Skip to main content

विचार

मोगरा फुलला

लेखक दिलिप भोसले यांनी बुधवार, 07/01/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
II मोगरा फुलला मोगरा फुलला II माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले, तिथे माझावर उत्तम संस्कार झाले. शाळेची इमारत चारी बाजुनी व मधे मोकळी जागा, या मोकळ्या जागेच्या बाजुनी उंचावर लाऊड स्पीकर लावले होते. प्रार्थना, सूचना देण्यासाठी याचा उपयोग होत असे, मात्र दुपारच्या सुट्टी मधे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम रचित गीतांचे प्रसारण केले जाई. ओम नमोजी आद्या, अवचित परिमळू, आजी सोनियाचा दिनु, पैल तो गे काऊ कोकताहे, धनु वाजे घुणघुणा, अरे अरे ज्ञाना, अशा सुंदर गीतांनी माझ्या मनात घर केले ते बालपणी, पण मनावरती कोरले गेले ते मोगरा फुलला.

एकच प्याला, चार शक्यता, चार जोड्या!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/01/2015 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धा भरलेला प्याला आणि त्यासंदर्भातला आशावाद/निराशावाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत.

मिसळपाव वर टंकलेखन करण्याच्या काही विशेष सुचना

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 31/12/2014 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? इथे नविन सभासदांना मराठीत टाइप करायला बर्‍याच अडचणी येतात. सुरुवातीला मला पण थोडा त्रास झाला. त्यामुळे, मराठीत कसे टाइप करावे? ह्यासाठी हा धागा काढत आहे. सुरुवातीला आपण बाराखडी बघु या. पहिली महत्वाची गोष्ट ----- तुमच्या कळफलकाचे "Caps lock" नॉर्मल ठेवा.थोडक्यात अक्षरे छोट्या लिपीत यायला पाहिजेत.

मला मिपा का आवडते? उर्फ माझी पण नर्मदा परीक्रमा....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 24/12/2014 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
यानबूला येण्यापुर्वी, काहीतरी वाचायला हवे म्हणून, जगन्नाथ कुंटे ह्यांची पुस्तके आणली.ती वाचून मला पण नर्मदा परीक्रमा करण्याची इच्छा झाली.मुळात माझा पिंड अध्यात्मिक.पण वेगळा.आमची मुंज पण वेगळी आणि आमचे सत्यनारायण पण वेगळे. मुद्दाम नर्मदाच्या परीक्रमेला कदाचित जाईनही.पण माझ्यासाठी म्हणून देवाने काहीतरी वेगळी व्यवस्था केली असेलच की, विचार करता करता जाणवले की, यस्स्स्स्स्स...माझी नर्मदाच वेगळी. मुळातच माझा स्वभाव स्वच्छंदी आणि बहूदा त्यामुळेच एककल्ली.आंतरजालावर इकडे-तिकडे भटकट असतांना, मराठी संकेत-स्थळांचा शोध लागला.

ब्रम्हराक्षसाच्या पाठी …

लेखक Maheshswami यांनी रविवार, 21/12/2014 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
भित्यापाठी ब्रम्हराक्षस ! ही म्हण शिष्यवृत्ति परीक्षेला ची तयारी करताना चौथी मधे बऱ्याच वेळा घोकुन घोकून पाठ केली होती. म्हणायला खुप मजेशीर वाटायची. नजरेसमोर असा दंडुका घेतलेला राक्षस एका "फाटलेली हातात घेऊन" पळणाऱ्या माणसाचा पाठलाग करतोय अस दृश्य यायचं, पण म्हणी चा अर्थ बऱ्याच अनुभवानंतर उमगला. जीवनात, बऱ्याचदा काही गोष्टी , अडचणी अशा असतात की त्या पार पडल्याशिवाय , सोडवल्याशिवाय पर्याय नसतो. पण आपण काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करात राहतो ,उद्यावर ढकलत रहतो.

कथा bigger cypher ची

लेखक येडाफुफाटा यांनी रविवार, 21/12/2014 05:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचार- लहान शून्य म्हणून जन्मलो, आणि मोठं शून्य म्हणून संपतोय हे श्रेयही मला जगण्याच्या तृप्तीसाठी पुरे आहे! यावरुन a bigger cypher हा याच अर्थाचा धडा आठवला. म्हणजे आयुष्याच्या गणिताच्या अखेर उत्तर शून्य येणार असलं तरी ते तसं आहे हे कळायला गणित तर करायलाच हवं हा न्याय जगण्याला लावणारे! bill अन् melinda gates , warren buffet , Rockfellar किंवा tata वगैरें आयुष्यभर पैसे कमावतात. व नंतर तो स्वहस्ते donate करतात. म्हणजे आयुष्यात आधी कोणत्याही भल्या/बुर्या(रॉबिनहूड,आल्फ्रेड नोबेल वगैरें) मार्गाने पैसे मिळवावे व उतारवयात स्वतःच्याच हस्ते(credit घेउन) खर्च करावे. असे धोरण समाजात मान्य दिसते.

पान,चुना..तंबाखु!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 20/12/2014 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी:- राम राम मंडळी... मंडळी:- राम राम... काय? झाली का कामं? मी:- हो...झाली की! मंडळीतले तात्या:- या...मग बसा! .. ए गेनू.. च्या आन रे! मी:- नको राव. लै झालाय आज. चहा नको.. तात्या:- बरं..र्‍हायलं..मंग पान खा! येश्या:- का गुटखा देऊ? तात्या:- भाड्या..गुर्जिला परत गुटखा इचारला,तर तीच पुडी सारीन तुज्यात! शामू:-तात्या आज बिनपाण्यानी करणार काय येश्या'ची? .. ह्या ह्या ह्या ह्या!!! तात्या:- तसं नाय हो. पण पान कुटं..आनी गुटखा कुटं? येश्या:- बरोबर (आ)हे...आपलं त्ये पान,लोकाचा तो गुटखा! तात्या:- तुज्यायचा तोंड फुटका तुज्या...गप र्‍हा जरा.. शामू:- ख्या ख्या ख्या ख्या...

माणसे जोडणे ...

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 19/12/2014 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपण "माणसं जोडण्याच्या" मोठमोठया गोष्टी करतो आणि नेहेमी त्याची महती गात असतो. आपण मित्र जोडतो, इतर सहकारी जोडतो. पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही? बाहेरची माणसे जोडतांना आपण त्यांना गुणदोषांसकट स्वीकारतो पण नात्यातील माणसांना मात्र आयुष्यभर वेगवेगळ्या अपेक्षा आणि नियमांच्या खाली दाबून टाकतो आणि आपण स्वतः मात्र आपल्यात बदल करत नसतो. म्हणून ते अवघड आहे. कुणी म्हणेल की मित्र निवडतांना चाॅ‌ईस असतो, नात्यात नसतो. पण देवाने तेच तर एक चॅलेंज दिले आहे आपल्याला.

अतिरेक्यांची मुख्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रिय लष्करी कारवाई

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 19/12/2014 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे जागतिक दहशतवादाची केंद्रे व शिक्षणस्थाने आहेत आणि जेथून दहशतवाद निर्यात केला जातो या जागांबद्दल (खुद्द तो/ते देश सोडून) जागतिक सर्वसहमती आहे. तरिही या वस्तुस्थितीवर संयुक्त राष्ट्रसंघ अथवा इतर बहुदेशिय संघटनांकडून काही ठोस, विशेषतः लष्करी कारवाई का केली जात नाही याबाबत नेहमी आश्चर्य व्यक्त केले जाते. असे करावे असे सांगताना "हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही" असेही म्हटले जाते. तरीही अशी कृती केली जात नाही.