Skip to main content

बापुजींच्या चेहर्‍यावरील हास्य मावळणार..?

लेखक डावखुरा यांनी रविवार, 17/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नोटांवरची गांधींची मक्तेदारी आता संपण्याची चिन्ह दिसतायंत.. आणि बर्याच वर्षांनी रिजर्व बँकेलाही पटलंय की बापुंव्यतिरिक्तही महापुरुषांनी भारतात जन्म घेतला होता आणि त्यामुळेच शिवाजी महाराज आणि आंबेडकरांनापण राष्ट्रीय चलनावर झळकण्याची संधी मिळतेय पण .... . . . . . . . . . . त्याबरोबर सोबत अजुन दोन गांधी आहेतच, . . जाउद्या उशिराने सुचले तरी ते शहाणपणच म्हणवेल निर्णयाबद्दल खुद्द आम्ही रिजर्व ब्यांकेचे ऋणी राहु...

वाचने 8280
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

वरील व्यक्तींना नोटेवर आणले की बाजारात रुपयाची पत वाढेल असे रिजर्व बँकेला वाटतेय की काय ? चला तेवढाच जरा टाईमपास. आता प्रत्येक राज्यातले राजकारणी आमचा महान नेताही नोटेवर हवा अशी मागणी करतील.बिजु पटनाईक्,एम्.जी.आर.,जयप्रकाश नारायण्,ज्योति बसुना नोटेवर आणायची मागणी नक्की होणार.

ते माहीत नाही..पण गांधीजींचे मक्तेदारी संपणार..हे नक्की.. आणि काय फरक पडणार आहे..प्रत्येक राज्यातील चांग्ले नेते नोटेवर आले तरी..असेही कॉईन वर विविध प्रकारचे नेते किन्व सरकारी योजना..नाहीतर राष्ट्रीय दिन असे बरेच प्रकार असतातच की छाप्याच्या बाजुवर..

In reply to by अत्रुप्त आत्मा

तिथे प्रत्यक्षात ढमाल उडणार की नाही ही दुरची गोष्ट आहे..पण ईथे नक्केच सुर्वात झालीय.. ;)

चला आर्थिक आरिष्ठ्यावर काहीतरी उपाय सापडला रिझर्व बँकेला! :) अवांतरः एक क्रिएटिवीटी अ‍ॅट इट्स बेस्ट असा सब्जेक्ट असलेला फोरवर्ड फिरतोय. त्यात एका नोटेवरच्या गांधिंना समर आणि विंटर स्पेशल म्हणून एकदम 'यो बॉय' लूक दिला आहे एका व्रात्य चित्रकाराने!

गांधीजींखेरीज इतरही महान व्यक्तींचे (महापुरुष जाणूनच म्हणत नाहीये कारण महान स्त्रियांना का वगळले जावे? ) चित्र छापले जाईल म्हणून त्यांचे हसू मावळले असे (अलंकृतरीत्याही) का म्हणावे? एक तर त्यांचे चित्र छापणे बंद तर होणार नाहीये ना? अन इतरांचे सुरू झाले म्हणून त्या महान आत्म्याला नक्कीच आनंद होईल. व्यक्तिशः मला हे धोरण जरा धोकादायक वाटते. आजही चलनी नाण्यांवर इतरांच्या प्रतिमा आहेतच. यात (माझ्या माहितीप्रमाणे) केवळ १ रुपयाचा समावेश होतो. नोटांवर असे करताना जर कुणी आक्षेप घेतला की आम्ही मानतो त्यांचे चित्र १० रु च्या नोटेवर अन इतर लोक ज्यांना मानतात त्यांचे चित्र ५० च्या नोटेवर तर ते अवघड जागेचे दुखणे होऊन बसेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

नोटांवर असे करताना जर कुणी आक्षेप घेतला की आम्ही मानतो त्यांचे चित्र १० रु च्या नोटेवर अन इतर लोक ज्यांना मानतात त्यांचे चित्र ५० च्या नोटेवर तर ते अवघड जागेचे दुखणे होऊन बसेल...
हा मुद्दा माझ्यापण डोक्यात आदळला होता..पण म्हट्लं शुभ कार्यात कशाला असे विघ्न घाला... आणि पुरुषांप्रमाणे स्त्रियांनापण मान मिळायला पाहिजे...हे मत पटलंय म्हणून ईंदिरा गांधी पण आहेत की लिस्ट मध्ये..

रुपयाखालची नाणी परत चालू करा व त्यावर राज्यातल्या नेत्यांची चित्रे छापा. म्हणजे एक 'चवन्नी' च्या ऐवजी एक 'छगन्नी" आणि एक 'अठन्नी' च्या ऐवजी एक 'आठवन्नी' असेही म्हणता येईल.

In reply to by डावखुरा

काही सन्माननीय अपवाद सोडले तर , सध्याच्या राजकारण्यांची किंमत माझ्या लेखी शून्य आहे. त्यांना फक्त उपद्रवमूल्य आहे.

च्यायला, अता खोट्या नोटा ओळखणे आजुनच जिकिरीचे होउन बसणार..... कुठल्याही महान व्यक्तीचे फोटो नोटेवर छापण्याच्या व्यक्तीशः मी विरोधी आहे. त्या पेक्षा प्राणी , पक्षी, ताजमहाल, गेट्-वे-ऑफ इंडिया छापावा असे वाटते.... त्यामुळे जोषीबोवा म्हणतात तशी भांडणे पण होणार नाहीत.

कुणाच्या पुतळे, फोटो, स्मारक यामुळे जर खरच स्फूर्ती मिळत असती तर आज समाजात एवधे गुन्हेगार नसते. या निर्णयामुळे जातियवादी शक्तीच्या हातात आयते कोलित मिळुन देश अजुन विभागला जाउ शकतो.

रिझर्व बँकेने स्वा. सावरकर, प. पू हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांचेही छायाचित्र लावावे आणि ही चिडचिड थांबवावी.

आयला काय फाल्तुगिरि आहे. चित्र टाकुन काय होनार आहे. जाउदे आपलि लोकशाहि(?) हिच एक फाल्तुगिरि आहे. (Don't take seriously).......

ग्रुप फोटो चे कल्पना वाचून पानवाला आठवला.

In reply to by तर्री

तसेही यापुढे आता कोणाचे फोटो लावायचे याच्यावरून राजकारण एवढे होईल की बापूजींच्या फोटोप्रमाणेच कुणी निप्पाणीचे समाजसेवक शिवाप्पा वणकुद्रे यांनी केलेल्या 'समाजसेवे'चा आदर करून त्यांचा फोटो/चित्र असणारी नोट काढावी अन्यथा भारत बंद पुकारला जाईल असे फ्लेक्स तरुण नेते बसवप्पा शिवप्पा यांच्यातर्फे लावण्यात येतील. सगळ्यांना जागा करून देता देता पानवाल्याच्या करामतीचीच आठवण होणार आहे. मज्जाच मज्जा. अवांतरः पूर्वी लहान पोरे सिगरेटची पाकिटे, स्टँप वगैरे जमा करत तसे आता नोटा जमा करतील काय? म्हणजे 'तुझ्याकडे दोन मुकेश अंबानी आहेत त्यातला एक मला दिलास तर मी तुला दोन सुब्रतो रॉय देईन' अशा चर्चा मुलांमधे ऐकू येतील काय? की ब्लडी देसी नोटाच शेवटी लिंकनच्या किंवा वॉशिंग्टनचा फोटो असलेल्या डालरची सर त्यांना कशी येणार असे तुच्छतेने म्हणून त्या नोटा देऊन मॅक्डीचा बर्गर खरेदी करतील?

हे असले नेत्यांचे वगैरे फोटो नोटेवर अजिबात छापू नये असे आमचे वैयक्तिक मत आहे. भले जर कुणा माणसाचाच फटू छापायचाच असेल तर समस्त भारतीय जनतेचा प्रतिनीधी म्हणून आमचा फटू लावावा. (तसेही आमचे मित्र आम्हाला असा न तसा थुक्का लावत असतातच, फटू छापल्यावर अख्खी भारतीय जनता थुक्का लावेल. :) )

In reply to by नाना चेंगट

ओ नाना..नाहीतर आरके चा कॉमन मॅन चालन का[तुमचा प्रतिनिधी म्हणुन]? आमच्याकडे तुमचा फोटुच नाहीये..

In reply to by नाना चेंगट

नाना अरे तुझा फोटो असलेला श्टांप काढायचाय ना. आता हे नोटेचे मधेच कुठे काढलंस? अवांतरः नोटा ठेवण्याच्या विशिष्ट जागांकडे नजर ठेवून तर हा प्रस्ताव दिलेला नाहीस? ;)

गांधीजी, शिवाजी, आंबेडकर आदींची चित्रे नोटावर छापून जर त्या टेबलाखालून पाकीटातून सरकवण्यासाठीच वापरल्या जाणार असल्या तर अशा विभुतींचा सन्मान आहे की जनतेने पाळलेला आदर? त्यापेक्षा नकोच ना ते! नाहीतरी चेक फाडताना त्यावर कुठे चित्र लागते? :)

In reply to by विकास

भले शाब्बास. म्हणजे बापूंचा अपमान झालेला चालतो तुम्हाला? मी तर म्हणतो चेकवर पण महापुरुषांचे फोटो आले पाहिजेत.

In reply to by मृत्युन्जय

अहो पण रिश्वतखोर चेक स्वीकारत नाहीत ना.. आणि बाकी नेत्यांचाही अपमान व्हाव म्हणुन तर तुम्ही ह्या निर्णयाचे स्वागात करीत नाहीयेत ना?

In reply to by डावखुरा

लाच दिल्या घेतल्यामुळे नेत्यांचा अपमान होतो. नोटा म्हणजे लक्ष्मी. लाच दिल्या घेतल्यामुळे देवीचा अपमान होतो? आणि होतो तर मग बापूंचा अपमान झालेला चालतो तुम्हाला?

In reply to by मृत्युन्जय

हल्ली चालतो. अर्ध्या चड्डीतली पोरं सुद्धा हल्ली गांधीबाबाचा अपमान करू शकतात. गोबेल्स काय फक्त जर्मनीत असतात? काही वर्षांनी गांधीजी हे इंग्रजांचेच हस्तक होते हे 'सत्य' सर्वमान्य होऊन जाईल, आहात कुठं? नि स्वातंत्र्यलढ्याचे श्रेय त्यावेळी अस्तित्वातही नसलेले - म्हणजे आजच्या इतिहासाच्या मान्यतेप्रमाणे, तेव्हाचा इतिहास वेगळा असणार हे उघड आहेच - लोक घेऊन जातील. पाकिस्तानात आता 'भारतीय शास्त्रीय संगीता'ला निर्लज्जपणे 'पाकिस्तानी क्लासिकल' म्हणतात तसे. चालायचेच. हातात दंड असला की इतिहास हवा तसा बदलून घेता येतो साहेब.

In reply to by रमताराम

फारच डीप प्रतिक्रिया...पण सत्याच्या बाबतीत अजुन फार कन्फ्युजन आहे मनात..जर ते तुम्हाला खरं माहीत असेल तर वेगळ्या येणार्‍या धाग्याचे मनापासुन स्वागत आहे..

In reply to by रमताराम

फारच डीप प्रतिक्रिया...पण सत्याच्या बाबतीत अजुन फार कन्फ्युजन आहे मनात..जर ते तुम्हाला खरं माहीत असेल तर वेगळ्या येणार्‍या धाग्याचे मनापासुन स्वागत आहे..

In reply to by रमताराम

अर्धेच काहीतरी वाचून पिंका टाकण्यापेक्षा चड्डी परवडली की हो! ;) आणि हो, अर्धी पँट घालणारी (ज्याला माझ्या माहितीप्रमाणे चड्डी म्हणतात) घालणारे माहीत आहेत, पण, अर्धी चड्डी नक्की कोण घालते? :-)

In reply to by विकास

सारा प्रतिसादच अवांतरः माझा प्रतिसाद तुम्हाला उपप्रतिसाद नाही. सबब, तुम्हाला उद्देशून काहीही लिहिलेले नाही. गांधीबाबाचा अपमान ही फारशी मनाला लावून घेण्याची गोष्ट राहिलेली नाही एवढा प्रतिसाद मृत्युंजय यांना दिलेला आहे. सबब इतरांनी बळंच मधे घुसू नये. क. लो. अ. (पूर्ण चड्डी ऊर्फ पँट वापरणारा) रमताराम

In reply to by मृत्युन्जय

भले शाब्बास. म्हणजे बापूंचा अपमान झालेला चालतो तुम्हाला? माझा प्रतिसाद नक्की वाचूनच प्रतिसाद दिलात का? कारण माझे वाक्य (आणि त्याची सुरवात) पहा:
गांधीजी, शिवाजी, आंबेडकर आदींची चित्रे नोटावर छापून जर त्या टेबलाखालून पाकीटातून सरकवण्यासाठीच वापरल्या जाणार असल्या तर अशा विभुतींचा सन्मान आहे की जनतेने पाळलेला आदर?
आता यात गांधीजी पहीलेच असताना तुम्हाला प्रश्न कसा पडला? का गांधीजी आणि बापू हे वेगळे वाटतात? यावर बाकी पण कोणी न वाचता दिलेल्या प्रतिक्रीया पाहून आश्चर्य वाटले. असो.

सर्व काही सुरळीत गेले तर ठीक...नाहीतर व्यंग चित्रांप्रमाणे नोटेचीत्रे पण हद्दपार होतील !