ओ सजना बरखा बहार आणि एक कुंद दुपार..! :)
तिचं नांव..? ते जाऊ दे...!.
ती वर्गात होती माझ्या. वाणिज्य शाखा तृतीय वर्ष..
आमची वयं असतील विशीच्या घरातली..
वय वर्ष १९-२०..!
सालं काय वर्णन करावं त्या वयातल्या तारुण्याचं..? शब्दशः: मंतरलेली वर्ष..! त्या वयात कुठल्या जादुई दुनियेत मन वावरत असतं काय समजत नाय बा..
अशातच ती आली माझ्या त्या स्वप्नांच्या दुनियेत.. स्वप्नांचं त्या वयातलं ते बेधुंद राज्य अन मी त्याचा अभिषिक्त सम्राट..! पण त्या राज्याच्या राणीचं सिंहासन मोकळंच होतं.. वर्गातल्या वर्गात आमच्या नजरा जुळल्या.. 'दिल में कुछ कुछ होता है..
मिसळपाव