मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(तू)

चतुरंग · · जे न देखे रवी...
अजब यांचे 'तू' हे मुक्तक वाचून मनात अनेक विचार मुक्तपणे आले ते असे ;) तू भयकथेगत नकोस येऊ मी त्या पालीगत थरथरतो... तू 'इतिहास' होऊन नकोस वाहू 'बे-भान'पणे मी भरकटतो... तू 'वैशाख फळ' होउन जवळ राहा मी ओरपून खाईन असा... तू 'गजल' एखादी होउन ये मी विडंबनात नाहीन असा... चतुरंग

वाचने 3838 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्रियाली Tue, 07/15/2008 - 20:56
कवितांशी माझा दूरान्वये संबंध नाही :( पण तू बुद्धीबळागत नकोस खेळू मी त्या प्याद्यागत कोलमडतो

केशवसुमार Tue, 07/15/2008 - 21:10
वा रंगाशेठ, एकदम झकास मुक्तके..चालूद्या.. प्रियालीताई, जबरा प्रतिचाल (हसरा)केशवसुमार स्वगतः केश्या प्रतिसादा बरोबर स्वगत लिहिलेच पाहिजे का? गप्प बस अता :T

प्राजु Tue, 07/15/2008 - 22:06
चालीवर प्रतिचाली... चालूद्या.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्किट Tue, 07/15/2008 - 22:31
सदर संकेतस्थळावरच्या कालातीत साहित्याचे संचित मुक्तकाच्या माध्यमातून करण्याच्या संकल्पनेला १० पैकी दहा गुण. "नाहीन" हा शब्दा न कळल्या मुळे - २ मार्क एकूण ६ मार्क (मुक्तकाच्या विडंबनाला आम्ही ७ पेक्षा अधिक गुण देत नाही.) पण प्रियालीची काव्यप्रतिभा बहरण्यास कारणीभूत झाल्याने, +१. एकूण सात मार्क. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Tue, 07/15/2008 - 22:46
"नाहीन" मधे न कळण्यासारखे काही नाही - नहाणे= अंघोळ करणे, चे ते रुप आहे! (स्वगत - बाकी रंगा, तुझ्या विडंबनात सुधारणा आहे हो, मास्तरांनी ह्यावेळी ७ गुण दिलेत, मागल्या खेपेस ६ च होते! केशा आता सटपटला असेल कांपिटिशन वाढली म्हणून!;)) चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट Tue, 07/15/2008 - 22:49
न्हाईन बरे वाटले असते का ? धन्यवाद. (स्वगतः इतके शिंपल शब्द कळत नाही सर्किटा, बरे झाले परीक्षक झालास ते. उगाच विडंबने करण्यात वेळ घालवू नकोस आता.) - (खजील) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Tue, 07/15/2008 - 23:03
खरंच की, माझेच चूक आहे. परीक्षक महोदय, 'न्हाईन' असेच हवे होते! (चुकून त्याही शब्दाचे विडंबन झाले). पुढल्या विडंबनात अशी चूक होणार नाही! :) चतुरंग