Skip to main content

प्रकटन

एकमात्र

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 06/12/2013 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गम घाटातील अरुंद वाटा, कठीण चढ अन खडकाळ जमिनी वरून तोल सांभाळत चालतांना जनावरे दमुन जात, सर्वांगातून घामाच्या धारा लागत, अतिश्रमाने जनावरांचे तोंड फेसाळून येई, जनावर अतिशय गलितगात्र होऊन जाई. भूताच्या फे-यावर पोहोचल्या वर मी मी म्हणणा-या निधडया छातीच्या गाडीवानांच्या काळजातही धस्स झाल्याशिवाय रहायचे नाही. घाटातील ह्या दोन वळणात उंचच उंच कड्याकपारीं अन खोल खोल द-या खो-यातून घोंगावणारे वारे, घनदाट झाडीतील पानांची सळसळ, दूरवर कोसळत असलेल्या धबधब्याचा आवाज ह्या सगळ्यांनी अनेक स्पंदने निर्माण होत. अशी स्पंदने आणि छाया प्रकाशाचा खेळ भूताच्या फे-यात जरा जास्तीच गूढरम्य विभ्रम निर्माण करीत असे.

अधुरि एक कहानी भाग-४

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी शुक्रवार, 06/12/2013 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने पक्याला आपल्या कॉलेज साठी गाव सोडावे लागले.त्यापूर्वी ती आणि पक्या एकदाच भेटले होते,हां पण दोघांच्याही कुटुंबासोबत...पण पक्या जवळ इतके धैर्य नव्हते की तो मनातील तिला बोलू शकेल.तिलाही माहीत होते की याच्या मनात काय आहे आणि यालाही माहीत होते की तिच्या मनात काय आहे !पण कुणी मात्र बोलायला तयार नव्हते. काळ त्याच्या वेगाने पुढे सरकत गेला.गाव सोडल्यावर पक्या चे कशात मन लागेना.सारखी तिची अबोल प्रीत त्याला खूणावत् असे.२ वर्षाच्या गॅप नंतर दोघे ही त्याच शहरात पुन्हा एकदा भेटले.तिचे कुटुंब ही आता तिथेच आले होते राहायला.पक्याला आणि तिलाही बरे वाटले.पण मनातील कुणीच काही बोलेना.अबोल प्रेम तसेच सुर

अधुरि इक कहानी भाग-३

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी शुक्रवार, 06/12/2013 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणता म्हणता दिवस जाऊ लागले आणि मग पक्याला हवी ती संधी मिळाली....तिच्या घरी जायची ! संक्रांतीचा तिळ-गुळ द्यायला तेव्हा सगळी मुले-मुली १४जानेवरीच्या सायन्काळी परिचितांच्या आणि गावातील सगल्या शिक्षकांच्या घरी ही जात.पक्याच्या घरीही येत सगळी मुले-मुली.आणि या पेक्षा उत्तम कारण पक्या ला कुठले मिळणार होते? झाले पक्याची सकाळपासूनच तयारी सुरू होती.कुठला ड्रेस आज घालायचा यावर १० वेळा विचार करून झाला होता.केस ही अगदी तेल लावून चोपून कोंबडा बनवून बसवून घेतले होते ठीक ठाक.

अधुरी एक कहानी- भाग-२

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी शुक्रवार, 06/12/2013 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
पक्या आपल्ल्या कथेचा नायक,तसा १० वीला होता यंदा.वर्गातील नव्हे तर शाळेतील एक हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेला होता.आणि का असु नये,अहो शिक्षकाच्या घरात जन्माला आलेले २ रे रत्न होते ते.अगदी सरळ रेषेत जीवन जगणे त्याने लहानपनात शिकून घेतले होते.छोट्याश्या गावात शिक्षकाला खूप आदराने पहिले जाते.साहजिकच पक्याला ही लहानपणीच याची जाणीव पदोपदी होत राहिली आणि मग सरळ रेषेत जीवन जगणे काय असते,याचे चपखल उदाहरण बनून गेला आपला पक्या!त्यामुळे आपल्याला मिळणारा मान हा आपला नसून आपल्या तीर्थरूपानमुळे आहे हे त्याला नेहमी लक्षात ठेवावे लागे. त्यामुळे बालपण कसे अगदी शिस्तीत गेलेले.

महामानवाचं महानिर्वाण

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 06/12/2013 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपिता श्री. नेल्सन मॅन्डेला यांचं निधन झालं.... परमेश्वर मृतात्म्यास सद्गती देवो.... नेल्सन मॅन्डेला यांची महानता मी वर्णन करावी इतकी माझी योग्यता नाही याची मला पुरेपूर जाणीव आहे.... आणि नेल्सन मॅन्डेला यांची योग्यता ठाऊक नाही असा कुणी सुशिक्षित मनुष्यही भेटणं कठीण आहे... आणि जर खरंच कुणी तसा असेल तर त्याच्यासाठी विकिपिडिया आहेच!!!! आमच्या पिढीला गांधी, नेहरू, पटेल बघायला मिळाले नाहीत. आमचं दुर्दैव, दुसरं काय!!! आमचे नेते म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी आणि श्री.

अधुरी इक कहानी....

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी बुधवार, 04/12/2013 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आधुरी एक कहाणी अचानक येनारी वळवाची सर जशी आसमंतात एक अनमिक थांडवा देऊन जाते काहीशी तशीच अनुभूती, तिचे पहिले वाहीले दर्शन त्याला देऊन गेली!भाणावर आला त्यावेळी कळले की तो शाळेच्या मैदानावर आहे आणि त्याचे वर्गमित्र त्याला बोलावत होते.कुठल्याही १६-१७ वर्षाच्या किशोर्वयीन मुलाचे व्हावे तसेच झाले त्याचे पण !मन कुठेच रमेना...कुणाला विचारू ते कळेना.......पण विचारू काय तेही सुचेना !तसाच घरी आला,पण रात्रभरसारखे तीचेच रूप डोळ्यासमोर!डोळे उद्या पुन्हा तिला बघायला आसुसलेले! ती दुपारी दिसली होती म्हणजे हे नक्की होते की तिची आणि त्याची भेटी नक्कीच दुपारी होईल!पण राहून राहून त्याला इक प्रश्न सारखा सतावत होता

सिंटॅक्स- मिपावरील शब्द

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 03/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट) चानचान (छानछान) जौदे बै (जाउ दे बाई) चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब) जिलब्या (लेख) पिंक (प्रतिक्रिया) हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट) ह्घ्या (हलके घ्या) या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.

<नवविवाहिताचे बाबांस पत्र>

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 03/12/2013 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे) प्रिय बाबा, प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे.

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 02/12/2013 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय? काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. ! नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा. देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर! सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच ! असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी.

आमचे अग्निहोत्र !!!

लेखक विदेशी वचाळ यांनी शनिवार, 30/11/2013 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल गॅस लाच लाइटर असतो ते बरे आहे बुआ. काही दिवसांपूर्वी गॅस चा लाइटर सापडला नाही म्हणून शेजारणीने "सुमे जा ग जरा माझा लाइटर घेऊन ये पर्स मधून" असे फर्मावल्याचे आठवते. त्या पुर्वी, शेजारच्या, निर्मला ताई, त्या एकदा म्हणाल्या होत्या, अरे जरे जरा बाबांचा लाइटर घेऊन म्हणून. त्याचा आधीच्या सगूणा बाई "शिंदळीची काडेपेटी कुठे गेली काही कळत नाय!. ए पोर्‍या बापाची काडेपेटी आणा रे" असे म्हणाल्याचे ऐकिवात आहे. पण त्याचा पूर्वीच्या बायका आग कशी लावत असत बरे? म्हणजे स्वयंपाक करताना हो! (बाकी आग लावायाच्या पद्धती बदलल्या नसाव्यात असे वाटते.