Skip to main content

प्रतिक्रिया

हस्ताक्षरातील अक्षर...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 24/01/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा - निरोप

लेखक यकु यांनी सोमवार, 16/01/2012 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -२ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -३ एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -४ सायंकाळची कातरवेळ संपून अंधार आणखी दाटून आला आणि पायाखालचा रस्ता पुसट झाला. झपाट्याने पुढे गेलो. मागच्या आश्रमाच्या पायर्‍यांजवळ आम्हाला मागे टाकून निघालेली ‍ती त्रिमूर्ती डगर चढताना दिसली.

बसचा प्रवचा, वैद्य सी.के. राजगुरू, मूळव्याध, वाक्यरचना वगैरे वगैरे..! :)

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 30/12/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच शहरी बसने प्रवास करत होतो. बसच्या आतल्या बाजूने ज्या जाहिराती लावलेल्या असतात त्यापैकी एका जाहिरातीकडे आमचं लक्ष गेंलं. जाहिरातीतलं एक शीर्षकवजा वाक्य होतं - 'निष्णात वैद्य राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय उपलब्ध..' हे वाक्य वाचल्यावर आमचा थोडा घोटाळाच झाला. वाक्यरचना थोडी चुकीची वाटली. कारण ते वाक्य आम्ही असं वाचलं - 'निष्णात वैद्य सी. के. राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय..' म्हणजे खुद्द वैद्यबुवांनाच मूळव्याध झाली आहे आणि या जाहिरात्रीद्वारे कुणी आम्हाला त्यांच्या मूळव्यधीवर उपाय करण्याचे आवाहन करत आहे किंवा कसे?

काही गमतीदार किस्से .......

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 22/12/2011 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
काही गमतीदार किस्से ....... आपल्या आयुष्यात अशा काही गमतीदार ,मजेशीर घटना घडतात कि त्या बरयाच काळापर्यंत आठवणीच्या कोपरयात घर करून बसतात .कधी काळी आपण निवांत क्षणी त्या गोष्टी स्मरतो अन अलगद ,नकळत आपले आपल्यालाच हसू येत , भलेही लोकाना वाटेल ह्याच्या /हिच्या डोक्याला शॉट लागला आहे का ? एकटाच / एकटीच का हसत आहे ?

कोड ऑफ कंडक्ट

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 07/12/2011 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्या देशात लोकशाही आहे की सरंजामशाही"? मी वाफाळता चहा घेता घेता एकदम आवेशात बोललो. "काय झाले सक्काळी सक्काळी", आमचे अर्धांगं. "अरे, आता आमच्या बोलण्या चालण्यावर बंधने आणण्याची तयारी चाललीय ह्यांची.", मी. "मी अजून पेपर वाचलेला नाही, मेलं सकाळी उठल्यापासून तुमची आणि मुलांची उठबस करावी लागतेय, लोकशाही नाहीच आहे इथे.", उंच आवाजात आमचे अर्धांगं कडाडले. त्या आवाजाच्या "उंची" वरून जाणवले की आता आपल्या कोंडलेल्या भावनांना ऐकण्यासाठी जर श्रोता हवा असेल तर बायकोशी मांडवली करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मी लगेच आवाजात जरा मार्दव आणले.

येळकोट येळकोट जय मल्हार!!

लेखक यकु यांनी मंगळवार, 06/12/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.