औद्योगीक इसापनीती भाग दोन - फिताधारी कुत्री
भाग एक- http://www.misalpav.com/node/2330
फिताधारी कुत्री
एका शेतकर्याकडे बरीच कुत्री होती. ती घर, शेती, बैल वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच तेच काम करून कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात मग स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले हे मामुली काम रोज पाट्या टाकायचे! अशा वातावरणात मग ती कुत्री नीट काम करीत नसत. त्यांचा कामातील जोश वाढवायला शेतकर्याने एक युक्ती केली. काही चांगली कामसू कुत्री निवडून त्यांना चांगल्या कामाचे कौतूक म्हणून गळ्यात घालायला सभारंभपूर्वक रंगीत फिता दिल्या. ती कुत्री मोठ्या दिमाखाने गळ्यात रंगीत फिता घालून मिरवायची. त्या फितांचे महत्व इतके वाढले की सुट्टीच्या वेळात देखील इकडे तिकडे फिरतांना ती कुत्री फिता गर्वाने धारण करून फिरायची. ज्यांना रंगीत फिता मिळाल्या नव्हत्या, ती कुत्री फिताधारी कुत्र्यांचा हेवा करायची. त्यातली काही जोमाने काम करून फिता मिळवायचा प्रयत्न करायची. गळ्यात फिता असणे हे कर्तुत्वाचे लक्षण आणि फॅशन झाले. असे एकूण ठीक सुरू होते. कुत्री आणि शेतकरी सगळे खूष होते.
एकदा माळरानावर बरीच कुत्री एकत्र जमून मौजमजा करत होती. त्यात एक फिताधारी पण होता. तो अर्थातच गर्वाने आपल्या फितेचे प्रदर्शन करीत होता. सर्वांच्या गप्पा, कोरस भुंकणी ह्यांना रंग चढला होता. इतक्यात शेतकर्याचा नोकर आपल्या कामसू कुत्र्याला शोधत तिथे आला. गळ्यातील रंगीत फित पाहून त्याने कामसू कुत्रा बरोबर ओळखला. त्याच्या फितेला पकडून नोकर त्याला कामासाठी घेऊन गेला. सगळी मजा सोडून जातांना कामसू कुत्र्याला वाईट वाटले. पण तरी सुद्धा, आपण खूप महत्वाचे प्रस्थ आहोत, बाकीच्यांसारखे रिकामटेकडे नाही, असा आव आणत तो फिताधारी मोठ्या दिमाखाने पार्टीतून बाहेर पडला. तेव्हा काही बिनफिताधारी कुत्री त्याच्याकडे हेव्याने पाहू लागली. आजुबाजुच्या पार्टीचा नंतर त्यांना आनंद देखील उरला नाही.
बोध-
१) कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते.
२) फॅशनचे, पदकांचे वेड पसरवून शहाणे आपला कार्यभाग साधतात.
३) निर्भेळ सुख नसतेच. सुखाबरोबर दु:खेही स्विकारावी लागतात.
वाचने
8497
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
मजेशीर
कंपनी
नको तो मोबाईल
खुपच छान......
सहमत
इसापनीती
मस्त!
छान
In reply to छान by सुचेल तसं
फिता
In reply to फिता by अरुण मनोहर
मुंबईत ....
In reply to छान by सुचेल तसं
अभिमान
नको तो मोबाईल
सत्य
अगदी पटलं
In reply to अगदी पटलं by वरदा
धन्यवाद. वर
चांगला उपक्रम
वर्कींग फ्रॉम होम ही
In reply to वर्कींग फ्रॉम होम ही by एक
घरून कामे
मस्त कल्पना.