नवा करार
परिस्थिती गंभीर होती
विद्रोहाच्या ज्वाळा भडकल्या होत्या
बंडखोरांच्या फौजा
वेशीवर येउन थडकल्या होत्या
आटपाट नगरातील राजघराणे
अंतीम घटका मोजत होते
पुनरुत्थानाच्या सर्व शक्यता
अखेरच्या ते शोधत होते
एक गट वेगळा निघाला
विद्रोह्यांना जाउन मिळाला
बंडखोरांच्या मदतीने
सत्तेवर प्रस्थापित झाला
बेदखल गटाने विजनवासात
प्रतिज्ञा बदल्याची केली
असंतुष्ट प्रजेच्या मदतीने
पुनश्च सत्ता काबीज केली
लढाई सतत सुरूच होती
आज विजयश्री ह्याची
उद्या सरशी त्याची
सत्ता डगले बदलत होती
रक्तपात नित्याचा झाला
प्रजा विटली संहाराला
ओळखून प्रजेच्या रोषाला
दोन्ही गट बसले वार्तेला
घमासान वाटाघाटीं नंतर
सर्वमान्य तोडगा नि
मिसळपाव