Skip to main content

प्रकटन

हे आणि ते - १: पाहुणचार

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 26/12/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एक गंमतीदार अनुभव आला. माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे. मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो.

मुलुंड कट्टा… केल्याने पंडितमैत्री !!!

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी बुधवार, 25/12/2013 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा.

त्रास

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 24/12/2013 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात माझ्या मुलीचा वाढदिवस होता.म्हणून आम्ही मुलुंडलाच एका चिनी आणि थाय खाद्यसेवा देणारया हॉटेलात जायचे ठरविले होते.मुळात मधलाच वार असल्याने हॉटेलात गर्दी नसेल म्हणून आम्ही जायचे ठरविले होते.माझा दवाखाना साडेआठला बंद होतो. त्यादिवशी आठ पंचवीसला कोणी रुग्ण नाही म्हणून मी माझ्या स्वागत सहाय्यीकेला दवाखाना बंद करायला सांगून जिना उतरत होतो. आता शांतपणे हॉटेलात बसून छानपैकी जेवूया या विचारत होतो. एवढ्यात एक तरुण जोडपे पंचविशीच्या आत बाहेर ( बायको पंचविशीच्या आत आणि नवरा पंचविशीच्या बाहेर) चिंताक्रांत चेहेर्याने समोरून येताना दिसले.

गारठा!

लेखक amit_m यांनी सोमवार, 23/12/2013 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
नको वाटणाऱ्या अलार्मच्या कर्कश्य आवाजाने त्याला जाग आली…तो उठून बसला…यांत्रिकपणे करायच्या पुढच्या सगळ्या हालचाली आता अंगवळणीच पडलेल्या. उत्तररात्रीच्या त्या अखेरच्या प्रहरात शुभ्र चांदणं पसरलेलं. "थंडी आहे रे खूप…असुदे" म्हणत आईनं बळेच दिलेल्या गोधडीकडे पाहताना त्याला लहानपणीचा गारवा आठवला. आई कधीचीच उठलेली आहे. स्वयंपाक घरातल्या पिवळट बल्बचा प्रकाश डोक्यावरून घेतलेल्या चादारीतूनही आत पाझरायचा. वडील बाहेरगावी जायचे असले कि त्यासाठी आईची लगबग चाललेली असायची. आपल्याला जाग येऊ नये म्हणून दबक्या चालीनच ती सगळी काम करायची.

<<<<<त्रैरंगात्मक त्रैमूर्ती: आणखी एक विचार>>>>

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 18/12/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या चाललेल्या वैचारिक धुळवडीनिमित्त आणखी एका त्रिगुणात्मक तत्वाचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी तीन आरत्यांचा नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ह्या तिन्ही रंगाच्या अंशावताराची हि दुनिया.

कामगार कट्टा एक अस्वस्थ करणारे वास्तव :

लेखक psajid यांनी मंगळवार, 17/12/2013 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ए.बी.पी. माझा वर एक मन सुन्न करणारी बातमी पाहिली. नांदेड लातूर या ठिकाणच्या कायम विना अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापक दुपारनंतर कुणी हॉटेलमध्ये वेटरचे कुणी शेतीमध्ये रोजगाराचे कुणी रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. ही बातमी पाहून मन हेलावून गेले. भारतामध्ये आज रोजगाराची फारच बिकट अवस्था निर्माण झाली आहे. आज कौटुंबिक जबाबदारी किंवा परिवाराचे पालनपोषण या साठी लोकांचा परीस्थीतिशी, महागाईशी अविरत असा न संपणारा झगडा सगळीकडे सुरु असल्याचे दिसून येईल. महाराष्ट्रामध्येही रोजगाराचे चित्र फार आशादायक नाही हे वरील उदाहरणावरून लक्षात येते.

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती : एक विचार

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 16/12/2013 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू. दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात.

मुंबई कट्टा

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 14/12/2013 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे. ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे.

आज ग. दि. मा यांचा स्मृती दिन

लेखक psajid यांनी शनिवार, 14/12/2013 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
ग. दि. मा यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये शेटफळे या गावी झाला. अभंग, भावगीत, बालगीत, लावणी, आरत्या, भूपाळी, अंगाई, समूहगीते, राष्ट्रगीते इत्यादी बरोबरच 'दो आंखे बारह हाथ', 'पेडगावचे शहाणे', 'जगाच्या पाठीवर' यासारखे दर्जेदार चित्रपट लिहणारे अद्वितीय शब्दप्रभू ! 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी', 'कानडा राजा पंढरीचा' या सारखे अभंग, 'नाच रे मोरा', 'गोरी गोरी पान' या सारखी बालगीते, 'जाळीमंधी पिकली करवंध', 'बुगडी माझी सांडली गं' यासारख्या लावण्या लिहणाऱ्या गदिमांनी 'जग हे बंदिशाळा' सारखे कटू सत्य जगापुढे मांडले.