छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय
नमस्कार मंडळी,
आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील.
तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा.
मिसळपाव
फेब्रुवारी २०१३ मधील पंधरा सोळा तारिख असेल. रात्रीचे सात साडेसात झालेले. दुसऱ्या दिवशी विकली ऑफ असल्याने आज कुठल्याही परिस्थितीत साडेनऊपर्यंत कार्यालयाच्या बाहेर पडायचेच असे ठरवून संगणकासमोर नेहमीप्रमाणे तबला बडवणे सुरु झाले. (पत्रकारितेत की बोर्डला तबला म्हणतो आम्ही पत्रकार). हातावर बऱ्याच बातम्या असल्याने आज तरी ब्युरो चिफने ऐनवेळी नवी असाईनमेन्ट देऊ नये अशी मनोमन प्रार्थना करत होते.