कोलावरी कोलावरी डी..
एक दिवस असाच आपला घरी बसून निवांत टिवल्याबावल्या करत होतो. तेव्हढ्यात इमारतीमधले वय वर्ष ७-८ असे एक बालकृष्ण फिरत फिरत आमच्या घरी प्रवेश करते झाले. एंट्रीलाच सप्तक लाऊन टाळ्या घेणार्या संगीतनाटकातल्या कलाकारासारखं हे महाराज गात आले.. "व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी". मी चमकुन त्याच्याकडं पाहिलं, तर ह्याला कशाचं काहीच नाही. गातोय आपला जोरजोरात. काय ही पोट्टी, काय काय पाहतात त्या टिव्हीवर, कळो न कळो, आपलं म्हणतच सुटायचं! मग मीच खेकसलो, " एऽ गप रे. तुझं वय काय, तू गातोयस काय? आँ? जरा चार चांगल्या गोष्टी ऐकाव्या माणसानं." त्या बाळासाहेबांनी एकदम 'अरे!
मिसळपाव
प्रियकर सॅम लुईसशी(जॉन गेविन) लग्न करण्यासाठी पैशाची आत्यंतिक जरूरी असलेली मरियन क्रेन (जेनेट लाय) तिच्या ऑफिसमधून चाळीस हजार डॉलर्सचा अपहार करून स्वतःच्या कारने पसार होते, वाटेत एका पोलीस डिटेक्टीव्ह द्वारे पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यावर जुनी कार विकून ती दुसरी कार विकत घेते.
अंधार्या रात्री तूफान पावसात कार चालवण्याऐवजी ती एका आडबाजूला असलेल्या बेट्स मॉटेलमध्ये उतरायचे ठरव
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या.
हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष.
डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य.