छोट्या जाहिराती.
डिस्क्लेमर : हा धागा काढण्यामागचा उद्देश कुणाच्याही भावना दुखवाव्यात असा नाही. त्यातून , कुणाला तसे (अकारण) वाटल्यास त्या सर्वांची आधीच घाऊक माफी मागत आहे.
एका वृत्तपत्रात अलिकडे वाचलेल्या छोट्या जाहिराती :
१. पाहिजे : पूर्वी सारखी टिकणारी मेंदी. रंग दोन दिवसांत जाऊन विचित्र दिसायला नको. पक्का हवा.
२. पाहिजे : पडल्यापडल्या झोप लागेल असा पलंग. झोप येईल अशी खोली. खोलीत जाऊन झोपावेसे वाटेल असे घर. घरात राहावेसे वाटेल अशी जीवनशैली. शैली परवडेल असे जीवन.
३. पाहिजे : श्री. पांडुरंग पंढरपूरकर यांच्याशी एकदा तरी भेट घडवून आणून देईल असा एजंट.
मिसळपाव