बुधा!
काही गोष्टी पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला फारशा आवडत नाहीत पण नंतर कधीतरी अचानक आपल्याही नकळत त्या आपल्या मनाचा ताबा घेतात!
तसच काहीस माझ बुधाच्या बाबतीत झाल. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा हा मोतीबिंदू झालेला म्हातारा मुंबई सोडून एकटाच कुठे त्या राजमाचीला निघाला आहे हा प्रश्न पडला. त्याला उतारवयात त्या माचीची, श्रीवर्धन, मनरंजन गडांची ओढ का लागली आहे हे काही समजत नव्हते आणि तेव्हा ते जाणून घेण्यात रसही वाटला नाही. त्यामुळे ती पहिली भेट अगदी थोडक्यात आटपली!
पण मनात कुठेतरी बुधाविषयी उत्सुकता राहिली असावी कदाचित! त्यामुळेच बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा त्याला भेटून त्याच्यासोबत माचीचा प्रवास सुरु केला. त्याच्या अधू असूनही निसर्गाची सुंदरता टिपणार्या दृष्टीतून आजूबाजूचा परिसर पाहू लागलो आणि आधी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली.
हळूहळू हा आजूबाजूच्या निसर्गावर प्रेम करणारा, जनावरांचीही काळजी वाहणारा बुधा जवळचा वाटू लागला.
माणूस हा समाजप्रिय प्राणी! पण हा प्राणी निसर्गापासून दूर गेला. आपल्या सोयीच, स्वतःला हवं तसं जग बनवून त्यातच राहू लागला. स्वतःचीच सुखं दुःख गोंजारत बसू लागला. म्हातारपणी बुधाचा जीव मात्र त्या जगात गुदमरू लागला, लहानपणीच्या माचीवरच्या सुंदर आठवणींमध्ये तो रमू लागला. आणि एक दिवस, मनाची तयारी करून सगळे काही सोडून तो एकटा आपल्या मूळ ठिकाणी निघाला, कायमचा!
इथून पुढच त्याचं आयुष्य म्हणजेच "माचीवरला बुधा!" गो. नी. दांडेकरांनी लिहिलेली एक अप्रतिम कथा…
बुधाचे माचीवर राहणं, सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी त्यानं निर्माण केलेलं नात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला सापडलेला आनंद, शेवटी कथेमध्ये येणारा विलक्षण ताण या सगळ्या गोष्टी वाचकाला अंतर्मुख करतात. पण हे सगळ इतक्या सहज होत नाही. हि कहाणी वाचकाला अस्वस्थ करून सोडते.
जे झालं ते तसंच होणं गरजेचं होत का? बुधाचा निर्णय खरच योग्य होता का? या प्रश्नांची उत्तरे काही केल्या मिळत नाहीत…
पण निसर्गाशी समरस होऊन त्यालाच समर्पित झालेल्या बुधाच्या म्हातारपणातला हा प्रवास निश्चितच अनुभवण्यासारखा आहे!
(मिपावर बर्याच लोकांनी हि कादंबरी खूप आधीच वाचली असणार यात शंका नाही! इथे माझे विचार मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे, काही कमी जास्त झाले असले तर सांभाळून घ्या! :) )
याद्या
4675
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
पुनर्भेट
बुधा
In reply to पुनर्भेट by बहुगुणी
मस्तच! आज तुमच्यामुळे पुन्हा
'त्या तिथे रूखातळी'
In reply to मस्तच! आज तुमच्यामुळे पुन्हा by जडभरत
हे पुस्तक online नाही मिळत का
In reply to 'त्या तिथे रूखातळी' by प्रचेतस
बुकगंगा.कॉम वर मिळेल की.
In reply to हे पुस्तक online नाही मिळत का by धनावडे
Erasik काय आहे?
In reply to बुकगंगा.कॉम वर मिळेल की. by प्रचेतस
www.erasik.com
In reply to Erasik काय आहे? by बोका-ए-आझम
नाही मिळत bookganga वर
In reply to बुकगंगा.कॉम वर मिळेल की. by प्रचेतस
वाघरु म्हणून सर्च देऊन पाहा.
In reply to नाही मिळत bookganga वर by धनावडे
धन्यवाद, सापडल....
In reply to वाघरु म्हणून सर्च देऊन पाहा. by प्रचेतस
बुधा आजच वाचून झाल .
बुधा परत वाचणे आले.
शितू नेटवरती मिळतंय का
In reply to बुधा परत वाचणे आले. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
गोनीदांची पुस्तके पुन्हा
In reply to शितू नेटवरती मिळतंय का by शब्दबम्बाळ
राहून गेलीए वाचायची !
सुरेख ओळख!
छान लिहिलं आहे!
पुढच्या भारत भेटीत नक्की....
आवडतं पुस्तक म्हणून एकच नाव