Skip to main content

प्रकटन

अमृताच्या धारा

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 24/06/2009 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
झाली शांत तृप्त धरा अशा बरसल्या धारा सांगे गंधाचा निरोप तुझ्या अंगणीचा वारा गर्द सावळे आभाळ राशी रुप्याच्या सांडते सौदामिनी उजळते तुझा गगनगाभारा झेलताना तनूवर हिरेमोती आनंदाने लाख डोळ्यांनी फुलतो मनमोराचा पिसारा तुझ्या करुणेचा मेघ माझ्या दारी झरताना जागेपणी पापण्यांत स्वप्न येतसे आकारा माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा
Taxonomy upgrade extras

तो आला!

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 24/06/2009 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर एकदाचा तो आला! =D> तब्बल ६ ते ८ महिने काहिलीत राहिलेल्या जीवासाठी जरासा का होईना, उतारा घेऊन आला! पण असा अचानक? :? दुपारी १ वाजता ऑफिसमधून ५ मिनिटांच्या रस्त्यावर असलेल्या बँकेत जाऊन येईपर्यंत सगळ्या आयुधांना [पक्षी - सनकोट, स्कार्फ, हातमोजे, बूट इ. इ. ] पुरून उरणा-या उन्हानं निखा-यावर मक्याचं कणीस भाजावं, तसं भाजून काढलं होतं. आल्यावरही पंखे, कूलर, एसी यांना दाद न देणारा प्रचंड उकाडा! ढगाच्या तुकड्याचाही मागमूस नाही! आणि अचानक ४.३० च्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले, एकदम अंधारच झाला!

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १३

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 24/06/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

अश्वत्थ

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 24/06/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या कोरड्या डोळ्यात आता नुरला विश्वास शांत घरातली भासे खिन्न ओसरी उदास झाले कवाड पोरके नाही अंगणाची साथ चुडा भरल्या हातात बूजगावण्याचा हात अश्वत्थाच्या झाडावर किती पक्ष्यांची घरटी पारावर हिंडणारी बघ साळुंकी एकटी खोली भरून दाटला खुळा अंधाराचा जीव बाहेरचा कव डसा शोधी जमिनीचा ठाव वारा झपाटून आला होई क्षणात बेभान स ळ स ळू न उठते पिंपळाचे पान पान

पावसाची गाणी

लेखक अनंत छंदी यांनी मंगळवार, 23/06/2009 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पाऊस सुरू झालाय. वाटतं अशावेळी माथेरान, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जावं. वस्तीपासून जरा दूर एकांत स्थळी असलेल्या एखाद्या व्हिक्टोरियन शैलीतील लॊजच्या एका कोप़रयातील सुट्च्या गॆलरीत मस्त आरामखुर्चीत पहुडावं, समोरची हिरवाई धुक्याचे झिरझिरीत वस्त्र ल्यायलेली असावी. सायंकाळच्या त्या वेळी हवेतील गारठा अंगावर घेतलेल्या शालीशी लगट करीत असावा. बाजूच्या टेपरेकॊर्डरमधून मस्तपैकी गुलाम अली किंवा मेहदी हसनचे सूर पाझरत असावेत. हातात सोनेरी छटा धारण करणार्या वारुणीचा ग्लास असावा. पाऊस आला की त्याची मजा अनुभवण्याचा हा मार्ग मला आवडतो. पण प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ११

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 23/06/2009 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

काटकोन

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 23/06/2009 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
Sir, I think your data is irrelevent in Indian weather conditions. मी What is your degree and experience and degree in the field sir?हॉलंडवरुन आलेला तज्ञ. Experience 1 year and degree 90 degrees १९९८ साली एका पंचतारांकित हॉटेल मधील एका कॉनफरन्स मधील प्रसंग. -------------------------------------------------------------------------------------------------------- १९९२ सालानंतर जागतिकरणाचे वार भारतात वाहु लागले. भारतिय कुक्कुट पालनामधे सुद्धा आधुनिकरण आले. ऑटोमेशन मुळे एका स्क्वेअर फुटात एकाच्या एवजी ३ कोंबड्या ठेवण्याइतकी प्रगती झाली.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ११

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 22/06/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

रंक आणि राजा

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 22/06/2009 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
१.धंदा करायची इच्छा बाळगर्‍याला आमंत्रण लागत नाही. गुडद्यात ताकद असली की पुरे. २. बँकेकडुन थोडे कर्ज घेतले की तो कर्ज घेणार्‍याचा त्रास असतो. भरपुर घेतले तर तो त्रास कर्ज देणार्‍या बॅकेचा असतो. ___________________________________________________________ नोकरीचा खूप कंटाळा आला. खणखणीत पगार, जेवणखाण, इतर सेवा मोफत असुनसुद्धा. असंख्य वेळा तेच तेच बोलुन अक्षरशः वैतागलेलो होतो. लोकांच्या 'टाइम्ज , मोशन, अ‍ॅक्शन 'चे प्रश्न संपायचेच नाहीत. दर दहा पेशंट मागे ४ जण 'वेळ' वाढवायच्या विनंती घेउन यायचे. ७ दिवसाच्या नोटीस ने नोकरी सोडली. साहेब वैतागला. 'स्टार बॅट्समन' रीटायर होणार होता.