Skip to main content

प्रकटन

चेतन भगतला अनावृत्त पत्र

लेखक विनायक पाचलग यांनी रविवार, 09/05/2010 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे , ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती... याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता, त्यावर तुमचे मत जाणुन घ्यायला मी उत्सुक आहे , म्हणुन हाच लेख आज इथे देत आहे..

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

कसाबला अखेर फाशी

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 06/05/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी कसाब याला न्यायालयाने दोशी ठरवत फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. त्याला वरील न्यायालयात अपील करु न देता लागलीच शिक्षेची अंबलबजावणी करावी . या हल्ल्यात शहीद झालेल्याना खर्‍या अर्थाने आता न्याय मिळेल असे वाटते. अमोल -------------------------------------------------------------------------------

स्त्रीची आजची प्रतिमा - ३

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 06/05/2010 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी, म्हणजे शाळकरी वयात, एके दिवशी एक हिरव्या मुखपृष्ठाचे पुस्तक हातात पडले. वाचायला सुरूवात केली... झपाटल्यासारखे पूर्ण वाचूनच खाली ठेवले. पुस्तक होते, 'अफगाण डायरी'... लेखिका प्रतिभा रानडे. वर्तमानपत्र वाचायची सवय असल्यामुळे त्याआधीही अफगाणिस्तान आणि तिथे चाललेली गडबड वगैरे नियमाने वाचत होतोच. एकंदरीतच या प्रामुख्याने पठाणांच्या देशाबद्दल कुतूहल होतेच. 'अफगाण डायरी' मधून तिथल्या समाजजीवनाचे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे समाजमनाचे अगदी उत्तम दर्शन घडले होतेच. खासकरून तिथल्या स्त्रियांच्या जीवनाबद्दलवगैरे बरेचसे संदर्भ त्या पुस्तकात होते.

मनातले थोडेसे..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 05/05/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
९ मे २०१०. खूप मोठा दिवस. का?? नेमके काय आणि कोणत्या शब्दांत सांगावे समजत नाही. स्वप्नं असतात म्हणून जगण्याला दिशा असते असं म्हंटलं चुकीचं ठरू नये. कधी स्वप्नं खरी होतात, तर कधी घडून गेलेलं काहीतरी, हे आपलं स्वप्नं होतं का असा विचार आपण करू लागतो. आज मागे वळून पाहताना असा विचार येतो की, ४ वर्षापूर्वी मी कोण होते? पुणे आकाशवाणीच्या मराठी चॅनेल ची निवेदिका होते. कार्यक्रमाची संहिता लिहिताना खरडलेल्या चार ओळी, कधी एखादी कविता, आणि त्या अनुषंगाने येणारं निवेदन.. साहित्यिक लेखानाचा इतकाच काय तो संबंध! आणि आज माझ्या नावावर एक कविता संग्रह प्रकाशित होतो आहे.

माझी व लाखों-करोडोंची लाईफलाईन......

लेखक भानस यांनी बुधवार, 05/05/2010 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
तिला प्रथम कधी बरं पाहिलं होतं मी...... आई सांगते त्यानुसार जेमतेम वर्षाची असेन. दादर ते अंधेरी हा नेहमीचा प्रवास. मामा अंधेरीला राहायचा नं. तेव्हांपासून ती माझी व मी तिची झालेली. गेल्या जन्माचे माहीत नाही पण या जन्माचे ऋणानुबंध नक्कीच होते. आम्ही ठाण्याला शिफ्ट होऊन दोन-तीनच महिने झाले होते. स्कूटर स्टॅंडला लावतानाच ८.५३ आज तिनावर येतेय हे ऐकताच मी नवऱ्याला टाटा करून पळत सुटले. ब्रिजवरून उतरतानाच लोकल आलीही त्यामुळे रोजचा डबा सोडाच पण पुढचा फस्टही गाठणे केवळ अशक्य असल्याने समोरच असलेला महिलांचा सेकंडचा डबा चटदिशी पकडला. दहा सेकंदाच्या चलबिचलीमुळे इतके जीव खाऊन धावूनही माझी गाडी सुटणार होती.

घडलेल.....

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 04/05/2010 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत राहायचो आम्ही. महाराष्ट्रीयन. अस्सल कोल्हापुरी! तरुण होतो. अंगात खोन्डाची रग. हो बायकांना सुद्धा रग असते. धनी MNC मध्ये होते. ऑफिस मधली आमच्या सारखी सारी खोंड मिळून एक सुंदर ग्रुप तयार झाला होता.सगळे असायचे. गुजराती , बिहारी, पंजाबी , सर्डू (सरदारजी). मी कोल्हापुरी म्हणून माझी जाम खेचली जायची, पण मस्तीत !! मी ही मस्तीत काय तोंडाला येईल ते फेकायची. माग घ्यायची (बाहेर) सवयच नव्हती . तेंव्हा मुंबई जवळची जवळ जवळ सारी ठिकाण आम्ही ट्रेक करून पालथी घालायचो. पेठ किल्ला जसा मी बघितलाय तसा आणि कुणी पहिला असेल की नाही माहिती नाही.तसाच नाणे घाट!

मै ऐसा क्यूं हूं?

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 03/05/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून घरात पुस्तकंच पुस्तकं असायची. त्यामुळे मला वाचनाची मुद्दाम सवय लावावी वगैरे लागली नाही कुणाला. मला अगदी लहानपणचं जे आठवतंय त्यापैकी एक असं... रात्रीची वेळ. सगळे जेवायला बसले आहेत. आणि मी काही तरी पुस्तक वाचतो आहे. आई जेवायला बोलवून बोलवून थकली आहे आणि शेवटी आता वाचन पुरे म्हणून एक धपाटा घालून जेवायला नेलं मला. :) बरं पुस्तकं खूप म्हणजे किती असावीत? अक्षरशः घरात माणसांच्या अगदी बरोबरीने पुस्तकांची दाटी असावी. घरात आजोबा, आजी, आई, बाबा, दोन काका, एक आत्या, ताई आणी सगळ्यात लहान मी. एवढी माणसं. प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं.

आपलाआपला इतिहास...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 01/05/2010 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा मंगल कलश आला, त्याला आज ५० वर्षे झाली. महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला... व्यक्तीच्या आयुष्यात, ५० वर्षांचा काळ लोटला, की त्याच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा घ्यायची योग्य वेळ आली, असे समजतात. पन्नाशी उलटली, की आपण कुठे होतो, कुठे आलो, आणि कुठे पोहोचायचे याचे चिंतन आपोआपच सुरू होते. मागे वळून पाहिले जाते, आणि आपण स्वत:सोबत जोडल्या गेलेल्या भूतकाळाचे पदर उलगडू लागतो... ह्या आठवणीची साठवण, हा आपला `इतिहास' असतो... ... प्रत्येकाच्याच वाटणीला त्याचात्याचा इतिहास आलेला असतो...

दंतविहीनांचे दाताळ अनुभव

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 01/05/2010 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
(खालील लेख मी बर्‍याच महिन्यांपूर्वी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आज मिपाकरांसाठी इथे देत आहे. प्रस्तुत लेखात कोणाची खिल्ली, थट्टा उडवण्याचा मानस नसून आयुष्यातील एका अटळ सत्याकडे विनोदी चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न केला आहे! :D ) आयुष्यात मला आजवर तोंडाचे बोळके असणाऱ्या माणसांविषयी कौतुक वाटत आले आहे. किती छान दिसतात ते! परंतु मला त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसताना पाहून कोणालाही ही गोष्ट खरी वाटत नाही त्याला काय करावे?