मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ज्योतिष .......

झंडुबाम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ज्योतिष शास्त्र . यामध्ये विज्ञानाचा भाग किती हा खरच एक कुतूहलाचा विषय आहे . कुठलाही माणूस असू देत आस्तिक किंवा नास्तिक पण आपलं भविष्य कसं असलं पाहिजे या बद्दल एक विलक्षण कुतूहल ,जिज्ञासा . त्यानंतर भविष्य समजलं कि मग ते खरं मानायचं कि खोटं ते मात्र आपण ठरवायचं ,म्हणजे कोणी चांगलं सांगितलं तर ते छाती ठोकपणे सगळ्यांना सांगणार , आणि तेच जर काही वाईट समजलं तर मात्र हे सगळं थोतांड ठरवून मोकळं व्हायचं . मुळात जन्मवेळ देण्यात येते ती किती योग्य असते ? नर्स चे घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ? लिहिताना चूक झाली तर? एक न अनेक बर्याच शक्यता . चूक होण्याची पूर्ण शक्यता . म्हणजे कसं कि आयुष्य म्हणजे पत्त्याचा डाव , कोण कधी कुठला पत्ता टाकणार त्यावर कोण डाव जिंकणार हे ठरतं . पण म्हणूनच कोणाकडे काय पत्ते आहेत हे समजून घ्यायची इच्छा का बाळगायची ,आणि आणि जरी पत्ते समजले तर खेळायला मजा तरी येईल का ? आणि उद्या काय होणार हे आधीच समजणार असेल तर त्यामुळे जगण्याची मजाच निघून जाईल . पैसे देऊन फिक्स केलेल्या खेळासारखं . वाटतं जर स्वतः सचिन किंवा कलाम साहेब कुंडली पाहून असते तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात शिखर गाठता आले असते का ? आणि यातली सगळ्यात मोठी न पटणारी गोष्ट म्हणजे जर एखाद्या वेळेस ज्योतिष जेव्हा सांगतो कि काही दोष आहे तर त्याला ऊपाय देखील असतो , पैसे देऊन जर सगळे दोष जर निघून जात असतील तर मग मूळात हे दोष निर्माण तरी कसे होतात ? असे काही प्रश्न आहेत कि ज्याची उत्तरं नाहीत . याचा अर्थ असा मुळीच नाही कि ज्योतिष शास्त्र म्हणजे थोतांड आहे . पण आजकालच्या ज्योतिषांनी त्याला थोतांड बनवलं आहे . प्रलोभनं दाखवली जातात आणि लोक फसतात , आजही मी पत्रिका जुळवून मोडलेली लग्न पहिली आहेत . आणि ज्यांच्या कुंडलीत नाडी दोष नव्हता त्यांच्या मुलांचा अपघाती मृत्यू सुद्धा . खरं काय आणि खोटं काय त्यालाच माहित .

वाचन 6557 प्रतिक्रिया 0