आज हिंदुस्तानका हर बूढा संकेतस्थळ मालक बनना चाहता है!
(आमची प्रेरणा: आता, सांगायलाच हवी का ?)
हल्ली कधी कधी असे व्यनी येतात की ते वाचून मला जाम जालमहर्षी झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी जालमहर्षी झालेला सर्वात खडूस म्हातारा आहे असंही वाटायला लागतं.
शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून टुकार आहेत. तेव्हा आता डायरेक्ट विवक्षित ठिकाणी हात...
गेले १० वर्षं माझा नेट संचार रखडत रखडत चालू आहे. मनोगतासकट इतरही अनेक पोर्टल्स (सदस्यत्व रद्द होईपर्यंत) आणि आता स्वतःचा ब्लॉगही (जो कोणी वाचत नाही) अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो (हल्ली निनावी). या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर, प्रेमप्रकरणे, भानगडी इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या. आणि गेल्या ५ वर्षांपासून मला हा उपरीनिर्दिष्ट (म्हणजे वरती लिहिलेला..) प्रकार अनुभवास येऊ लागलाय.
त्याचं झालं असं. एका संकेतस्थळावर थोडीशी ओळख झालेला एक इसम मला खरड लिहून कामासंबंधात काही बोलायचं आहे असं तस्मात भेटूया असं म्हणू लागला. भर संध्याकाळी अति गर्दीच्या कर्वे रोडवर भरपूर गजबजलेल्या एका बारमध्ये दारू प्यायचं ठरलं. भेटल्यावर बोलणं झालं त्याचा गोषवारा असा की सदरहू इसम हा ५ वर्ष लोकांना काम्पुटर विकून नुकताच गुडगावहून परतला आहे. तो शाळेत असताना त्याने कधीतरी होस्टेलमधून पळून जाण्याचे काम केलं होतं. त्यामुळे आपण उत्तम पळपुटा असल्याची त्याची खात्री आहे. या बळावर त्याने संकेतस्थळ निर्माणक्षेत्रात पाय रोवायचं ठरवून अनेक जालोत्तमांना धक्का देण्याचे योजिले आहे. हे कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याला माझ्या मदतीची म्हणजे माझ्या ओळखींचा धागा पकडून संधी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. माझ्या ओळखीचे काही त्यावेळेला इतर संकेतस्थळांवर बंड पुकारणारे सदस्य नव्हते. आणि त्याच्या जालकर्तुत्वाबद्दल, संगणकाबद्दल त्याने केलेली स्वस्तुती यापलिकडे काही माहीतीही नव्हती. मी पडलो स्पष्टवक्ता. प्रांजळपणे ते सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की तुझं कर्तृत्व मला लक्षात यावं आणि तुझं संकेतस्थळ व्हावं या दृष्टीने तू मराठी संकेतस्थळांवरील कंपूबाजीत सामील हो. वाटलं तर मालकाच्या पुढे पुढे कर. भवती न भवती करत तो सामील झाला. पण इथे नुसतंच टंकायला लागतंय, आयपी पत्ते जाहीर करण्याची लुसलुशीत संधी मिळत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने मलाच अनेक विशेषणे देऊन माझ्या कंपूत येणे बंद केले. पण त्याची नाराजी मात्र खरडवहीतून तो दर्शवत राह्यला.
याच आसपास दुसर्या एका (तथाकथित) ताईंची पण श्येम टू श्येम केस झाली. एकेकाळी कालिजात किंवा तत्सम कुठेतरी वापरलेला संगणक मग दुर्बिणीवरची नोकरी मग अचानक आपल्या "लेखनशैलीचा" साक्षात्कार आणि मग मलापण संकेतस्थळ काढायचय असा व्यनी. व्यनिबाहुल्यामुळे मला लगेच उत्तर द्यायला जमले नाही तर माझ्या प्रतिसादावर 'काय हे अजून उत्तर पण दिले नाही?' असा जाहीर उपप्रतिसाद. मग कधीतरी नंतर मी त्यांना जीटाकवर बोलावणे. ताईंकडून काही टंकून घेणे. लिहिल्यावर खूप वर्षं झालीयेत आणि गंज काढायला हवा याची मला खात्री पटणे. ते मी प्रांजळपणे सांगणे आणि गंज काढायला मदत करायची तयारी दाखवणे. मग ताईंचे गायब होणे. आणि संकेतस्थळांवर अधून मधून माझ्यावर विरुद्ध कंपूकडून हेटाई करवणे इत्यादी ओघाने आलंच...
अश्या तर्हेने माझा महत्वाच्या जागी बसलेला व्हिलन होऊन गेला.
अजूनही विविध पद्धतीने संकेतस्थळ चालक बनण्याबद्दल व्यनी थडकत असतात. आणि दर वेळेला या लोकांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे. संगणकाचं प्रशिक्षण घेतलंय, कधी काळी थोडसं प्रोग्रामिंग केलंय असं हे लोक म्हणतात. हे प्रशिक्षण वा अनुभव महिन्या दोन महिन्याचा मराठी संकेतस्थळावर वावर किंवा एखाद्या कंपूबहाद्दराला दिलेला "+१" प्रतिसाद इतपतच असतो. अशी कोणे एके काळी घातलेली संकेतस्थळ लेखनाची पाटी अचानक उठून संकेतस्थळ चालनाच्या धुमश्चक्रीत उतरण्यासाठी कशी काय पुरेशी वाटू शकते हा प्रश्न मला दर वेळेला पडतो. बर कुठलीतरी जेमतेम तोंडओळख पकडून असा व्यनी करायचा आणि एवढ्याश्या ओळखीवर/ माहीतीवर मी संकेतस्थळ चालनाचं मार्गदर्शन द्यावं अशी अपेक्षा बाळगायची हेही अचाट आणि अतर्क्यच. नाही का?
या लोकांचा संकेतस्थळांवरचा (अनेकांपैकी एक) आयडी मला माहीत असतो. त्यापलिकडे फारशी काही माहीती नसते. त्या व्यक्तीचे लेखन कधी बघितलेले नसते. त्या व्यक्तीचा चेहरा मला माहीत नसतो. हो इथे चेहराही महत्वाचा असतो. (येथे चेहरा म्हणण्यापेक्षा चेहरे म्हणणे संयुक्तिक ठरेल.) ठराविक प्रकारच्या संकेतस्थळाला ठराविक प्रकारचाच चेहरा उपयोगाचा ठरतो. तो मला माहीत नसतो. मग मी मार्गदर्शन द्यायचं, इतर स्थळांवरून सदस्य फोडायचे, ते तरी कुठल्या बळावर? आणि का?
बर कदाचित ह्यातले काही अजून प्रकाशात न आलेले जालमहर्षी असू शकतात पण ते मला कळण्यासाठी या सगळ्यांना मी भेटले पाहीजे आणि त्यांची कंपूबाजी-कौशल्याची परिक्षा घेतली पाहीजे आणि मग चालकत्वाच्या दिशेने त्यांना वळवले पाहिजे. पण मी हे करत बसलो तर माझा कंपू कसा सांभाळू? ही समाजसेवा करून मन नाही भरत माझं. आणि काही उत्तम कंपूबाज असू शकतात पण अनेक बाकरवड्या निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय? आणि तसंही मार्गदर्शन करणारा मी कोण? मी कुठलीही संकेतस्थळे काढलेली नाहीत. मी आय एस पी नाही. मी कुठेही सर्वर अॅडमिनिस्ट्रेटर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे संकेतस्थळ चालन या विषयात माझा उपयोग नाही.
प्रत्येक प्रकारचं बंड करण्याचा एक योग्य तो मार्ग असतो. मराठी संकेतस्थळ चालनाच्या बाबतीत तो मार्ग आधी योग्य ती कंपूबाजी आणि मग ड्रुपॅल, गमभन वगैरे पायर्यांवरून जातो.
कंपूबाजी ही कुठल्या ना कुठल्या पातळीवर गरजेचीच असते. मग ते संपादक-कंपू, संपादक-विरोधी-कंपू, म्हातारे कंपू, तरुणांचा कंपू असं काही असू शकतं किंवा याच कंपूंशी संलग्न असे ब्लॉग्ज असू शकतात किंवा नीलकांत, शशांक अश्यांच्या ड्रुपॅल शिकवणार्या संस्था असू शकतात किंवा तात्या नावाची एक संस्थेवत व्यक्ती असू शकते किंवा मग व्यक्तिचित्रण, अनुभवकथन करत करत आपला कंपू बनवणे असू शकते. काही असले तरी +१ लिहिण्याला पर्याय नाहीच. हे सहमतीचे प्रतिसाद नुसतं "शिकवलं ते गिरवलं" स्वरूपाचे असून चालत नाही. आधी भरपूर सहमती, अगदी कंटाळा येईतो "बाडीस" आणि मग आपल्या बुद्धीने +१ ते +२० अशी तिरपी तिरपी भर घालत जाणं हे महत्वाचं असतं. वर यादी केलेल्या प्रत्येक कंपूंमधे अशा सहमतीच्या प्रतिसादांचं चांगलंच प्रशिक्षण दिलं जातं. पण तरी प्रत्येक कंपूंमधून आलेल्या सदस्यांच्यात उत्तम "टार्या" असतात तसेच बाकरवड्याही असतातच की. जे काहीच घेत नाहीत, त्यांच्या आत काहीच पोचत नाही, झिरपत नाही. अर्थात असं असलं तरी कंपूबाजीचं प्रशिक्षण आणि त्यासाठी मेहनत हे गरजेचंच.
यानंतर मुद्दा येतो लेखनाचा. लेखन बघूनच तुम्हाला कंपूत बोलवायचं का नाही हा विचार केला जातो. यात अपमानास्पद वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही मराठी संकेतस्थळ माध्यमात काम करू बघत असता तेव्हा तुमचं लेखनंही महत्वाचं असतंच. चांगलं वाईट, सुंदर कुरूप यापेक्षा तुमचं लेखन आणि तुमचे प्रतिसाद त्या कंपूच्या सदस्यांच्या व्यक्तिरेखेला अनुरूप असणं नसणं हे महत्वाचं असतं. लेखन आणि प्रतिसाद हेच संकेतस्थळ चालकांचं साधन किंवा माध्यम असल्यामुळे ते नीट राखणं, व्यसनांनी, चुकीच्या सवयींनी विरोधी कंपूंना +१ प्रतिसाद देऊन स्वतःची वाट न लावून घेणं हे संकेतस्थळ चालकासाठी महत्वाचं असतं. आणि मग त्या काढून टाकलेल्या लेखनाचे स्क्रीनशॉट्स काढून घेणं हे पण महत्वाचंच.
अनेक नवीन संकेतस्थळ सदस्य वेगवेगळ्या ब्राउझरमधे, वेगवेगळ्या फाँट साईझमधे स्क्रीनशॉट्स काढून घेत असतात. पण तुम्ही नवीन सदस्य आहात, तुमचे लेखन फारसा माहीत नाहीये आणि तुम्ही अमुक फाँट तमुक ब्राउझर करत उत्तम संगणकावर भरपूर स्क्रीनशॉट्स काढून घेतलेत तर ते स्क्रीनशॉट्स म्हणून उत्तम होतीलच यात काही वाद नाही. पण ते तुमचं लेखन, तुमचे प्रतिसाद यांची ओळख करून द्यायला उणे पडायला नको हे महत्वाचे.
आता हे स्क्रीनशॉट्स काढून घरी ठेवून द्यायचे नाहीत. मराठी संकेतस्थळावरील कंपूबाजीच्या संधी शोधण्यासाठी त्या संकेतस्थळ चालकांना खरडी करून ते स्क्रीनशॉट्स देऊन स्वतःचे नाव खरडीत टाकायचे. ते स्क्रीनशॉट्स संकेतस्थळांच्या मुखपृष्ठांवर लागतात. विविध ठिकाणी सदस्य फोडण्याच्या वेळी हे स्क्रीनशॉट्स बघून कंपूत प्रवेशासाठी बोलावलं जातं.
कवितांमधे रस असेल तर वेगवेगळ्या कवितांची विडंबनं करत रहायचं. गझल, वृत्तबद्ध आणि मुक्तछंद अश्या पातळ्या यात येतात. पहिल्या दोन पातळ्यांवर काम करत असताना तुमच्यातल्या शब्दनिवडीची मेहनत करायच्या क्षमतेचा कस लागतो. छंदबद्ध कवितेच्या विडंबनाची संधी मिळाली तर छंदशास्त्राचाही कस लागतो. मुक्तछंदामधे वृत्ताच्या फिकिरीवर न राहूनही अर्थ सांभाळणे आणि सगळ्या परिस्थितींमधेही उत्तम विडंबन देणे याची सवय होऊन जाते.
तात्याच्या संकेतस्थळावर तात्या काही ठराविक प्रतिसाद साधे सरळ पाठ करून लिहायला सांगतात. त्यातल्या एका प्रतिसादात असतं 'आज हिंदुस्थानका हर बूढा संकेतस्थळ बनाना चाहता है. --------- संकेतस्थळ बनानेके लिये ग्लेनफिडिच चाहीये.. ----- संकेतस्थळ बनानेके लिये कंपूबाजी करनी पडती है. --- नीलकांतका होना भी बहोत जरूरी है --- गमभन, ड्रुपॅलकी भी जरूरत पडती है.... ' अश्या तर्हेचा हा पानभर प्रतिसाद घोकत तात्यांनी सांगितल्याप्रमाणे अपशब्द मोजत, तारतम्य ढळू न देता सगळे लिहीत असतात. अधून मधून तात्या "बा*वला भां*द" असे मस्त ओरडत असतात. गमभन आणि ड्रुपॅलचं त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊन प्रतिसादांचे, कंपूबाजीचे वळसे देत असतात. त्यातून तावून सुलाखून, आयडी ब्लॉक न होता बाहेर पडलेला हळूहळू या संकेतस्थळ चालनाच्या धंद्यात स्थिरावतोच.
+१ प्रतिसाद आणि कंपूबाजी विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही व्यनी करून संधी मागत रहातात. व्यनी करायचा त्याला आधी उगाचच मोठेपण आणि मग व्हिलनपण देऊन...
याद्या
9250
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
हा हा
स्क्रीनशॉट
समयोचित लेख.
अरेच्चा!
भूत
In reply to अरेच्चा! by विसोबा खेचर
पॅरडीड इन
-१
In reply to पॅरडीड इन by विंजिनेर
प्रणाम
हा लेख
मला ही
In reply to हा लेख by विसोबा खेचर
ह्या लेखात
In reply to हा लेख by विसोबा खेचर
+ १ सहमत आहे!
In reply to ह्या लेखात by रेवती
ऐश कर
In reply to + १ सहमत आहे! by चतुरंग
घाबरु नकोस मिभो, लेख अप्रकाशित करत नाहीये!
In reply to ऐश कर by मिसळभोक्ता
हाहाहा ..
In reply to घाबरु नकोस मिभो, लेख अप्रकाशित करत नाहीये! by चतुरंग
एखाद्याला
In reply to ह्या लेखात by रेवती
उत्तम!
लेखातच उल्लेख आहे
In reply to उत्तम! by प्रमोद देव
भेटण्याच्
In reply to लेखातच उल्लेख आहे by मिसळभोक्ता
अतिशय
अरेरे
टिंग्याशी
In reply to अरेरे by ब्रिटिश टिंग्या
हॅ हॅ हॅ
In reply to टिंग्याशी by ३_१४ विक्षिप्त अदिती
जहबहरा
!!!!
:)
हा हा हा
हा.हा.हा...
मस्त!!!
झकास !!
चामारी
हॅ हॅ हॅ
In reply to चामारी by विनायक प्रभू
मस्तच!
दंडवत
अमेरिका का बुढ्ढा भी
प्रतिसाद आवडला
In reply to अमेरिका का बुढ्ढा भी by प्रियाली
हल्ली ?
In reply to अमेरिका का बुढ्ढा भी by प्रियाली
विडंबन
ब-याच
सर्कीटशी
In reply to ब-याच by सर्कीट
मजेदार
आंतर'बाह्य
In reply to मजेदार by अक्षय पुर्णपात्रे
जय हो..
वाटायला लागतं?
हॅहॅहॅ
बरेच टोमणे-खास करून कंपूबाजीबद्दलचे-डोक्यावरून गेले
जबरी.