Skip to main content

प्रतिक्रिया

देश- राष्ट्र काहीसे विस्कळित....

लेखक मन१ यांनी शुक्रवार, 03/08/2012 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा:- पुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी. अठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं. शुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती.

एका अस्सल मर्दाची कहाणी

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 08/07/2012 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
बोरिस पलेवोय या सोविएत लेखकाच एक सुंदर पुस्तक "स्टोरी ऑफ रीयल मॅन"नुकतच वाचण्यात आल्,एका अस्सल देशभक्ताची ही कहाणी आहे,हि कादंबरी एका खर्‍या व्यक्तीरेखेवर बेतलेली आहे.तो व्यक्ती म्हणजे अलेस्केइ मेस्सेरेव्ह जन्म २० मे १९१६,रशियातील एका सामान्य कुटुंबातला.

ज्यूलीचे चौघडे

लेखक मन यांनी गुरुवार, 05/07/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी.

कुत्रं...

लेखक गवि यांनी बुधवार, 04/07/2012 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहानपणापासून राजीखुषीने, विशेषतः आईबापांच्या राजीखुषीने आणि नशापाणी न करता कुत्री आणि मांजरं पाळत आलो आहे. मांजरांची पिल्लं बिल्ल्यांसारखी शर्टावर लटकावून मी लहानपणी हिंडायचो. ती नखांनी शर्टला घट्ट पकडून असायची.. पण असं जास्त वेळ करता यायचं नाही. लटकता लटकता ती पिल्लं हळूहळू वर चढत जायची..मग खांद्यावर चढून कानाशी कापसाचे मांजरगोळे हुळहुळायला लागले की मी परत त्यांना पकडून शर्टाला अडकवायचो. मांजरांना मी सुकी कोळंबी आणून घालायचो. कोळंबीचा पुडा घेऊन घरात शिरलं की जिथ्थे कुठे मांजरं बसली असतील ती हर्षवायूने ओरडत पायात यायची.

आर्थिक अराजकता

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 26/06/2012 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
'स्टँडर्ड व पुअर्स' या जगातील सर्वात मोठय़ा पतमापन संस्थेने भारताचे पतमानांकन निगेटिव्हमध्ये घटवून 'भारत हा गुंतवणूक करण्यायोग्य देश नाही' असा शिक्का मारला आहे. 'मूडी' या संस्थेने मात्र थोडासा दिलासा देत 'भारतीय अर्थव्यवस्था फार वाईट स्थितीत नाही' असे मत व्यक्त केले आहे. या सर्वांवर संयुक्त पुरोगामी आघाडीने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दाखवून कळस चढविला आहे. सरकारच्या निष्क्रीयतेमुळे देश आर्थिक अराजकतेच्या मार्गावर उभा असून आर्थिक सुधारणांच्या रुतून बसलेल्या गाडीला धक्का देणे फार गरजेचे आहे. भारताचा विकासदर ९.५ टक्क्याहून(मार्च २००७) घसरून आता ५.३ टक्क्यावर(मार्च २०१२) आला आहे.

साबू-हॉलीवूड गाजवणारा भारतीय अभिनेता

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 24/06/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारतीयांनी चित्रपट क्षेत्रात जबरदस्त अशी प्रगती केलेली आहे,तरीही भारतीय अभिनेत्यांना हॉलीवूड चे आकर्षण मोठ्या प्रमाणात आहे,अनेक जण हॉलीवूडमधे काम मिळवताना धडपडताना दिसतात,या पार्श्वभुमी वर काळाच्या ओघात मागे पडलेल्या पण हॉलीवूड गाजवलेल्या एका भारतीय अभिनेत्या बद्दल वाचण्यात आले ती माहीती मिपा करांसमोर मांडण्या चा हा छोटासा प्रयत्न. २७ जानेवारी १९२४ ला मैसूर ला साबू चा जन्म झाला. मुळ नाव शेलर शेख साबू.

(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 21/06/2012 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
(टुकार, बेक्कार आणि बकवास गाणी) सध्या काही धागे वाचण्याचा आणि ते वाचून कंटाळा येण्याचादेखील कंटाळा आला आहे. बरेच चित्रपट येतात जातात, बर्‍याचदा गाणी बकवास की चित्रपट अधिक बकवास हा प्रश्न पडतो. पिच्चरमध्ये चांगली सोन्ग्स असतात आणि बकवास, टुकार आणि टाकावू सोन्ग्स ही असतात आणि का असतात असे होते.. मला एक librari बनवायची आहे, असली गाणी चुकूनही पुन्हा ऐकणार नाही याची काळजी घेण्यासाठी. मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे माझ्याकडून कांही गाणी, १) मै तो रस्ते से जा रहा था.. २) मेरे बाप का बेटा मुझे भाई बोलता..

बापुजींच्या चेहर्‍यावरील हास्य मावळणार..?

लेखक डावखुरा यांनी रविवार, 17/06/2012 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
नोटांवरची गांधींची मक्तेदारी आता संपण्याची चिन्ह दिसतायंत.. आणि बर्याच वर्षांनी रिजर्व बँकेलाही पटलंय की बापुंव्यतिरिक्तही महापुरुषांनी भारतात जन्म घेतला होता आणि त्यामुळेच शिवाजी महाराज आणि आंबेडकरांनापण राष्ट्रीय चलनावर झळकण्याची संधी मिळतेय पण .... . . . . . . . . . . त्याबरोबर सोबत अजुन दोन गांधी आहेतच, . . जाउद्या उशिराने सुचले तरी ते शहाणपणच म्हणवेल निर्णयाबद्दल खुद्द आम्ही रिजर्व ब्यांकेचे ऋणी राहु...