Skip to main content

प्रतिभा

विषाणू

शनिवार, 06/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगत दूरच्या काळात, मंगळावर घडलेली ही कथा. अर्थात, त्यावेळी मराठी किंवा इतर भाषा नव्हत्या. थांबा, तुम्ही नीट समजावून घेतले नाही बहुदा! इतर भाषा नव्हत्या, म्हणजे, भाषाच नव्हत्या. माणसे होती, पण ती देखील आज आपल्याला समजणार नाहीत अशी! जेथे ही कथा घडली तेथे माणूस होता, पण त्याला ना मन होते, ना भाषा! जे काही होते, ते कालच्या काळापेक्षा खुपच वेगळे, आपल्या समजण्याच्या बाहेरचे. म्हणून, आजच्या वाचकांसाठी त्यांना समजेल अशी सादर केली आहे.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८

लेखक चतुरंग
मंगळवार, 18/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा डाव तुफान झाला. कार्पोव कोर्चनॉयच्या सर्वात जास्त खेळींच्या डावापाठोपाठचा दुसर्‍या क्रमांकाचा! शेवटी अर्थातच मॅग्नुसने विनाकारण ताणले. त्याने टाटा स्टील स्पर्धेत एका खेळाडूवर घोडा-हत्ती वि. हत्ती अशा काँबिनेशनने मात लावली होती त्यामुळे तो कालही आशावादी होता. परंतु काल आनंद त्याला पुरुन उरला. शब्दशः "कुठे आनंदचा ऐरावत आणि कुठे मॅग्नुसची तट्टाणी!" अनुभवायला मिळाले!! ;) चला आजचा आठवा डाव कमालीचा रंगतदार होणार. आनंदसाठी जिंकणे जवळपास अनिवार्य. कारण आता उरलेल्या पाच डावात त्याची पांढरी मोहोरी तीन वेळा असणार आहेत.

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा

शुक्रवार, 31/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 ******************************************** नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा!

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

बुधवार, 15/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो.

आज जानेकी ज़िद ना करो (दोन)

सोमवार, 13/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आज जाने की ज़िद न करो (एक) ही गज़ल (म्हणजे तिचा काव्यविषय), जनसामन्यांसाठी कवि-कल्पना आहे. त्यामुळे, उर्दू शायरी ज्या प्रेमाची कहाणी आहे ते प्रेम, ती `उल्फ़त' काय आहे ते आधी सांगायला हवं. उर्दू गज़लेत प्रिया कधीही पत्नी होत नाही, ती फक्त एक ‘चाहत’ असते. पूरे-उम्र-भरकी चाहत. सार्‍या आयुष्याला पुरुन उरेल अशी अभिलाषा! म्हणजे प्रियकराचं प्रेम बेतहाशा असतं पण ती कधीही त्याला संमती देत नाही.

आज जाने की ज़िद न करो (एक)

रविवार, 12/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ही ग़ज़ल म्हणजे एक दुर्लभ योग आहे. खुद्द शायर एका अर्थानं शायरी लिहीतो, आणि गायिका ती गाते तेव्हा तिचं संपूर्ण परिमाण बदलून जातं! फैयाझ हाशमीनी ग़ज़ल लिहिलीय प्रियकराच्या भूमिकेतून आणि फ़रिदा ख़ानुमनं ती गायलीये प्रेयसीच्या आर्जवातून, त्यामुळे अर्थ तोच राहिला तरी, काव्यविषयच बदलून गेलायं. काव्यविषय इतका जीवघेणा आणि असा काही तरल झालायं की साधेसे शब्द देखिल काव्याला चिरंतन परिमाण देऊन गेलेत. हीच गज़ल आशा भोसलेनी सुद्धा गायलीये, पण तिथे संगीत, आर्जवाला फिकं करतं. आणि एआर रहेमानची ती अत्यंत आवडती ग़ज़ल आहे, पण तो देखिल फ़रिदाचा दिलकष माहौल जमवू शकलेला नाही.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

गुरुवार, 09/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थ बाजूला ठेवून, पहिल्यांदा हृदयनाथांनी गायलेलं हे कमाल गाणं (पुन्हा एकवार) ऐकू. अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे ग्रेसच्या लयकारीच्या नखर्‍याला जराही धक्का न लावणारी चाल आणि कमालीची दिलकष शब्दफेक! खरं तर ग्रेसच्या इतक्या सुंदर कवितेचं `गाणं' झालं नसतं तर कदाचित, ती चर्चेचा विषय झालीही नसती.

स्वयंभू (संपूर्ण कथा)

लेखक बोबो
बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंभू (संपूर्ण कथा) ------------------------------------------------------------------------------------ "माधवा, किती वेळ झोपून राहणार? चल उठ पाहू",विठाबाई- माधवाची आई त्याला उठवत म्हणाली. "आई झोपू दे ना. कशाला झोपमोड करतेस", माधव कंटाळून बोलला. "अरे बाळा, देवाची पालखी यायची वेळ झाली आहे. तुझे बाबा पहाटेच उठून भक्तांच्या स्वागताची तयारी करताहेत. जा जरा तूसुद्धा जाऊन दर्शन घेऊन ये. तेवढंच पुण्य पदरात पडेल. " "अगं आई, कमाल आहे तुझ्या आणि बाबांच्या देवभोळेपणाची. तुम्ही आणि तुमचा देव. गेले वर्षभर मी नोकरी शोधतोय पण तुमचा देव वर्षभरात मला साधी एक नोकरी मिळवून देऊ शकला नाही.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

सोमवार, 06/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

भय इथले संपत नाही (दोन)

बुधवार, 01/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28987 -------------------------- भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे. भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय.