"अहो, हे पत्र जरा देउन याल का"? मला रस्त्यात मिळाले आहे. घरात शिरताना पहिले वाक्य. मी पत्ता बघितला. नीटसा कळला नाही. माझा गोंधळ बघुन लगेच कुटूंब उद्गारले., "गेट्मधुन बाहेर पडल्यावर उजव्या हाताला दुस-या गल्लीत चवथी बिल्डींग, १७ माळ्याचा टॉवर आहे.". बहुतेक प्रिमियम ची नोटीस होती. "जाताच आहात तर इंटीरियर पण बघुन या". कीचन जरा नीट बघा. आता पोस्ट्मनला किचन दाखवायची नविन सिस्टीम सुरु झाल्याची मला कल्पना नव्हती.
उच्च्च मध्यमवर्गियांचा टॉवर होता तो. दरवाजा उघडला. समोर मालकिण बाई उभ्या. मी पत्र हातात दिले. पुढे काय बोलणार इतक्यात त्याच म्हणाल्या.