स्पा
अशा प्रकरचे प्रयोग " सिल्वा
मी लहानपणी एक मजेदार खेळ खेळत
ही थेअरी लहानपणीच चित्रपटात
भन्नाट
अजुन्न एक मुङ्ग्ळा थ्योरी अस्तित्वात आहे
मस्त रे स्पाउली!
कधी चेक नव्हत केले ..पण
साॅल्लिड थिअरीज
वेगळी कल्पना