Skip to main content

प्रतिभा

लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 18/02/2014 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
१९ फेब्रुवारी हि आपणा सर्वांना प्रीय लोकोत्तर श्री छत्रपती शिवरायांची जयंती आहे. या निमीत्ताने मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून आणि मिपा. धाग्याच्या साहाय्यातून साकार झालेल्या अनुवाद प्रयास (अनुवाद (पर्याय १ला)) आपणा समोर सादर करत आहे. *मूळ इंग्रजी लेख : IS SHIVAJI NOT A NATIONAL HERO ??

संस्कृतचे अनोखे अभ्यासक

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 13/02/2014 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच. भारतात संस्कृतचे संवर्धन अनेक जण पारंपारिक पद्धतीने करत आहेतच, पण काही जण अतिशय अनोख्या पद्धतीने या अभिजात भाषेचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत. आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक श्री दयाकर दाबके हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत. त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक.

सकाळचा "च्या" ( वपु/शंकर पाटील .... स्टाईल )

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 10/02/2014 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/4715 "सकाळचा "च्या" "चहा" हा विषय घेवून व पु / शंकर पाटील कसे लिहीतील याची एक झलक. वपु:- बायकानी कुंकवाला आणि पुरुषानी चहाला नाही म्हणून नये ही म्हण ज्या टाळक्यतुन निपजली त्या टाळक्याला सलाम. हल्ली मी चहा घेणे बंद केलय. नाही म्हणजे खूप काही महत्वाचे कारण नाही. पण सध्या घरात चहा पेक्षा घरातले वातावरण अधीक तापते. कारण म्हणाल तर मीच. मला सकाळी मस्त चहा लागतो. आमच्या ऑफिसातला तो कनक शहा म्हणतो.

फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 31/01/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्‍यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.

द बॉक्सिंग डे बॅटल

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 24/12/2013 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
रोमान्स.....काय सेन्श्युअस शब्द आहे ना? नाही... अमेरिकन्स सारखं "रोमॅन्स" नका म्हणू.... रोमान्स! अंगावरून मोरपीस फिरवावं तसा आठवण बनून अंगावर रोमांच उभा करणारा रोमान्स.....पुण्याच्या गुलाबी थंडीत भर दुपारीसुद्धा एकत्र घेतलेल्या वाफाळत्या चहाची ऊब देणारा रोमान्स.....चोरट्या कटाक्षांमधला रोमान्स.....चुकूनच झालेल्या सुखद पुसट हस्तस्पर्शांमधला रोमान्स......'मला कळलंय सगळं' सांगणार्‍या स्मितहास्यातला रोमान्स! ह्या वेळी बरेच वर्षांनंतर पुण्यात सलग बरेच दिवस गुलाबी म्हणावी तशी थंडी पडलीये. (८ - ९ डिग्री म्हणजे पुण्यासाठी गुलाबीच!). आणि ते ही ऐन डिसेंबरात !

डिसेंबर (२)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 15/12/2013 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : डिसेंबर http://misalpav.com/node/26361
डिसेंबरात रात्री मात्र चांदण्यांचे झाड फुललेलं असते. रोहीणी सप्तऋषी स्वाती चित्रा सगळी नक्षत्रे झगमगत असतात. दक्षिणेकडे अगस्तीचा तारा स्वतन्त्र आस्तित्व दाखवत असतो. सिंह राशीतलं उलट प्रश्नचिन्ह वृषभ राशीतल्या कृत्तिकेचा पुंजका, हे आकाशात अक्षरशः हिरेमाणके असावी तसे लखलखत असतात.

तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 13/12/2013 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्यारे गुरुजींना प्रज्ञा सांत कि असांत असा प्रश्र्ण पडला होता. या जगात काही प्रतिभा या सांत का असांत या वादाच्या पलिकडल्या असतात. या प्रतिभेतून निर्माण झालेल्या कलाकृतिंचा जमेल तेवढा अस्वाद घेणे इतकेच काय ते आपण सामान्य माणसे करु शकतो. अशाच एका अनंत गाण्याची मी आज तुम्हा रसिकंना ओळख करुन देणार आहे. ओळख अशा साठी की त्या गाण्याचे संपुर्ण रसग्रहण करणे या पृथ्वीवरच्या कोणत्याही मानवाच्या आवाक्या बाहेरचे काम आहे. ते गाणे सांतही आहे आणि असांतही. गाणे संपते म्हणुन सांत पण संपल्या नंतर ते अनंत काळ आपल्या मनाचा ताबा सोडत नाही म्हणुन अनंत. या गाण्याचे कवी, संगीतकार व गायिके बद्दल मला काही माहित नाही.

टेरीचा बाश्शाखान : रोमांचकारी अनुभव !

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 08/12/2013 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
असे माझे होते कधी कधी ! मित्राच्या आग्रहाखातर एखादी गोष्ट केली जाते किंवा बघितली जाते. माझ्या दृष्टीने ती गोष्ट फारशी दखलपात्र नसेल, माझी रुची नसेल. पण झाल्यावर वा बघितल्यावर असे वाटते की आपण हे केले नसते तर आयुष्यातल्या केवढ्या मोठ्या आनंदाला मुकलो असतो.…. गेल्या आठवड्यात असेच घडले. ज्येष्ठ पत्रकार, भास्कर समूहाच्या दिव्य मराठीचे मुख्य संपादक पद्मश्री कुमार केतकर माझे स्नेही आहेत. "खास एवढ्यासाठी यावे लागले तरी ये तुझी मुंबई वारी व्यर्थ जाणार नाही हे निश्चित." निमंत्रण होते एका माहितीपटाच्या सादरीकरणाचे.

एक बटा दो.......दो बटे चार.....(४)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 17/11/2013 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा एक बटा दो.... दो बटे चार http://misalpav.com/node/25357 आज तो जीने की तमन्ना है..... http://misalpav.com/node/22730 आज फिर मरने का इरादा है..... http://misalpav.com/node/22799 आज फिर मरनेका इरादा है .... ( पुजा पवार) ... http://misalpav.com/node/24383 सगळे डोळ्यासमोर उभे राहीले. इतिहासाचे ते पान आमच्या समोर वर्तमान होऊन आले. मी तर जीवाचे कान करून ऐकत होते.

आपण ग्रेट आहोतच !

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 05/11/2013 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट २०१२ चे पंतप्रधान मनमोहनसिंघ यांचे भाषण मला आठवते. बहुदा विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या घोषणा लक्षात राहतात. कारण या दोनही क्षेत्रातल्या माझ्या देशाच्या घोडदौडीचे मला नेहमी कौतुक वाटते. १७५० साली ब्रिटन मध्ये सुरु झालेली औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानाची सुरुवात मानली तर सुमारे दोनशे वर्षांनी म्हणजे सुमारे १९५० साली आपल्याकडे स्वत:च्या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. डॉ भाभा, जमशेदजी आणि नेहरू या त्रिकुटाचे प्रत्येक स्वकीयाने आभारच मानले पाहिजेत.