पुढार्यांचे देशभक्ती गीत
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
या मातेचे कुपुत्र आम्ही
आम्हास कसली लाज
बटीक बनवली आम्ही तिजला
भागविण्या अमुचीच खाज
गरीबांच्या या टाळु वरचे
आम्ही खातो लोणी
नित्य नवी आम्हा लागते
रम आणि रमणी
कोण कुठले भगतसिंग..?
अन कोण कुठले राजगुरु..
आम्ही वंदितो भाई ठाकुर
अमर, अरुण, साटम गुरु..
उच्च नीच नाही कोणी
सगळेच आम्ही महान
एकजुटीने आम्ही ठेवला
अमुचा भारत गहाण.....!!!
वाचने
4389
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
कृपया पहीली ओळ संपादीत करा.
पहिली ओळ मला ही नाही पटली म्हणजे पूर्ण कडवे............
उच्च नीच नाही कोणी
सगळेच आम्ही महान
एकजुटीने आम्ही ठेवला
अमुचा भारत गहाण.....!!!
एकदम हूबेहूब वर्णन आहे सद्य स्थितिचे ...
वा काय मस्ती आहे अन्गातली
पाठीत घातली पाहीजे ह्यान्च्या लाठी
सुंदर कविता...
पहिल्या कडव्यात मला तरी काही वावगे दिसले नाही. हल्लीची बहुतांशी राजकारणी मंडळी त्याच लायकीची आहेत..
गोखलेसाहेब, पार्श्वभागाच्या लाल रंगामुळे कविता वाचायला अतिशय त्रास झाला.
तात्या.
छान कविता.
थोड्याशाच ओळी, पण किती प्रभावी पणे मनातले विचार व्यक्त करू शकतात याचे छान उदाहरण.
मजा आली.
बाकी 'गोखलेसाहेब, पार्श्वभागाच्या लाल रंगामुळे कविता वाचायला अतिशय त्रास झाला' इति तात्या.
सहमत.
शेखर