Skip to main content

विचार

सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 17/03/2016 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

हे अशक्य नाही!

लेखक उल्का यांनी मंगळवार, 15/03/2016 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण पंधरा वर्षांपूर्वी तारापूर येथे माझे वास्तव्य होते. मुले लहान असल्यामुळे त्यांना शाळेत सोडायला मी जात असे. त्यांच्या शाळेच्या नोटीस बोर्डवर एक ‘बोलके’ चित्र लावले होते. जेव्हा एक चित्र अनेक शब्दांचे काम करते तेव्हा त्या चित्राला बोलकेच म्हणावे लागते. ‘एका पोलीथिन पिशवीने आपला ‘आ’ वासला आहे आणि ती संपूर्ण पृथ्वी गिळंकृत करते आहे’ असे ते चित्र होते. कदाचित अजुनहि असेल. कारण परिस्थितीत चांगला स्वागतार्ह काहीही बदल झालाच नाही आहे उलटपक्षी ती हाताबहेरच गेली आहे की काय अशी शंका यावी. मधूनच जाग आल्यावर काही कडक नियम लागू केल्याचा फक्त आव आणला जातो.

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 15/03/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारीच्या ९ तारखेला रशीद जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली.

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 15/03/2016 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

कोषातून बाहेर (Ice-Breaker)

लेखक राघवेंद्र यांनी मंगळवार, 15/03/2016 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला लोकांसमोर बोलायला आवडते. (No Stage Fear) मला २-३ तासांच्या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन करता येते. (Host a Meeting) मला लोकांच्या विचारावर अभिप्राय, टिप्पणी करायला आवडते. (Evaluation) मी कोणत्याही प्रश्नावर उत्स्फूर्त १-२ मिनिटे मत देऊ शकतो. (Impromptu Speech) या वरील एखादे वाक्य तुम्हाला लागू होत नसेल तर पण लागू व्हावे असे वाटत असेल तर जगभरात या विषयावर एक संस्था कार्यरत आहे आणि तिचे नाव Toastmasters International. ही ना नफा - ना तोटा या तत्वावर चालणारी संस्था आहे.

पाण्यासाठी दाही दिशा !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 13/03/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
राज्यात दुष्काळाचे सलग चौथे वर्ष सध्या आपण भोगतो आहोत. अनेक शहरांमध्ये आत्ताच पाण्याची बोंब उडालेली आहे. पुण्यासारख्या आणि नाशिकसारख्या, ठाण्यासारख्या एरवी पाण्याच्या बाबतीत सुखी राहिलेल्या शहरांमध्येही आठवड्यांतून दोन दिवस कधी तीन दिवस पाणी येणार नाही अशी स्थिती उद्भवलेली आहे. आणि आत्ता आपण फक्त मार्चच्य मध्यावर आलो आहोत! पुढचा पाऊस सुरु होऊन तलाव धरणांतील पाणी साठा उचावण्यासाठी अद्याप तीन महिन्यांचा किमान अवधी आहे. काळ तर मोठा कठीण आला अशीच ही स्थिती आहे.... अशा वेळी पाण्याच्या साऱ्या नव्या जुन्या योजना आठवल्या तर नवल नाही.

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवाणा-या राईडस

लेखक मार्गी यांनी शनिवार, 12/03/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?

लेखक माहितगार यांनी शनिवार, 12/03/2016 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २०१६ मध्ये 'ज्ञानयोद्धा' नावाची काही एक व्याख्यानमाला झाली असावी, रमेश ओझा नावाचे कुणि एक गांधीवादी आहेत त्यांचे या व्याख्यानमालेत रास्वसंघाची ९० वर्षे या विषयावर भाषण झाले असावे; ज्याचे महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने वृत्तांकन केले होते. , रमेश ओझांनी रा.स्व.

सायलेंट ऑबझव्हर, सोनोग्राफी, आणि सेक्स रेशो तसेच बायल्ये

लेखक गॅरी शोमन यांनी शुक्रवार, 11/03/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातल्या एक माणसाने अथक प्रयत्न करुन सायलेंट ऑबझर्व्हर नावाचे एक सयंत्र शोधुन काढले त्याचा सत्कार "चला हवा येऊ द्या" कार्येक्रमात ८ मार्च च्या दिवशी अनेक स्त्रीयांनी केला हे आपण पाहीले असेल. परदेशात नोकरी करुन भारतात स्थायीक झालेल्या माणसाने हे उपकरण शोधले जे सोनोग्राफी मशीनने काय काय दाखवले ते रेकॉर्ड करते. हे रेकॉर्डींग पाहिले की समजते की सोनोग्राफी सेंटर्स ना सेक्स रेशो संदर्भात किती सामाजीक जाणिव आहे.