Skip to main content

प्रतिसाद

प्रिय विनील,

लेखक श्रावण मोडक यांनी बुधवार, 23/02/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र.

अनाथ लेकरायची माय

लेखक बाबुराव यांनी रविवार, 20/02/2011 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
अनाथ लेकरांची माय सिंधुताई सपकाळ. दोन हजारापेक्षा अनाथ मुलांना सांभाळणारी. घरातून हाकलून दिल्यानंतर वणवण फिरणारी. आपल्या पोटच्या मुलीला दुस-याकडे सोपवून मोठ्या जिद्दीने अनाथ मुलांना सांभाळणारी. अशी ही माय गावोगाव आपले अनुभव सांगत असते. आपण काय जगतो त्या कष्टांचा पाढा वाचते. आयाबायांना जगायची हिम्मत देते. त्यायचे अनुभव ऐकतांना डोळे भरतात. तीन वर्ष भीक मागावी लागली. स्मशानात झोपावं लागलं. काय नी काय अनुभव. वक्तृत्त्व पाहिल्यानंतर बहिणाबायची आठवण येते. आता कितीतरी पुरस्कार आणि कितीतरी मोठं काम चालू आहे. अनुभव कथन संपल्यानंतर लेकरांसाठी जमले तशी मदतीची हाक भरते.

"सिंगिंग इन द रेन"

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/02/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजच बातमी ऐकली की उत्तर भारतामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि मला एका पाऊस-गाण्याची आठवण झाली. गाण्याबरोबर आठवला ते गाणं ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट आणि त्याचे अप्रतिम, देखणं सादरीकरण. या माझ्या एका आवडत्या हॉलिवूडपटाची - म्युझिकलची मिपाकरांना ओळख करुन द्यायचा छोटासा प्रयत्न! १९५२ साली एका हॉलीवूड चित्रपटाचा मूकपट ते बोलपट प्रवास गमतीशीर पद्धतीने सांगणारा हा एक चित्रपट निघाला होता.

हा मराठी माणसा बद्दल आकस का ?

लेखक मराठी_माणूस यांनी रविवार, 30/01/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळि खालील लेख वाचनात आला. हे एका पुस्तकाचे परीक्षण आहे . त्यात बासू चटर्जींनी त्यांचे काही अनुभव सांगीतले आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7386077.cms त्यात बासुदानी चीत्रपटात राजा परंजपे ना घेतल्या बद्दल , ताराचंद बडजात्यानी खालील हीणकस शेरा मारला आहे ' आप किसको लाये है ये मराठी से?' कोणतीही गुणात्मक टीका नसुन फक्त मराठी म्हणुन ईतकी टोकाची भुमीका ? तीही मराठीतील इतक्या गुणी अभीनेता आणि दिग्दर्शका बद्दल ?

स्पेस शटल चॅलेंजर

लेखक विकास यांनी शनिवार, 29/01/2011 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती. स्पेस शटलचे तंत्रज्ञान विकसीत करून पुन्हा पुन्हा तेच वाहन आंतराळात उपग्रह सोडण्यासाठी तसेच मानवी वावरासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी वापरणे आता नवीन राहीलेले नव्हते.

केकलेस !

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 28/01/2011 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
च्यायला आज मिपा बर जो येतो तो केकच्या पा.कृ. टाकतोय! गणपाशेटने रचिला पाया स्वाती झालिसे कळस .. अर्र चुकलं.. गणपाशेटने रचिला बेस आणि स्वाती झालीसे क्रीम अशी अवस्था झाली आहे. हे सगळं कमी म्हणून कोणीतरी एगलेस केक आणि (गव्हाचं) पिठलेस केकची मागणी करतंय!!! आणि ते आव्हान मिपावरची शेफमंडळी अहमहमिकेने उचलतात काय! .. शेवटी आम्ही पण ठरवलं की ह्या सगळ्या केकाटण्यात आपला पण सहभाग असलाच पाहिजे! अर्थात ज्या माणसाला चहाचं आधण ठेवता येत नाही अशा म्या पामराने मिपावरच्या दिग्गज बल्लवांच्यां (आणि बल्लविणींच्या) लायनीत उभं राहायचं म्हणजे फक्त अशक्य!

डांबीस डोंब्या

लेखक धनंजय यांनी शनिवार, 22/01/2011 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
डांबीस डोंब्या - - - - - - - -
पहाट झाली आणि पाण्याच्या चकचक चकाकीमुळे डोंब्या डोमकावळ्याची झोप मोडली. "आईने न्याहारीसाठी काय बरे केले असेल?" म्हणून त्याने डोळे किलकिले केले. "क्राऊ-क्राऊ आऊ, काय-काय खाऊ?" म्हणून त्याने आईला हाक मारली. काहीच उत्तर आले नाही. मग त्याला आठवले. कालच आई त्याला किती रागावली होती - "एवढा मोठ्ठा बगळा झालास, पण तरी आईकडूनच दाणा हवा! उद्या पहाटे उठायचे नि स्वतःच खायचे शोधायला जायचे." रागवल्यामुळे आई उत्तर देत नसेल ना? त्याने डोळे मोठ्ठे करून बघितले. अबब!

१२३.४

लेखक गवि यांनी गुरुवार, 13/01/2011 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लाईंग शिकणं हा माझ्या एरव्हीच्या लाईफपेक्षा भलताच जास्त झापडिंग काळ होता.. त्यात मी जाम मजा केली..जाम लोचे केले आणि जाम झगडा केला..भीतीशी, निराशेशी,अभ्यासाशी, आकाशाशी, हवेशी आणि व्हॉट नॉट..!! हवेत उडताना एका एरियाताली सर्व विमानं एकाच फ्रिक्वेन्सीवर बोलत असतात..तरट फाटल्यागत आवाजात घोगरं घोगरं बोलून पायलट कोणावर स्टाईल मारतात कोण जाणे.. पण त्यामुळे होतं काय की सर्वांचं बोलणं सगळेच ऐकत असतात..आणि एकजण बोलायला लागला की त्याने माईक सोडेपर्यंत बाकी सगळ्यांची बोलती बंद.. म्हणून अत्यंत मुद्द्याचं तथा थोडक्यातच बोलायचं असतं.. मोठ्या विमानात पायलट आणि को-पायलट एकमेकांशी टी.पी.

परा आणि धमु

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 08/01/2011 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
'रामदासांचा अर्थबोध' या धाग्यात लिहिलं होतं - "पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत." अशी आणि ही या दोन शब्दांतील अंतर दूर झाले आहे. ;) 'सामना'च्या 'फुलोरा'मध्ये आज मिपाचे दोन वीर झळकले आहेत. परिकथेतील राजकुमार - प्रसाद ताम्हणकर. धमाल मुलगा - कैवल्य देशमुख. पराने लिहिलंय ते दहावी-बारावीची तयारी या विषयावर वेबविश्वात काय चालतं याविषयी, तर धमुने लिहिलं आहे दुबईच्या 'गोल्ड सूक'विषयी. फुलोरावर क्लिक करा. दोघांचेही लेख वाचा. दोघांचेही अभिनंदन.

वन लाइनर्स

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 07/01/2011 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व) व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच . त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.