नमस्कार मंडळी,
आज ८ नोव्हेंबर! उभ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पु.ल.देशपांडे उर्फ भाईकाका यांचा ९१वा जन्मदिवस. आपल्या विनोदी साहित्याने संपुर्ण महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारा हा अवलिया!!
चि.वि.जोशी, आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गज विनोदी साहित्यीकांच्या साक्षीने आपल्या विनोदी लिखानाची सुरूवात केलेल्या पुलंची साहित्य संपदा उत्तरोत्तर आणखीनच बहरत गेली.
हरितात्या, नारायण, सखाराम गटणे, बोलट, अंतू बर्वा त्यांनी रेखाटलेल्या या व्यक्तीरेखा मराठी साहित्य विश्वात अजरामर झाल्या.