Skip to main content

प्रकटन

असेच काही उदासवाणे .....

लेखक अनघा आपटे यांनी मंगळवार, 30/10/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसला जाताना रस्त्यात एक सिग्नल लागतो, तिथे हमखास दोनतीन गरीब मुले-मुली तुमच्या गाडीपाशी येतात. हातात एक फडकं असतं, काही न बोलता गाडीची समोरची काच पुसू लागतात, जो पर्यंत तुम्ही पर्समधून पैसे काढत नाही तोपर्यंतच मात्र ...अर्थात सिग्नल ही काही सेकंदाचाच असतो. मी दर वेळी २ रु. हाती ठेवते, विचार करते किमान काम करून पैसे मिळवावेत एवढं समजलं आहे हे ही नसे थोडके. या वर माझी चेष्टा करणारी माणसे माझ्या आसपास असतातच. ज्या समाज व्यवस्थेचा आपण भाग आहोत तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आहे की ते कोणी एका दोघांच्याने दूर होणे शक्य नाही.

मराठी गुलामगिरी

लेखक पोप्य्लोन यांनी सोमवार, 29/10/2012 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
आता मराठी माणसांना गुलामगिरी शिवाय पर्यायच नाही . कारण आता मराठी मुले एजिनिअर आणि डाक्टर सुद्धा बनणार नाहित . देशात एकच परीक्षा असणार आहे , उत्तर भारतीय मुले सार्वजनिक कॉपी करुन महाराष्ट च्या उत्तम कॉलेजात प्रवेश मिलवितिल आणि आपल्या मुलांसाठी फक्त कारकूनाच्या नोकरया असतील . सीबीएसई अभ्यासक्रम हा उत्तर भारतीयांसाठीच बनविला गेलेला आहे . तसेच हिंदी मधून सुद्धा परीक्षा देता येते .

त्याची डिटॅचमेंट

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 29/10/2012 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरार्ध काही दिवसांपूर्वी "अटॅचमेंटमधली वेदना आणि डिटॅचमेंटमधला आनंद" याबद्दल झालेली चर्चा या छोट्याशा स्फूटाला कारणीभूत ठरली. ---------------------------------------------------------------------------- प्रिय, निसर्गाचा सगळा प्रवास डिटॅचमेंटकडे सुरू असतो, नाही का? वाळलेली पानं, फळलेला मोहोर, निगुतीने बांधलेली घरटी, मोठी झालेली पिल्लं, बरसून रिकामे झालेले ढग, कशातही गुंतून राहत नाही तो. आणि तरी सतत नव्याने प्रसन्न दिसत राहतो. 'समर्पयामि' हे माणसाला म्हणावं लागतं. तर कधी 'पुरे झालं आता' असं बजावायला लागतं.

उद्रेक भीषण स्फोटाचा

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
उद्रेक भीषण स्फोटाचा (१६-जुल-२०११) -- पण भावनांचा कधी होणार मुंबई अमुची पुन्हा हादरली ? (प्रत्येकाच्या मनात आज हा प्रश्न नसून उद्गार बनले आहेत). प्रत्येक मुंबईकराच्या मनात हा प्रश्न आणि त्याच नेहमीच 'टिपीकल' उत्तर, आता 'कॉमन' होऊ लागलं आहे. आता हें 'कॉमन' का होत चाललंय? हें तुमच्या सारख्या सुज्ञास सांगायची गरज नको. मुंबईकर खरोखरच निगरगट्ट, कोरडे, कोडगे होत चालले आहेत का ? त्यांच्या भावना मृत चालल्या किंवा मेल्या आहेत का ? स्फोट झाला ? कुठे? कधी? कसा ?, असा आहे का, ठीक आहे. मुंबई पुन्हा लागली आपल्या कामावर दुसऱ्या दिवशी !

बाप्पा मोरया रे

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीन हो माथा....(असली गाणी ऐकायला मिळाली की समजावं बाप्पा येतोय हो लवकरच) गणेश चतुर्थी जवळ आली की सर्व वातावरण कसं आनंदाने भरून जातं. सगळीकडे ही लगबग सुरु होते पहा. मग सर्वांना मनापासून म्हणावसं वाटत, "आला पहा माझा तो श्री गणेशा, सा-यांचा तारणहार तूच प्रथमेशा; चाहूल लागली तुझी गजवदना, लगबग झाली सुरु तुझ्या रे स्वागता". (सौजन्य: "आमोद - एक आनंद कल्लोळ", के डी.) मग मखरापासून सुरुवात ते अगदी सजावटीतल्या एखाद्या डोंगराच्या शिखरापर्यंत, नुसता आनंदाचा कल्लोळ माजतो, हें पाहून सुखद वाटत. देवासाठी काय करू अन काय काय करू, असं सर्व गृहिणींना वाटत.

लोकल पारायण

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवसाला देव पावतो तसं अक्षरशः आजकाल देवा पाव रे आणि मला ती अमुक लोकल वेळेवर मिळू दे रे बाबा. मुळात लोकलमध्ये चढलो म्हणजे तू पावलास नाहीतर तुझी अवकृपा का रे देवा !, असं काहीसा झालय माणसांच इथल्या. मुंबई, चाकरमान्यांची राजधानी म्हणावी. जो लोंढा येतो तो इथेच. अरे अरे कुठे चाललास रे ! कुठे म्हणजे काय मम्बयीला रे. का हो कहा जात हो, अरे गुड बख्त बम्बई नाही मालूम का, हम उहा जात हे . सर्रास हे आजकाल कानी पडतं, वृत्तपत्रात वाचायला मिळतं, टी.व्ही वर पाहायला मिळतं.

जसपाल भट्टीना भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी गुरुवार, 25/10/2012 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
f सामान्य माणसाना अवघड आणि चिड आणणारा विषय विनोदी अंगाने सांगणारा महान परफोर्मर. विनम्र श्रद्धांजली.

चावडीवरच्या गप्पा – ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 24/10/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या. “अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत. “अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका. “नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय? खी खी खी...”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली. “हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी!

ऐलोमा पैलोमा गणेश देवा.

लेखक अनघा आपटे यांनी मंगळवार, 23/10/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
ऐलोमा पैलोमा गणेश देवा. परवा गाडीत माझी आई, आणि माझा अडीच वर्षाचा भाचा होता. बरोबरचे भरपूर समान बाजूच्या सीटवर ठेवून त्या दोघांना मागे बसू दिले. थोड्या वेळाने गडी गाऊ लागला. आधी शाळेत शिकवलेल्या "पोएम्स" झाल्या. मग गाडी घसरली "शिवाजी अमुचा राणा" वर . हे ऐकून मी चकित. पूर्ण गाणे त्याला म्हणता येत होते. मधेच अडले तर शेजारी आजी होतीच. त्याला विचारले "कोणी शिकवले तुला हे?" "माज्या आईला येतं हे गाणं, तिला खूप खूप गाणी येतात." "हुशारच आहे तुझी आई. अजून काय शिकवले तुझ्या आईने?" "जिलेबीचे गाणे, कारल्याचे गाणे, लाडूचे गाणे आणि शिवाजीचे" (आम्ही सारे खवय्ये!

नवरात्र उत्सव २०१२ (टेंभी नाका) ठाणे.

लेखक मदनबाण यांनी रविवार, 21/10/2012 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी. :) काल ठाण्याच्या टेंभी नाका स्थित देवीचे दर्शन घेउन आलो. :) या वेळी मदुराईच्या मिनाक्षी मंदीराची ७० फुट उंच प्रतिकॄती साकारण्यात आली आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीचा ओघ आणि बाहेर खरेदीचा भरलेला बाजार पहायला मिळाला.एव्हढ्या गर्दीत फोटो कसे काढायला मिळतील असा विचार मनात डोकावुन गेला,पण संधी मिळाली.