प्रतिभा
कोजागिरी स्पेशल
आज आमचे येथे कोजागिरी निमित्त्य मसाला दूध प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून प्रतेकानं आपापल्या घरुन २-२ लिटर दूध (आमच्या प्रोव्हिजन स्टोअरमधूनच. आज म्हणून म्हैस : चौरेचाळीस रुपये लिटर )
तशेच पाव किलो साखर प्रतेकी आणि
दूध मसाला (२५ रुपये तोळा)
(स्पेशल आलाय आमच्या कडे तोच घ्या)
संध्या़ काळी चार वाजेपर्यंत आणून द्यावे.
कार्यक्रम बिल्डींगच्या टेरेस वर ठीक ९.३० वाजता (रात्री) सुरु होऊन ११.४५ (रात्रीच) ला संपेल.
दूध तापवताना वेगळे काही घडत नसल्याने दूध कसे तापत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करु नये.
बसायची व्यवस्था आपली आपण करायची आहे.
सैतानाचा आरसा - शतशब्दकथा
मी एखाद्या पिसाटा सारखा बेफाम धावत होतो.
पुढे ती जीवाच्या आकांताने सैरावैरा पळात होती.
माझ्या नजरेत विखार होता.
तिला मी रोज पहायचो.
आज तिला सोडायचे नाही असा निर्धारच मी केला होता.
रडत, धडपडत, अडखळत, भेलकांडत धावताना ती मदतीसाठी केविलवाणे किंचाळत होती.
एका क्षणी मी अगदी जवळ पोचून निर्दयपणे तिची ओढणी खेचली.
ती घाबरुन अजूनच जोरात धावायला लागली.
तिच्याकडे पहात धावताना मी एका दगडाला अडखळलो,
तेवढ्यात ती एका बंगल्यात घूसली.
गेट लावायची तिची धडपड सुरु असतानाच मी तिथे पोचलो आणि
चवताळून त्या दिशेने झेप टाकली.
तिने धाडकन गेट बंद केले.
आम्हां घरी धन.....(३)
आम्हा घरी धन...
आम्हां घरी धन ...(२)
----------------
धन्यवाद मंडळी! पहिल्या आणि दुसर्या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे.
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते..
स्प्लेंडर : शतशब्द-सत्यकथा
माझी स्प्लेंडर होती. कोरी करकरीत होती. बरीच वर्षे गावात वापरली.
मग अखेर एक दिवस मुंबई गाठली. तिथेही छान करियर मिळाले. पण मुंबईची लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी , वेळोवेळी कंपनीने घडवलेल्या विमानयात्रा .... यात स्प्लेंडर घरीच धूळ खात बसली. चार पावसाळेही पाहिले तिने -- माझ्याशिवाय.
आणि एक दिवस मग ठरवलं.
"आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. "
होना! लोकल, ट्याक्सी, विमान .... आता स्प्लेंडर कशाला हवी?
.. स्प्लेंडर विकली.
त्यानंतर चारच दिवसात अपघात झाला. माझा डावा पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला.
छगनलालांचे सापळे (भाग ५)
आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/22197
त्या दिवशी मी जरा उशीराच कामावर गेलो होतो.आज काय काम करायचे त्याची योजना कालच तयार करून ठेवली होती.अशोकला रात्रीच कामाची कल्पना देवून ठेवली होती.तसा आमच्याकडे स्टाफ कमीच होता.बॉक्सेस आणि पी.सी.बी.
जोवरी हे जग, जोवरी भाषण - १
नमस्कार ..
मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा.
आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...
एक बटा दो.......दो बटे चार.....
आज तो जीने की तमन्ना है..... http://misalpav.com/node/22730
आज फिर मरने का इरादा है..... http://misalpav.com/node/22799
एक बटा दो.दो बटे चार छोटी छोटी बातो मे बट गया संसार.
नही बटेगा नही बटेगा मम्मी डॅडी का प्यार ओ मम्मी डॅडी का प्यार.........
एफ एम वर गाणं लागलय. माझं आवडीचं.लहानपणापासून अगदी आवडीचं. प्यार म्हणजे काय हे न कळायच्या वयात कुठल्या तरी पिक्चर मध्ये कोण्या लहान मुलानी म्हंटलेले गाणं. मी समाजाच्या कार्यक्रमात त्यावर डान्स देखील केला होता.
बाबाने त्याचे चिक्कार फोटो काढून ठेवले होते..
लादेन ध्यानप्रकार
अध्यात्म या विषयावर अनेक गैरसमज आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म गूढ, अंधूक, धूसर, अगम्य आहे हे नसून अध्यात्माविषयी विचार करणारे बहुतेक लोकं मठ्ठ असतात हे आहे. त्यांचा हा मठ्ठपणा दूर करण्याची जबाबदारी मी नाईलाजाने स्वीकारतो आहे. तशी ती जबाबदारी 'कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो, कृपया ही जबाबदारी स्वीकाराच. नक्की...' अशी विनंती करत काही शेकडो लोकं आले होते असं नाही. मला केवळ तसं वाटतं म्हणून मी स्वीकारतो आहे.
सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे.
अजुन एक बालकथा : शतशब्दकथा
एक होता ससा एक होतं कासव . त्यांची लागली शर्यत आंब्याच्या झाडापर्यंत पळण्याची पण चिऊचं घर होतं मेणाचं अन काऊचं घर होतं शेणाचं म्हणुन म्हातारी म्हणाली " लेकीकडे जाऊ तुपरोटी खाऊ मस्त जाडजुड होवु ".
मिसळपाव