काळ नावाचं औषध......
लेख पुर्वी अन्यत्र प्रकाशित
-----------------------
लोक म्हणतात काळ हे सगळ्यात प्रभावी औषध आहे. जात्या काळाबरोबर सगळ्याच जखमा हळूहळू भरून येतात म्हणे. होतं का बुवा खरंच असं?
११-१२ वर्षापुर्वीची गोष्ट, माझी एक मैत्रिण होती आणि ते म्हणतात ना कोणाच्या तरी प्रभावाखाली येणं तसं माझं झालं होतं. I was much too impressed with her!...तशा बाकीच्या पण मैत्रिणी झाल्या होत्या पण ही माझी खूपच आवडती मैत्रिण होती. आणि ती माझ्या बाकीच्या कुठल्याच मैत्रिणींना आवडायची नाही.
मिसळपाव
हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!
कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!
पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..
थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :)
दहीभात कधीही खावा..
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..