Skip to main content

प्रतिक्रिया

(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 21/06/2012 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी) सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे. बरेच चित्रपट येतात जातात, बर्‍याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते.. मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी. मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे माझ्याकडून कांही गाणी, १) मै तो रस्ते से जा रहा था.. २) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता..

बापुजींच्या चेहर्‍यावरील हास्य मावळणार..?

लेखक डावखुरा यांनी रविवार, 17/06/2012 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
नोटांवरची गांधींची मक्तेदारी आता संपण्याची चिन्ह दिसतायंत.. आणि बर्याच वर्षांनी रिजर्व बँकेलाही पटलंय की बापुंव्यतिरिक्तही महापुरुषांनी भारतात जन्म घेतला होता आणि त्यामुळेच शिवाजी महाराज आणि आंबेडकरांनापण राष्ट्रीय चलनावर झळकण्याची संधी मिळतेय पण .... . . . . . . . . . . त्याबरोबर सोबत अजुन दोन गांधी आहेतच, . . जाउद्या उशिराने सुचले तरी ते शहाणपणच म्हणवेल निर्णयाबद्दल खुद्द आम्ही रिजर्व ब्यांकेचे ऋणी राहु...

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

एका वेश्येचे मनोगत..............

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 12/06/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मीना शेषु व त्यांची संग्राम हि संस्था वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी सातारा शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

तुकाराम... हे राम !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 11/06/2012 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामांची बेअब्रू झाली किंवा नालस्ती झाली तर आपल्याला केस गुदरता येते का हो ? का तुकोबांचे नातेवाईक असणे कंपल्सरी आहे ? तुकोबांच्या बाबतीत मानवी हक्क संघटना मदत करू शकेल काय ? बराच गाजावाजा झालेला आणि चालू असलेला तुकारामा हा चंद्रकांत कुलकर्णी ह्यांचा चित्रपट पाहून (खरेतर पहिल्या ४ मिनिटातच) पडलेले हे काही प्रश्न. खरंच सांगतो, एक..फक्त एक थप्पड किंवा बुक्का तुकारामांना कोणालातरी मारताना दाखवले असतेना तर हा चित्रपट सौथ स्टाइल म्हणून आरामात खपवता आला असता.

प्रोमीथीयस (Prometheus)

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/06/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रोमीथीयस नावाचे एक भव्य अंतरा़ळ यान पृथ्वीपासून करोडो मैलांवर असलेल्या एका आकाशगंगेतल्या सुर्यमालिकेतील एका ग्रहावर एका मिशनसाठी चालले आहे. त्यात सर्व अंतराळवीर दीर्घकाळीन (दोन वर्षांहून अधिक) झोप घेऊन तो ग्रह जवळ आल्यामुळे उठुन त्या ग्रहावर उतरण्यासाठी तयार होत आहेत. सर्वजण उठून तयार झाल्यावर वेलॅन्ड कॉर्प.

फूटबॉल युरो चषक - २०१२ : शुभारंभ आणि गुणतक्ता

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 08/06/2012 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. क्रिकेटचा वर्ल्डकप झाला आणि भारतात दिवाळी साजरी झाली, त्यानंतर सगळ्यांचा जीव लटकवुन ठेवलेले तेंडल्यांचे शतकांचे महाशतक झाले आणि पुन्हा एकदा लोकांनी दिवाळी केली. झालेच तर क्रिकेटचे भारतीय धंदेवाईक व्हर्शन 'आयपीएल' ही झाले. मध्यंतरी बुद्धिबळ विश्वचषकही झाला आणि विश्वनाथन आनंदने तो जिंकुन कमाल केली. सध्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा धुमाकुळही चालु आहे आणि नदाल नेहमीसारखा क्ले कोर्टवर एकेक प्रतिस्पर्ध्यांना शब्दशः धूळ चारत आहे.

रावडी राठोड

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 07/06/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
रावडी राठोड ह्या चित्रपटाच्या नावातच फक्त दम आहे. हे येवढे वाक्य सांगून खरेतर चित्रपटाचे परीक्षण मांडता येईल इतका हा चित्रपट डोक्याला शॉट आहे. सध्या आपल्याकडे साऊथच्या चित्रपटांच्या रिमेकची एक लाटच आली आहे, त्यातले काही चित्रपट चांगला पैसा मिळवण्यात यशस्वी देखील झाले आहेत. ह्याच वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचा प्रभुदेवा आणि संजय लीला भन्साळीचा प्रयत्न म्हणजे रावडी राठोड. हा चित्रपट रवी तेजा च्या गाजलेल्या विक्रमार्कूडू चा हिंदी रीमेक आहे.