मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सद्भावना

कहीं दूर जब दिन ढल जाये

Anand More ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कॅन्सरशी झुंज देत ओंकारने इहयात्रा संपवली. ओंकार माझा शाळूसोबती. घट्ट गूळपीठ ज्या मोजक्या लोकांशी जमलं त्यांच्यापैकी एक. आमची जोडी तशी गमतीदार होती. तो जगन्मित्र, मी घुम्या. तो तल्लख स्मरणशक्तीचा, मी संदर्भासाठी पुस्तक धुंडाळणारा. तो तापट आणि शीघ्रकोपी, तर आता रागवायचा हक्क मला आहे का? याच गोंधळात मी अडकलेला. पण आमच्या दोघांत एक समान दुवा म्हणजे पुस्तकप्रेम. त्याच्या घरी एन्सायक्लोपीडियाचे खंड होते. समग्र पुलं होते. दळवी होते. इतकंच काय तर गादीखाली लपवलेलं आनंदध्वजाच्या कथाही होतं. त्यामुळे किशोरावस्थेतून तारुण्यात आम्ही एकत्र प्रवेश केला. त्याला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता.

अवघे धरू सुपंथ...

दिनेश५७ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल मला माझ्या मित्राचा हा मेसेज आला. कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या मुलांची मनोवस्था काय असेल याची कल्पना करणे शक्य नाही, पण तिच्या काळजीने पालकांची अवस्था काय होते, याची मात्र या मेसेजवरून कल्पना येऊ शकते. एका विचित्र आजाराने या मित्राची मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहे. तिच्यावर उपचार करून तिला लवकरात लवकर या आजारातून बाहेर करण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची या मित्राची तयारी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही या आजारावरील उपचार करण्यासाठी तिला घेऊन जाण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याने मला सांगितले, आणि मला या धाग्याची आठवण झाली.

हिमा दास, फीलिंग प्राऊड आणि मनातले काही !!!!

रुस्तुम ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिमा दास, फीलिंग प्राऊड आणि मनातले काही !!!! हिमा दासने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्ण पटकावलं आणि माझ्या बकेट लिस्ट मधील एका गोष्टीवर अर्धी टिक आली (अर्धीच म्हणतोय कारण पूर्ण ऑलिम्पिक सुवर्ण पदकानंतरच होईल. तसे अभिनव बिंद्राने सुवर्ण जिंकलेले पण ते पाहण्यात नव्हते आले फक्त वाचण्यात आले होते). तशी ही गोष्ट बुकेत लिस्ट वर अचानकच आली म्हणजे २०१६ मधील ऑलिम्पिक बघताना. बरेचसे इंग्लिश शब्द/वाक्य आपण अगदी सहजगत्या त्या शब्द/वाक्यांमागच्या भावनेचा विचार न करता फेकत (पक्षी:वापरत) असतो जसे की सॉरी, थँक यू आणि असेच.. त्याच पठडीतले एक वाक्य म्हणजे "U make us feel proud/feeling proud".

८६ वर्षांचं तारुण्य हरपलं!

अबोलघेवडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आदरणीय सर – कोणी म्हणेल की आता तर सर गेले मग आता त्यांना पत्र लिहून कसं चालेल? पण आमच्यासाठी तुम्ही गेला नाहीत सर. आपल्या धडाडीने कर्तृत्व गाजविणाऱ्या असामान्य लोकांच्या बाबतीत लौकीकार्थाची फुटपट्टी लावायचीच नसते. स्वतःच्या मृत्यूने नाहीशी होतात ती सामान्य माणसं. तुमच्यासारखी माणसं तर हयातीत आणि मरणानंतर लोकांच्या हृदयात विराजमान असतात. अशी माणसं कधी मरत नाहीत. सॅटर्डे क्लबच्या संस्थापकाला शनिवारीच आपल्या जवळ बोलावून साक्षात मृत्यूनेच तुम्हाला मानवंदना दिली सर. काहीच दिवसांपूर्वी तुम्हाला पहिल्यांदाच (आणि शेवटचंच) भेटायला तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो.

आईचा मुलगा

शिव कन्या ·
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात. त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.

कणेकरसाहेब.... तुमनेच हमको बिघडव्या !

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
वो क्या है.... हमारे लहानपणी... जर वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका... वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका. ऐसा. लेकिन... मगर (येस्स्स्स.. दोन्हीही).. उन दिवसोंमें पुस्तकोंमे जरा वरण भात जैसा लिखाण होता था. मला नक्की काय म्हणायचंय ते तुमच्यासारख्या interpretative analytical in-depth reporting करणार्‍या माणसाला एरवीच कळालं असेल. आमचं बालपण - आम्ही टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर, फुले नाही... पण आम्ही पुण्याचे असल्यामुळे आम्ही टोणगेपण किंवा कार्टेपण वगैरे पार करून डायरेक्ट बालपणाला क्वालिफाय होतो. तर आमचं बालपण गेलं पुण्याच्या पेठांमधे. आमचा पुस्तकांचा खुराक म्हणजे पु.लं, द.मा. मिरासदार, भा.रा.

.... बाकी तुमचं चालू द्या।

जे.पी.मॉर्गन ·
काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या! काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या! फेसबुकवर पोस्ट वाचली....मुसलमानांनी नेहेमीच हिंदूंना.... वगैरे वगैरे.

३५ रियाल

शिव कन्या ·
वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला. दुपारच्या टळटळीत उन्हात रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं.... मागे पडण्याऱ्या दुतर्फा खजुराच्या झाडांबरोबर त्याचे विचारही पळू लागले. ‘..... काये त्याला अक्कल? मी आलो आणि लेबर प्रॉब्लेम मिटवला. कामं मार्गी लागली. मी कागदावर काय आहे, काय नाही, ते जाऊ दे यांच्या उंटाच्या ***. पण प्रोजेक्ट मार्गी लागला ना!

सामाजिक उपक्रम -२०१८

निशदे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम आता मिपाला नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मिपाकरांनीही गेल्या वर्षी भरभरून साथ दिली. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो. ह्या वर्षी ५ पैकी 2 संस्था ह्या नोंदणी झालेल्या असल्या तरी त्यांना देणगी दिल्यावर अजून ८०जी कर सवलत मिळत नाही.

प्रिय मायमराठी

शिव कन्या ·
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.