Skip to main content

प्रकटन

माझिया प्रियाला प्रीत कळेना

लेखक michmadhura यांनी शनिवार, 25/06/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी नी माझी भेट ही क्षणोक्षणी का आठवे आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे सांगु कशा मी, तुल सख्या रे माझ्या ह्या भावना माझिया प्रियाला प्रीत कळेना! खरं सांगु तर हे गाणं तीने खास त्याच्यासाठीच म्हंटलं असणार. दोन अगदी वेगळ्या स्वभावाची माणसं लग्न होऊन एकत्र आली ना की हेच म्हणावं लागतं ना! आता हेच बघा ना! ती अगदी हळवी, इमोशनल आणि तो एकदम प्रॅक्टिकल आणि रो़खठोक. ती तिच्याच सुंदर स्वप्नवत जगात जगणारी आणि तो मात्र त्याचं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणारा. अगदी टिपीकल दाखवण्याचा कार्यक्रम होउन ठरलेले लग्न.पहिल्याच नजरेत तिला तो खूप आवडला. लग्न ठरलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावत नव्हता.

तुका जातो वैकुंठाला

लेखक यकु यांनी शनिवार, 25/06/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
न कळत्या वयात प्रभातचा संत तुकाराम पाहिला होता - खूप रडलोही होतो. अगदी काल-पर्वा युट्य़ूबवर संत तुकाराम चित्रपटातील दोन क्लिप्स पुन्हा एकदा पाहाण्यात आल्या. त्या उतरवूनदेखील घेतल्या. या चित्रपटातील तुकोबाची भूमिका विष्णुपंत पागनिसांची (पु.लं. च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका मधली पेस्तनकांकाची "अरे साला काय ऎक्टिंग, तुला सांगतो साला ओरिजिनल तुकारामबी असा नसेल, ते विस्नुपंत आता वैकुंटमदी असेल, सिटिंग नेक्स्ट टू दी गॉड..." ही दाद आठवते का?). विष्णुपंत पागनीसांनी केलेल्या तुकारामाच्या या भूमिकेने त्या काळात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते.

नियतीचा खेळ

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 24/06/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"डॉक्टर, नेमकं काय झालंय हो? मला तर काहीच सुचत नाही आहे. पंधरा दिवसांपूर्वीच्या रविवारपर्यंतपर्यंत हे असं काहीच नव्हतं हो! त्यादिवशी रात्रीच तर आम्ही ट्रेकिंगहून परतलो. गेल्या तीन वर्षांत या माणसाला कधी गप्प म्हणून बसलेलं पाहिलेलं नाही. अगदी उत्साहाचा धबधबाच जणू. सतत काही ना काही सुरूच असायचं. मित्रांच्या गराड्यात तर नेहमीच. येवढं करून एक पैशाचं व्यसन नाही. दारू नाही, विडीकाडी नाही, अगदी सुपारीच्या खांडाचंही नाही. कुठल्या कुठल्याशा गोष्टीत भयानक रस घेऊन अगदी जीव तोडून ती गोष्ट समजून घेणार, आत्मसात करणार असा स्वभाव.

कथा एका यशोगाथेची - लघुकथा - जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी सोमवार, 20/06/2011 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला नेहमी पासूनच खूप खूप मोठं होण्याची इच्छा होती, पहिले त्यानी धंद्यात धडपड करून बघितली, पण जमलं नाही. मग काव्य, साहित्यात खटपट करून बघितली, पण त्याच्या मुक्तछंदाना कोणी काव्य म्हणेना, आणि यमकाला ही दाद मिळेना. स्वतः शिवाय कधी दुसरा विचारच केला नसल्या मुळे कथेचा ही विषय सुचेना. मग राजकारणात हातपाय चालवून बघितले आंदोलन, धरणे, उपोषण वगैरे भानगडी त्याला कधी पटल्याच नाहीत, त्याला स्वतःलाच प्रस्थापित व्हायचे होते. प्रस्थापितांशी लढण्यात त्याला आपली शक्ती घालवायची नव्हती. क्रांती झालीच तर ती त्याच्या जीवनात व्हायला हवी होती, उगाच लष्कराच्या भाक-या भाजण्याचा त्याच पिंड नव्हता.

चांदया म्हशीची गोष्ट

लेखक धन्या यांनी रविवार, 19/06/2011 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कसा काय मंडली. सगला ठीक हाय ना. मंग हारकत नाय. मी पन बरा हाय. काय? मना नाय वलकलाव. मी दिप्या. धन्याचा शालेतला आनी आक्रावी बारावीचा दोस्त. मी आज तुमाला धन्याच्या चांदया म्हशीची गोष्ट सांगनार हाय. आता तुमी म्हनाल म्हशीची काय गोष्ट आसनार. पन हाय. कारन ही गोष्ट फकस्त म्हशीची नाय. ही गोष्ट जशी धन्याच्या चांदया म्हशीची हाय तशीच ती धन्यासारखा बॉरखांडयात म्हशी राकनारा पॉरगा आमेरिकन येनाराय कसा झाला त्याजीपन हाय. आता उगंच हिकडचा तिकडचा सांगत नाय. येकदम गोष्टीला सुर्वात करतो. धन्याचं बाबा गोरेगावच्या गरम पंचायतीत कामाला व्हतं. गोरेगांव आम्च्या गावाजवलचा म्हॉटा शेर. बाजारपेट हाय तितं. सगला मिलतो.

दमलेला बाबा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/06/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रत्येक घराच्या दारात एक दमलेला बाबा आपल्या चिमण्यांची वाट पाहतांना दिसून येतो. घरच्या होममिनिस्टर त्यांच्याच तोऱ्यात असतात. त्या अन् त्यांचं ऑफिस यातच गुरफटलेल्या असतात. त्यांचं करिअर इतकं मोठ्ठं की सर्व भार बाबाच्या खांद्यावर येऊन तो धापाच टाकीत राहतो. वाणसामान, दुधबील, लाईटबील असे किरकोळ खर्च बाईसाहेबांच्या पेमेंट मधून तर फ्लॅटचा हप्ता, गाडीचा इ.एम्.आय. असे आकडे बाबाच्या खात्यातून परस्पर परागंदा होण्याची तरतूद बाबाने स्वीकारलेली असते. आणि मग तरीही त्याला वाढदिवसाची साडी, दिवाळीचा रत्नहार, मकरसंक्रांतीचा नेकलेस अशाची जुळवाजुळव आपल्याच खात्यातून करण्याची गोडगुलाबी सक्ती केली जाते.

मो(गा) बाईल अर्थात प्रेमळ बायको

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 18/06/2011 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
काहीही लिहीले तरी क्रिप्टीक म्हणायची स्टाइल आहे म्हणुन शिर्षकातच खुलासा. "हा मोबाइल चार्ज झालाच नाही" बटन दाबलेत का? बटन दाबल्याशिवाय तो चार्ज कसा होइल? कधी जाणार तुमचा धांदरट्पणा? मो(गा) बाइल "असु दे हां" आता बसा चरफडत.मो(गा)बाइल "बॅट्री जुनी आहे. चार्ज व्हायला कमीत कमी एक तास. ऑफिस मधे तसे विषेश काही नाही. पण एक तास काय करु?" सहा महीने सांगतेय. बॅट्री बदला म्हणुन. उगाच चार्जींग मधे वेळ का घालवायचा माणसाने? मो(गा)बाइल) "आजच बदलतो. पण आता वेळ कसा घालवु." मनाचे श्लोक म्हणा. आणि जरा महागाची खरेदी करा. वर्षभर तरी यायला पाहीजे.मो(गा)बाइल. "त्या पेक्षा असे करु या का? मी बेल बंद करतो.

***काळाराम मंदिर / श्री स्वामी समर्थ *** गिरगाव भटकंती.१

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 16/06/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
१) आत्माराम बुवांची समाधी (काळाराम मंदीर -गिरगाव) २) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव) ३) श्री दत्तात्रय (काळाराम म