Skip to main content

सद्भावना

श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 13/09/2019 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंत्रमुग्ध मी! माझ्या लेखाचं शीर्षक वाचून आणि मी जे काही लिहिणार आहे ते वाचून कदाचित काही जणांना वाटू शकतं की पंतप्रधानांना भेटता आलं.... अगदी जवळून बघता आलं..... बोलायला मिळालं..... याबद्दल ही उगाच शेखी मिरवते आहे. पण खरं सांगू? सात सप्टेंबर 2019 ही माझ्या आयुष्यातली सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावी अशी सकाळ होती-आहे-आणि राहील. त्यामुळे खूप विचार करून ठरवलं; कोणाला काहीही वाटू दे; आपल्या मनातला आनंद, आयुष्यभर जतन करावा असा हा क्षण; त्याबद्दल लिहिलंच पाहिजे!!! तर....

भाग २ - जब वी मेट - ताठ मानेचा सार्जंट तादळे...

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/09/2019 00:28 या दिवशी प्रकाशित केले.

भाग २ - जब वी मेट - ताठ मानेचा सार्जंट तादळे...

1 'आजचा दिवस माझा' सिनेमा ज्यांनी पाहिला असेल त्यांना वरील अंध गायकांना महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री एका रात्रीत कलाकार कोट्यातून राहायला घर द्यायला सरकारी यंत्रणा कामाला लावून चंग बांधतात आणि प्रत्यक्षातआणतात. ते ज्या कारणाने घडते त्याच्या मुळाशी त्यांचा अहंकार दुखावतो... कारण त्या रात्रीच्या एका कार्यक्रमाला उपस्थित बडे बडे धनी, प्रतिष्ठित उच्चभ्रू त्यांचा आगमनाप्रित्यर्थ मान राखत उभे राहून अभिवादन करत असतात.

एका 'डोळस' प्रेमाची गोष्ट

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/08/2019 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची घटना असते. त्यासाठी सुयोग्य जोडीदार निवडणे हा वाटतो तितका सोपा प्रश्न नसतो. ‘बघून’ करावयाच्या लग्नांमध्ये जोडीदार-निवडीचे अनेक निकष (फूटपट्ट्या) लावले जातात. असे निकष कोणते असावेत आणि कशाला किती महत्व द्यायचे हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून आहे. त्यात काही गैर नाही. या लेखाच्या अनुषंगाने मला फक्त एका निकषाकडे लक्ष वेधायचे आहे. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीतील शारीरिक व्यंग. विवाहेच्छू तरुण-तरुणींकडे जर आपण एक नजर टाकली तर काय दिसते? जी व्यक्ती शरीराने धडधाकट आहे ती आपला जोडीदार निवडताना त्याच्यात कुठलेही ठळक व्यंग नको हे जरूर पाहते.

मिसळपाववरचं शिफारस करण्यायोग्य साहित्य

लेखक इरामयी यांनी बुधवार, 31/07/2019 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस मिसळपाव धुंडाळत असताना असं लक्षात आलं की मिसळपाववर केवढं वैविध्यपूर्ण आणि सुंदर लेखन झालेलं आहे! आज २०१९ मध्ये पूर्वीचं चांगलं लेखन हुडकून काढणं हे खूप कठीण आहे. या ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधताना बरेच उत्तम लेख, काव्य, मालिका निसटून जाण्याचीच शक्यताच जास्त. त्यामुळे हा नवा धागा. मिसळपाववर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रिय लेखनाची एका ठिकाणी यादी करता येऊ शकेल का?

युगांतर- आरंभ अंताचा!

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 19/07/2019 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा! युगांतर- आरंभ अंताचा! महाभारत! ही कथा नक्की कोणाची? सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची?

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 17/07/2019 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

माझ्या आठवणीतला तात्या

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 17/05/2019 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
"आम्ही तात्याला पहिला नाही"अशा काही प्रतिक्रिया पाहिल्या आणि वाटलं, तात्याचे चार फोटू टाकावेत. मात्र जे फोटो डोळ्यापुढे होते, ते संगणकात नव्हते हे जाणवले आणि स्व्तःवरच चरफडलो. २००५ च्या सुमारास शिवाजी पार्कवर भरलेल्या पहिल्या वहिल्या कट्ट्यात टिपलेले "असा घ्यायचा शास्त्रिय संगिताचा आस्वाद"यावर तात्या रंगात येऊन बोलत असतानाचे फोटो..... मधे एकदा अचानक पुण्याला जायची लहर आली. मी, तात्या, जयन्तराव कुलकर्णी, बहुधा माधव कुलकर्णी पण होते. काही पुणेकर मंडळी थेट तिथेच मैफिलीत सामिल झाली, रात्री बरोबर मैफल रंगत गेली.

[लाज] - श श वि

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 12/02/2019 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात विज्जुभाउंची ही कथा दिवसभर मंत्रालया बाहेर बंदोबस्तासाठी उभे राहून वैतागलेला राणे हवालदाराचा घरी जाताना थोडीशी टाकून जाणे हा दिनक्रम होता. आजची रात्र काही वेगळीच होती. बेस्टच्या बसने सोडलेला धुर रस्त्यावर पसरला होता. त्यातून नाकासमोर हात हलवता चालताना राणेसाहेब ओसांडून वहाणाऱ्या कचराकुंडीपाशी जरासे रेंगाळले. कुंडीच्या मागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राणेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ". कुंडीमागे कोणीतरी होते. त्यांनी काठीने जरासे ढोसले आणि दचकून जोरात “हाड” असे ओरडले.

जेवीद्वि व्रत - द्विभूक्त्स्य वजनो दास:

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 23/12/2018 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नगर होते. तेथे एक मध्यवयीन, मध्यमवर्गीय सद्गृहस्थ रहात होता. खाऊन पिऊन सुखी होता, चरबी आणि ढेरी बाळगून होता परंतु शारीरिक समस्येमुळे त्रासाला होता. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे पिडला होता. प्रयत्न करूनही कमी न होता, कलेकलेने वाढणारे वजन आणि पुढे येणारी ढेरी यामुळे गांजला होता. वजन आणि ढेरी कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकला होता. वाढत्या वजनाबरोबरीने येणारे विविध आजार त्याला भीती दाखवत होते. काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर पोट आत ओढून ओढून दमला होता. वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी अर्धबरीच्या सूचना ऐकून ऐकून कंटाळला होता.

वाढदिवस

लेखक निओ यांनी मंगळवार, 04/12/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.