Skip to main content

प्रकटन

** पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन **

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 24/02/2010 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक २८ फेब्रु २०१० स्थळ - शिक्षक भवन नवी पेठ पुणे वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ५ संपर्क - अ‍ॅड बाळासाहेब शिन्दे ९८५००४३२१२

खिंड

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 22/02/2010 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
"अय्या,सर तुम्ही. बर झाले तुम्ही भेटलात " बॅकेत गर्दी होती. पैसे मिळायला कमीत कमी अर्धा तास लागणार होता. आता खिंड लढवणे भाग होते. "पोरीने नशिब काढले हो" लग्न ठरले का"? "इश्श, काही तरीच काय. एवढ्यात कुठे लग्न" ह्या मातेच्या मुलीला मी पंधरा दिवसापुर्वी एका गोरटेल्या मुलाबरोबर अपुर्ण स्काय वॉक वर 'टेकान घेवा' स्थितीत बघितलेले होते. त्यामुळे एक नैसर्गिक प्रश्न होता तो. "माझ्या वेळी खुपच त्रास झाला होता हो. धड पंखे पण नव्हते" आता हीच्या पहिल्या डीलिवरी ला मॅटरनिटी होम मधे लेबर रुममधे पंखा नसल्याने जे हाल झाले त्या बद्दल तर बोलत नसावी. पण हे माझ्या कडे का बरे बोलावे ? मी आपला हैराण.

सांजवेळ

लेखक जयवी यांनी सोमवार, 22/02/2010 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
सावल्या लांब व्हायला लागल्या तशी सूर्याला आपल्या विश्रांतीची वेळ झाल्याची जाणीव होते. आपली मंदावलेली सोनसळी किरणं गोळा करुन तो निघतो. दूरवर हलकेच पैंजणांचा आवाज येतो....तो वळून बघतो. आपली पायघोळ काळी चंद्रकळा नेसून...यामिनी नखशिखान्त चांदणं लेवून.....आकाशाच्या दर्पणात आपलं प्रतिबिंब न्याहाळताना त्याला दिसते. तो कौतुकाने हसतो. रोज तितक्याच तल्लीनतेने तिचं त्या दर्पणात न्याहाळण्याचं त्याला कौतुक वाटतं. तो कित्येकदा ते बोलूनही दाखवतो. तीही दिलखुलासपणे ते मान्य करते.

यत्ता ८वी अ

लेखक प्रमोद्_पुणे यांनी रविवार, 21/02/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत यत्ता ८वी ते १० वी च्या मुलांना टेक्निकल/ संगणक/ शेती यापैकी एक ऐछीक विषय शिकवला जाई. संपूर्ण संस्क्रुत आणि टेक्निकल घेतले की 'अ' तुकडीत प्रवेश मिळत असे. माझ्या सर्वच मित्रांना टेक्निकलची प्रचंड क्रेझ आणि आवड.. मला 'अ' तुकडी, टेक्निकल याचे अजिबात सोयरसूतक नव्हते पण संपूर्ण संस्क्रुत आणि जिवाभावाचे मित्र यांच्यासाठी टेक्निकल आणि पर्यायाने 'अ' तुकडी मिळवणे अनिवार्य होते. टेक्निकल 'मिळवण्यासाठी ' ८वी च्या वर्षाच्या सुरुवातीला गणिताची ५० मार्कांची एक परीक्षा द्यावी लागत असे. गणित विषय मला फार्र फार्र आवडत असे, इतका की मी गणिते पाठ करत असे!! परीक्षा झाली आणि 'निकाल' लागला.

नकारघंटा.............

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज विसरुनी यत्न कालचे नवदिनी गुंतलो आज पुन्हा नकारघंटा वाजत राही तरी मनी आशा हा काय गुन्हा भूमीपुत्र हा असा मी अडलो संथता,अनुबंध,अतिक्रमणात अडकलो पात्रता निपुणता धाब्यावर बसवली आता मात्र प्रभूरामाची वाणी उमगली असे हे कलयुग आज उगवले काग मोत्य कंकर हंस गमले परकीयांचे गमभन रुजले राज्कृत्या राजनितीस रमले आज वाचा हि फोडत येथे युवाशक्ती महायुवाच नेते अतिक्रमणास धड्भू धम लावू नैपुण्य, पात्रता शिरोधिनी पाहू - मंगेश पावसकर

काळ्या घोड्याचा उरूस!

लेखक नीधप यांनी सोमवार, 15/02/2010 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी २०४५ 'दर वर्षी थंडीच्या मोसमात मुंबईनगरीमधे फोर्ट परिसरात काळ्या घोड्याचा उरूस भरतो. तर्‍हेतर्‍हेचे खाद्यपदार्थ, भिरभिरी, मुखवटे, इतर खेळणी, टिशर्ट, कपडे, दागिने, मातीच्या उपयोगी वस्तू याची भरपूर रेलचेल असते. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. विशेषतः शनिवार रविवारच्या दिवशी तर मुंगीला शिरायला जागा उरत नाही एवढी गर्दी होते. काळा घोडा ही देवता तांत्रिक प्रकारची आहे. चित्रविचित्र प्रकारची, विविध वस्तूंपासून बनलेली शिल्पे वाह्यल्याने ही देवता प्रसन्न होते.

मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 13/02/2010 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास. त्यांचे अनुभव दुसऱ्या दिवशी ऐकून हे जाणवले की, हे शहरी लोक नुसता हौशी उत्साह न दाखवता शर्यत पुर्ण करु शकले हा काही योगायोग नव्हे. शहरातील आजचे जगणे पाहता - त्यात रोज बाहेरील खाणे आले, कामाचा व इतर सगळा ताण आला, रोजचा प्रवास, ह्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरीक क्षमता कशी टिकून राहील असा प्रश्न पडेल.

बटन्ड

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 12/02/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिस मधुन येताना खुपच उशिर झाला होता. थकवा तर जाणवतच होता. हात पाय धूउन तो जेवायला बसला. .................................................... समोर वाफाळलेले जेवण. पेंग घालवण्याकरता टीवी लावला. कुठलासा सिनेमा. नेहेमीचा नर्म श्रुंगाराचा सीन. हीरो ऑफिसला निघालेला. शर्ट चे बटन तुटलेले. हीरॉइन सुई दोरा घेउन बटन शिवुन देते. आणि मग........ तोच सीन डोक्यात घेउन तो झोपी गेला. स्वप्नात सुद्धा त्याच सीन ची पारायणे. ........................................... आज ऑफिसला लवकर जायची गरज नव्हती. शर्ट चढवता चढवता त्याला कालचा सीन आठवला. इथे तिथे बघत त्याने शर्टाचे बटन तोडले. "अग शर्टाचे बटन नाहीये वरचे" ना