नातं
काही दिवसापूर्वी विलेपार्ले को.ब्रा. कट्ट्याच्या वार्षीक संमेलनात नातं ह्या विषयावर एक छोटासा प्रोग्रॅम केला. 'नातं' ह्या विषयाचा विविध अंगांनी विचार करून एक छोटासा कार्यक्रम सादर करायचा होता. माझ्याच काही नव्या जुन्या कविता मिळून साधारण १५ मिनिटांचं काव्य वाचन केलं. त्यातल्या काही कविता वगळून बाकिचं लिखाण इथे देतो आहे.
-----
नातं हा फार अजब प्रकार आहे. अजब अशासाठी की मानलं तर नातं नाही तर निव्वळ ओळख. रक्ताची माणसं सोडली तर बाकीची सगळी नाती जोडलेली असतात. नातं कुणाशीही असू शकतं. पावसाशी, मातीशी, अगदी जुन्या डायरीशीही. आज आम्ही अशीच काही वेगळी नाती बघणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने.
मिसळपाव
ढोल- ताशे वाजु लागले आणि फोटो काढत असताना देखील माझे पाय ताल धरु लागले...
गाडीत विराजमान होउन आलेले बाप्पा...