Skip to main content

विचार

मिपाकराशी भेटताना....

लेखक अमितसांगली यांनी शुक्रवार, 05/12/2014 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
'दोस्त फेल होता है तो दुख होता है, लेकिन जब वो फर्स्ट आता है तो और दुख होता है' असच काहीतरी माझ्या बाबतीत घडत होत. मग त्यातून सुरु झाला सुख,समाधान,अपेक्षा,मागण्या,स्वार्थी मदत,निस्वार्थी मदत यासारख्या शब्दांचा खेळ. पण कळत नकळत भातुकलीच्या या खेळाचे प्रचंड यातनांमध्ये कधी रुपांतर झाले व अपेक्षांच्या ओझ्याची तलवार कधी मानेवर ठेवली ते कळलेच नाही. लहानपणापासून समाजसेवा,संशोधन असले विचार डोक्यात होते. शिक्षण चालू असेपर्यंत त्या दृष्टीने प्रयत्नही करीत होतो. पण नोकरी लागली आणि प्रत्यक्षात GLAMOR या शब्दाचेच आकर्षण वाटू लागले. पैसा येऊ लागला,वाढू लागला पण त्याचबरोबर राहणीमान बदलले.

शांततेनंतरचं वादळ - Thunder down under

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 04/12/2014 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"We must dig in and get through to tea. And we must play on." भावुक झालेला ऑझी कर्णधार मायकेल क्लार्क आपल्या धाकट्या भावासारख्या सहकार्‍याला श्रद्धांजली वाहत होता. तेव्हा फक्त मॅक्सविलच्या शाळेत उपस्थित ऑझी पंतप्रधान, आजी-माजी क्रिकेटपटू, ह्यूज कुटुंबीय आणि चाहत्यांचेच नाही तर क्रिकेट आवडणार्‍या / नावडणार्‍या जगभरातल्या कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावले असतील. २५ नोव्हेंबरपासून सगळं क्रिकेटविश्व हादरलंच होतं. कारणही तसच आक्रीत. आत्तापर्यंत असे शेकडो बाऊन्सर्स टोलवलेला आणि झेललेला फिल ह्यूज सिडनीच्या मैदानावरच एका विचित्र अपघाताने कोसळला.

बिल्डिंग अ स्ट्राँग फाउंडेशन - पायांचे साधे, सोपे व्यायाम

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 02/12/2014 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी काही लिहीण्या आधी काही डिस्क्लेमर्स देत आहे. लेखन व्यायाम/व्यायामप्रकार विषयक आहे. तरीही, मी व्यायामतद्न्य, प्रशिक्षक इत्यादी नाही. माझ्या कुतुहलजन्य माहितीस मी इथे केवळ मांडत आहे. यास किंचितशी अनुभवाची किनार असली तरी 'स्वानुभवातून सांगतोय' म्हणण्याइतकी नाही. खाली दिलेले काय, किंवा कुठलेही व्यायामप्रकार एक तर स्वतःला सांभाळून, कुवत ओळखून वा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत. झालं. तर! आता मुद्द्याकडे वळतो. एक सुरेख क्वोट वाचलं होतं कुठेतरी.

एनिग्मा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 01/12/2014 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
Good Evening! This... is the voice of Enigma In the next hour we will take you with us into another world, into the world of music, spirit and meditation Turn off the light, take a deep breath and relax start to move slowly, very slowly Let the rhythm be your guiding light हे शब्द ऐकले... तेंव्हाच्या भाबडेपणामुळे असेल कदाचित, पण मी खरंच डोळे मिटले, आणि लगेच पुढच्या 'सॅडनेस' या गाण्याचा तो युनीक ठेका सुरू झाला. मागे सिन्थेसायझरच्या कॉर्ड्स वाजत होत्या. सर सर सर हातावरचे केस उभे राहिले आणि तत्क्षणापासून 'एनिग्मा' चा मी वेडा झालो.

अविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 01/12/2014 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
अविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ योगायोग, अकस्मात, अनपेक्षित हे शब्द आपण नेहमीच वापरत असतो. पण आजच्या दिवसाचे वर्णन कसे करावे तेच मला सुचत नाही. आजचा दिवस माझ्यासाठी अकल्पित आणि अफ़लातून ठरला आहे. आज "माझी गझल निराळी" चे समिक्षण दैनिक प्रहारमध्ये प्रकाशित झाले. आजच महाराष्ट्र टाईम्स मध्ये माझी "ऊठ मर्दा ऊठ" ही कविता प्रकाशित झाली, आज दैनिक सकाळमध्ये "शतवर्ष नरा" ही कविता छापून आली आणि.... मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आजचे ठिय्या आंदोलन पोलिसांची एकही लाठी न खाता, बंदुकीची गोळी न खाताच सहजतेने सुखासुखी पार पडले. इतके सारे अनुकूल योगायोग एकाच दिवशी घडून येणे, हे फ़ारच विलक्षण आहे.

चाफा बोलेना, चाफा चालेना...

लेखक आदित यांनी शुक्रवार, 28/11/2014 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
'चाफा बोलेना, चाफा चालेना' हे गाणं कितीदा ऐकलंय. लतादिदींचा स्वर अाणि टिपिकल भावगीताचं संगीत... र्याचदा असं वाटलं की प्रेमगीत अाहे. पण कधी गाणं पूर्ण कळलं नाही. काहीतरी मिस होतंय असं वाटंत राहिलं. पूर्ण कविता मिळवून वाचली तर गुंता अजूनच वाढला. मग कवीबद्दल शोध घेतला. ही कविता 'नारायण मुरलीधर गुप्ते (१८७२-१९४७)' यांची अाहे. ते 'बी' या टोपणनावानं लिहायचे. मग गाणं ऐकताना कधीतरी हे सुचलं - मला वाटतं या कवितेत 'बी'यांनी अापल्या काव्यनिर्मीतीची प्रक्रिया सांगितली अाहे. 'चाफा' हे कवीच्या कवितेचं, काव्यप्रतिभेचं प्रतीक अाहे. ही कविता समजण्याासाठी या कवितेचा फॉर्म समजणं हेही महत्वाचं अाहे.

आहे रे नाही रे , हिरावणे आणि तुलना उपदेश या बाबत थोडेसे ...

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 28/11/2014 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मला सुचलेले काही विचार आपल्यासमोर मांडत आहे. आपल्याला पटले किंवा नाही ते कळवा: (१) आहे रे आणि नाही रे...!! (अ) "आपल्याजवळ जी गोष्ट नाही पण इतरांजवळ आहे" - इतरांकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि ज्यांचेजवळ ती आहे त्या गोष्टीचा/व्यक्तीचा हेवा आणि द्वेष करू नका आणि ती गोष्ट तुच्छ मानू नका. नंतर तीच गोष्ट तुम्हाला मिळाली तरी त्या गोष्टीला तुम्ही तुच्छ मानणार काय?? (ब) "आपल्याजवळ जी गोष्ट आहे पण इतरांजवळ नाही" - आपल्याकडे ती गोष्ट असल्याबद्दल देवाचे आभार माना आणि इतरांना मिळावी यासाठी प्रार्थना करा. पण ती गोष्ट आपल्याजवळ असल्याचा अभिमान व गर्व बाळगून इतरांना कमी लेखू नका.

बळी

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 24/11/2014 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
(कथा काल्पनिक आहे) काही वर्षांपुर्वी देशात खाद्य तेलांची कमी दूर करण्यासाठी सोयाबीन तेलाचे उत्पादन वाढविण्याचे धोरण सरकारने राबवायला सुरवात केली, अल्प दरात बँके कडून कर्ज, सुरवातीच्या काही वर्ष व्याज माफी इत्यादी सुविधा सरकारने सोयाबीन तेल उत्पादकांना देऊ केल्या. या सरकारी धोरणांचा कृषी विज्ञानी श्रीयुत वाघमारे यांनी वीआरएस घेऊन विदर्भात त्यांच्या राहत्या गावी, सोयाबीन ऑयल मिल टाकली. सुरवातीच्या दोन-तीन वर्षानंतर गाडी रूळावर येऊ लागली, पण नफा काही त्यांच्या हातात आला नव्हता. त्यासाठी मिलची उत्पादन क्षमता किमान ७०% तरी गाठणे आवश्यक होते.