विचार
दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:
दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:
१) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते.
२) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते.
3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत
त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात.
४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात.
बलबन का मकबरा
क़ुतुब मीनारपासून थोड्याच अंतरावर महरौली Archeological Park आहे. तिथे आडवाटेला , काटेरी झुडपांत अनेक भग्नावशेष विखुरलेले दिसतात. आपण त्यातून मार्ग काढत पुढे जावे.एका मकबर्याचे भग्नावशेष दिसतील. खचलेल्या भिंती दिसतील. भिंती कसल्या! दगडमातीचा निव्वळ रचलेला थर ! त्यावर दिलेला मुलामा पार उडालाय. कधीकाळी भिंतींना मुलामा दिलेला होता, त्यावर नक्षीकाम होते ह्याची साक्ष देणारा एक छोटासा तुकडा तेवढा एका भिंतीवर दिसेल. छत कधीचेच उडालेय. या चार भिंतींच्या आत, आकाशाच्या छताखाली , लाल वालुकाश्मात बांधलेली एक कबर दिसेल. कबरीचे काही दगड गायब झाले आहेत, काही मोडकळीस आलेले आहेत.
डॉ. प्रकाश पवार यांच्या 'आरक्षण' विषयक लेखाच्या निमीत्ताने
आरक्षण या खूप चघळून झालेल्या विषयावर खूप जणांनी वाचल, लिहिल आहेच.
हेमु कर्णिक नावाच्या ब्लॉग धारकाने हे आरक्षण म्हणजे राज्यकर्यांच्या गेल्या साठ वर्षातील अपयशाची कबूली नाही का असा जरासा वेगळा प्रश्न त्यांच्या अनुदिनीतून विचारलेला दिसला. त्यांच्या ब्लॉग मध्ये खूप काही विश्लेषणात्मक आहे अस नाही पण सर्वांच्याच आत्मपरिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा राहतो.
आरक्षण विषयक बहुतांश विश्लेषणातून काही मुद्दे सुटलेले आढळतात त्यांची दखल घेणे आणि डॉ.
मराठा आरक्षण दोन्ही बाजू
मराठा आरक्षण या विषयावर पुन्हा चर्चा सुरु झालेली आहे. याचे कारण न्यायालयाचा आलेला निकाल.
या विषयावर टिव्हीवर सर्व बाजू मांडणारी चर्चा झाली. कुठलेही मत बनवण्यापूर्वी ही चर्चा जरूर पहा.
यात तज्ञांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे
राज्यकर्त्या जमातीलाच बॅकवर्ड ठरवण्याचा प्रयत्न झालेला आहे.
एका नव्या इतिहासाची सुरुवात -१
ही एक काल्पनिका आहे – फँटसी. मराठीत दुर्मिळ असलेला प्रकार. इथे तांत्रिक तपशिलापेक्षा कथानकात रस घ्यावा अशी वाचकांना विनंती आहे. शक्यतेच्या पातळ्या तपासण्याचे निकष मानवी ज्ञानाच्या कक्षेत कमी आहेत. शास्त्रे भौतिक पातळ्या तपासू शकतात. अभौतिक अस्तित्वे शास्त्रीय उपकरणांनी टिपता येणार नाहीत. कलाकाराचा मेंदू अन व्यवहारी माणसाचा मेंदू यात वैद्यकीय उपकरणे तारतम्य करू शकतील का शंका आहे.
तेव्हा चिकित्सक दृष्टीपेक्षा तरतम दृष्टी ठेवली तर या कथेचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल.
..
त्यागासारखं ढोंग नाही
सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.
एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन
२००५ दिवाळीचे दिवस
बेंगलोर मधली एक संध्याकाळ. इंदीरा नगर एरिया.
ऑफिसचं शेड्यूल पक्कं नसल्यानं त्यानं हैद्राबादची रिझर्वेशन्स केलेली नव्हती. बंगळूर ते हैद्राबाद आणि तेथून निजामाबाद. नेहमीचाच मार्ग होता. दिवाळीची चार दिवस असलेली सुट्टी बेंगलोर मध्ये घालवायची त्याची मुळीच ईच्छा नव्हती. ट्रेन मिळायची शक्यता आता शून्याहून कमी. सुट्टीचे दिवस म्हणल्यावर विमान कंपन्या लुटायला बसणार. बसने जाणे हाच एक आणि एकमेव पर्याय होता.
खाली नही है- ऑपरेटर. दुसरे एजंटसे पूछके देखो. दुसर्या एजंटने तीन चार फोन केले. त्याचे पण तेच उत्तर आणि तोच सल्ला. सात आठ एजंटना विचारून झाल्यानंतर तो वैतागला.
मिसळपाव