Skip to main content

प्रतिभा

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 14/01/2013 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

प्रयोग..

लेखक चाफा यांनी शनिवार, 22/12/2012 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
फार पुर्वी लिहीलेली एक कथा सापडली, ती जशीच्या तशी इथे टाकत आहे ( सुचत असून बदल करत नाही ) ;) फॉर अ चेंज यावर काकु करूया :) ********* शेवटचा पेशंट आटोपल्यावर मी आपली आवरा आवर सुरू केली. दिवसभराच्या माझ्या कामामुळे मला थकवा जाणवायला लागला होता. रोजचे तेच पेशंट त्याच त्या प्रकारची प्रश्नोत्तरे.., आता कंटाळा यायला लागला होता या सर्वाचाच. आयुष्यात चॅलेंजींग असं काहीतरी घडावं असं प्रत्येकालाच मनाच्या कोप-यात कुठेतरी वाटत असतं, मी ही त्याला अपवाद नव्हतो. पण रोजची ती रटाळ बडबड त्याच ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे.......... वैताग होता सगळा.

माझी चार अंग वस्रे

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 21/11/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
जीला माहीत नाही आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती मुर्ख आहे - तीला जवळ येउ द्या त्यातच तुमचा फायदा आहे जीला माहीत नाही आणि जीला माहीत आहे की तीला माहीत नाही ती सरळमार्गी आहे - तीच्याशी लग्न करा आयुष्यभर टेंशन नाही जीला माहीत आहे आणि जीला माहीत नाही की तीला माहीत नाही ती निद्रीस्त आहे - तीला झोपेतुन जागे करण्याच्या फंदात पडु नका कारण ती उठली तर तुमचा बजार उठेल त्या पेक्षा ती उठायच्या आत तिथुन सटका जीला माहीत आहे आणि जीला माहीत आहे की तीला माहीत आहे ती भयंकर हुशार आहे - तीच्या फारसे जवळ जाउ नका.

खरडवह्या.. एक अनमोल ठेवा.

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 13/09/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
हे सर्व लिखाण खरेतर काथ्याकुटात टाकावे, का जनात-मनात तेच कळत नाही. म्हणाले तर ह्यावरती चर्चा होऊ देखील शकेल. पण मंडळाने निर्णय घेतलाच असेल तर त्यावर चर्चा नको म्हणून सरळ जनात-मनात लिहून फक्त भावना मोकळ्या करत आहे.
दिनांक १५/०९/२०१२ रोजी मिसळपाव वरील सर्व सदस्यांच्या खरडवह्या आणि मिपाचा खरडफळा मोकळा केला जाईल. त्यापूर्वी आपल्या खरडवहीत काही महत्त्वाचे असेल तर कृपया त्याची प्रत साठवून ठेवावी.

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 21/08/2012 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये माझ्या नागावातील घराबद्दल लिहिलेला लेख मिपाकरांसाठी देत आहे) नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला. बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो.