खपली
लेखनविषय:
रुतलेल्या सहस्त्र जखमा
मी सांभाळतो उराशी
रुदनाचे सोयर तुटले
मज खंत ना जराशी
आक्रोश ना कदापी
ना द्रोह जीवनाशी
अजुनी सजीव आहे
ना राग हा तुझ्याशी
गाऊ नको वॄथा तू
माझी मलाच गाणी
वांझोट्या स्वप्नांनीही
मानले रिक्त हे पाणी
जा सोड इथेच आता
चल मोह पाश तोडू
झेपेना स्पर्ष हताचा
खपली नकोस काढू
वाचने
2822
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
झेपेना
In reply to झेपेना by राघव
सोपी केलीत तर
In reply to सोपी केलीत तर by भास्कर केन्डे
व्यथा एवजी
In reply to व्यथा एवजी by कपिल काळे
व्यथा एवजी वॄथा चालले असते का?
कविता आवडली ...