Skip to main content

माझी विठ्ठल माऊली..

लेखक राघव यांनी बुधवार, 05/11/2008 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की! तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही? :) मला भावतो गजर तुझ्या नामाचा-प्रेमाचा.. तुझ्या सगुण रुपात मला निर्गुणाची ओढ! काय वर्णावे तत्वांस साधे रूप वर्णवेना! माझ्या डोळ्यांत मावतो प्रेम-अश्रुंचा सागर.. कुणा तुझ्यात दिसतो सार्‍या विश्वाचा नियंता.. कुणी तुझ्यात पाहतो काळा दगड केवळ!! तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! सार्‍या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर! माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली.. तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ! मुमुक्षु
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3327
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

तुझ्या रचनांमधे सहजता असते ती आवडते. तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! सार्‍या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर! चोक्कस. बिपिन कार्यकर्ते

भक्तीरस रसाळतेने ओथंबणारी कविता.

माय-बाप रघुवीर माझी विठ्ठल माऊली.. तिच्या चरणांशी माझे मन आनंदी, अचळ! वा! मुमुक्षूरावांचे नेहमीप्रमाणेच रसाळ काव्य... आपला, (ह भ प मुमुक्षूंचा फ्यॅन) तात्या.

तुमचा भक्तीभाव ... तुमच्या शब्दामधे उतरला आहे .

तुला खंत ना तयाची, हसु निर्मोही तसेच! सार्‍या लेकरांस मिळे तुझ्या मायेची पाखर! . . फार सुंदर