विण
लेखनप्रकार
कुठे आहेस?
आज भेटतोस का?
घरी नको.
पण नक्की भेट.
तुझ्याकडे काय आहे?
शिवास चालेल.
आज लुढके पर्यंत पिणार आहे.
घरी पोचवायची जबाबदारी तुझी.
Am I crashing?
may be.
meet me and find out.
You are the crash specialist.
बायकोला सांगुन येतोय.
तुझ्याबरोबर असलो तर तीला काळजी नसते.
आधीच्या क्रॅशेस मधे तुच संभाळले आहेस हे तीला माहीत आहे.
.........................................................................................
जवळ जवळ एक वर्षाने भेटतोयस रे.
गेली ३० वर्षाची आपली मैत्री.
अगदी बिनओझ्याची.
कधी जास्त न भेटता मैत्रीची घट्ट विण.
शेवटी तु म्हणाला होतास तेच खरे झाले.
बायको अक्षरशः कोसळलीय.
दाखवत नाही.
पण विझलेले डोळे सर्व काही सांगताहेत.
हे असे का होते?
तु म्हणाला होतास,
मुलाच्या १०व्या वाढदिवसाला.
"सोड हे 'माझा, आपले,.
तस काही नसते"
अगदी खरे बोलला होतास तु.
पण हे असे का?
नेमके काय चुकले आमच्या दोघांचे?
तु नीट तपास केला होतास.
काही"अॅक्सीडेंट" ची व इतर शक्यता पण तपासुन बघीतली होतीस तु.
तसे काहीच नव्हते.
उत्तर कधीच मिळाले नाही.
तो असा का हे आजपर्यंत कळले नाही.
घरात कायम घुम्यासारखा.
बाहेर मात्र जोवियल.
तु सांगितल्या प्रमाणे अगदी लहानपणापासुन जवळ घेउन नाते विणायचा प्रयत्न केला.
पण तेवढ्यापुरताच फरक. परत परिस्थीती तशीच.
एकूलत्या एक मुलाच्या प्रेमाला कायम तरसलो बघ आम्ही दोघे.
माझे सोड.
पण तीला पण प्रेम मिळाले नाही.
आमचे काय चुकले ते कधीच त्याने सांगितले नाही.
इतक्या वेळा विचारले.
फक्त खांदे उडवुन उत्तर टाळतो.
ठीक आहे.
निदान डोळ्यासमोर तरी होता.
मुंबईच्या कॉलेज ची अॅड्मिशन सोडुन तो गोव्याला गेला तेंव्हाच तु म्हणाला होतास,
give him the desired space.
पण एवढ्या मोठ्या पगाराची मुंबईतील नोकरी सोडुन एक साध्या कंपनीत नोकरी ती सुद्धा जमशेदपुरला?
फक्त आमच्यापासुन दुर जाण्याकरता.
माझे काही नाही रे.
मी कामधंद्यात स्वतः ला गुंतवीन.
बायकोचे काय करु?
Some dysfunctions have no answers असे तु म्हणतोयस ते पटायचे कसे?
हे असे का रे?
हा एवढा पैसा, इस्टेट काय कामाची रे?
त्याला नको आहे ती.
येशील घरी?
तीला समजावशील.
तीला ह्यातुन बाहेर काढायला तु सांगशिल ते करेन.
तु असा प्रश्नार्थक चेहेरा करु नकोस?
काय करु ते सांग?
.........................................................................................
?????????????????
वाचने
4011
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
पैसा आणि
काय मास्तर ?
In reply to काय मास्तर ? by रामदास
भुईसुरुंग
मास्तर ,
In reply to मास्तर , by टारझन
होय
मास्तर
मास्तर,
हि गोष्ट
In reply to हि गोष्ट by शिल्पा ब
चाल लावली
आधीचा
मस्त चेंडू...
गेट अ लाईफ
मास्तर क्रिप्टीक सोडेल असे कधी वाटलेच नाही.
क्रिप्टिक
लेख मलातरी
In reply to लेख मलातरी by बिपिन कार्यकर्ते
काय कळलं नाही
In reply to काय कळलं नाही by नितिन थत्ते
कमाल
मास्तर
चालु द्या
अजून एक टेंगूळ!