Skip to main content

प्रकटन

इवलेसे रोप लावियले द्वारी...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 18/05/2010 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मायबाप मिपाकरहो, 'इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी...' हे असं झालंय बघा मिसळपावचं. मला आठवतंय, तीन वर्षापूर्वी मी आणि नीलकांतने या संकेतस्थळाच्या उभारणीस प्रारंभ केला. तेव्हा आम्ही दोघे आणि आमचे काही हितचिंतक एवढेच लोक होतो. नीलकांत तेव्हा उमेदवारीच्या दिवसांत होता. स्वतःचा संगणकही नाही अशी त्याची अवस्था. त्या काळात या मुलाने अक्षरशः नेट कॅफेत बसून या संस्थळाच्या उभारणीचे काम केले. यशस्विरीत्या संस्थळ चालू झाले. 'लोग मिलते गये कांरवा बनता गया' अशी मिपाची वाढ उत्तरोत्तर होत गेली.

सचिनचं ट्विटर वरून कर्करोगपीडीत मुलांना मदतीचं आवाहन

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 17/05/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याच आवाहनानंतर सचिनच्या आवाहनास प्रतिसाद देऊन त्याच्या चाहत्यांनी ६७ लाख रुपये जमा केले आहेत. Indiacancer.org या पूर्वी टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्‍या आणि सध्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल मध्ये असलेल्या डॉ. जगन्नाथ यांनी चालवलेल्या संस्थळाच्या माध्यमातून ही मदत जमा होत आहे.

धनाची पेटी.... ?

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 17/05/2010 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
धनाची पेटी.... ? `धवल क्रांती' हा शब्द जिथे रूढ झाला, त्या गुजरातेच्या शेजारी, पंजाब, हरियाणामध्ये एक भीषण सामाजिक समस्या केव्हापासून थैमान घालते आहे. ती दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सामाजिक भान असलेल्या संघटना कधीपासून अक्षरश: झगडताहेत. पण होतेय उलटेच. या समस्येचे हातपाय देशभर पसरतायत. यातून एक भयावह भविष्य रुजते आहे, याची जाणीवही सगळ्यांना आहे. या समस्येवर पुरेशी जनजागृती झाली नाही, असेही नाही. कदाचित, ही समस्या इथे कधीतरी डोके वर काढणार, याची चाहूल आपल्या पूर्वजांनाही कित्येक वर्षांपूर्वी लागली असावी, म्हणूनच, तेव्हापासूनच या समस्येच्या जाणीव जागृतीला सुरुवात झाल्याचे पुरावे सापडतात.

ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २

लेखक नीधप यांनी रविवार, 16/05/2010 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला. त्याबद्दल मिसळपाववर बोलायचं काय प्रयोजन असं वाटेल अनेकांना. मिसळपाववर लिहिणार्‍यांपैकी बरेचसे लोक नियमित ब्लॉगर्स आहेत. उत्तमोत्तम लिखाण ते सगळे आपल्या ब्लॉगवर करत असतातच. तसेच ब्लॉग लिखाणासंदर्भातले बरेचसे मुद्दे हे मायबोलीवरच्या लिखाणांनाही लागू होतात. मराठी ब्लॉग जगत या अस्तित्वाला मायबोली, मिसळपाव किंवा तत्सम साइटसवरचे लिखाण हे जगही जोडलेलेच आहे.

बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद...

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 16/05/2010 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
बडे दिनो के बाद हम बेवतनों को याद वतन की मिट्टी आयी है, चिठ्ठी आयी है अमेरिकेत आलो त्याला बरीच वर्षं झाली. नशीबाची गोष्ट म्हणजे एकाच वर्गातल्या आम्हा तिघांना एकाच युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे ती खूपच सोय झाली. आम्ही तिघे एक अपार्टमेंट घेऊन राह्यलो. एकगठ्ठा तिघं जण एकत्र असल्यामुळे साहजिकच पहिल्या थॅंक्सगिव्हिंगला इतर जनता गावोगावहून आमच्या घरी जमली. परत एकदा मोठ्ठा ओळखीचा ग्रुप जमत होता. ग्रॅड स्टुडंट असल्यामुळे बजेटं तशी मर्यादितच होती. पण दुकानात दारू खरेदी करायला गेलो तेव्हा आमच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आंद्रे शॅंपेन - बाटलीची किंमत केवळ दोन डॉलर‍! मिळाली.

मलंग आणि माणुसकी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 15/05/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा आयुष्यात फार गमतीशीर प्रसंग घडतात. पण त्या त्या वेळेस तुम्ही त्या प्रसंगातील अनोखेपण अनुभवू शकालच ह्याची काहीच हमी नसते. आपले आधीचे पूर्वग्रह किंवा समज बदलून टाकायला एखादी घटनाच पुरेशी असते. असाच एक प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबाने अनुभवला. त्याचीच ही कहाणी. माझे आई-वडील फार ''देव-देव'' करणाऱ्यातले नाहीत. जगात ईश्वर आहे, तो सगळीकडे आहे आणि त्याला आपण मानतो अशी त्यांची विचारसरणी. त्यात कोणत्याही प्रथा परंपरांचे अवडंबर नाही. स्वधर्माचा अभिमान आहे पण इतर धर्मांविषयीही यथायोग्य आत्मीयता.