चटपटीत चांगलचुंगलं खाण्याचा शौक होताच. मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात एक छोटीशी टपरी टाकली. आपल्याला धंद्याची काय येवढी पडलेली नाही. जनशेवा महत्वाची. म्हणून टपरीवर पोटाला सोसेल एवढेच खा असा संदेश देणारी कार्टून्स पण लावून ठेवली. धंदा कमी झाला तरी चालेल, पण निदान लोकांनी आपल्या मालाचे निदान कौतुक तरी करावे अशी माफक अपेक्षा होती. टपरीवर केळी, शेंगादाणे, असे हौसेने मांडून ठेवले. चटमटीत मिसळ होती. म्हटले चार लोक खाऊन नाही, तरी निदान वास घेऊन कौतुक करतील.
पण झाले भलतेच. टपरी उघडल्या उघडल्याच एक उनाड मुलांची टोळी समोर येऊन थडकली. म्हटले पाहुया, निदान काही घेतील. पण त्यांचा म्होरक्या एखाद्या दांडगट मुनिसिपल इंसपेक्टर सारखा समोर उभा राहून म्हणतो- “कच्चा माल लावलाय.” म्हटले, “नाही, कच्चा-पक्का सगळाच आहे. बघाना.” पण त्यां वांड पोरांना टपरीवरल्या मालाशी काहीच देणे घेणे नव्हते. त्याची आपापसातच भंकस सुरू होती.
मामू- कच्चा माल लावलाय.
बूड – होना मामू, बऱ्याच दिवसांनी दिसला. आता धमाल होऊन जाऊ दे.
मामू- अरे बुडक्या, आजकाल टपरीवर असे घट्ट पीठ दिसतंय कुठे! सगळेच पानचट घोळ! उचला रे हाताला यील ते. जिलब्या पाडू.
टकाट्या- “यस बॉस”
पोरांनी भराभरा हात मारले, अन काय मिळेल ते उचलून बाजूच्या रिकाम्या जागेवर चिवडत बसले.
टवाळ पोरांचा हुडदंग बघून टपरी रिकामीच पडली होती. ह्या गँगची मिसळगावात वट असणार! मग मी देखील पोरे काय गलाडा करताहेत बघत बसलो.
मामूने केळ्याच्या घडाचा घोटून लगदा केला, आणि चक्क एक माकडासारखा बाहुला तयार केला. तो एक डोळा मिचकावीत होता. डोळ्यावर भज्यांची भिंगे लावलेला मोडका चष्मा होता. मग काय, कंपूची फुल गजाली सुरू.
अरे बघ बघ हे बंदर फक्त बायकांकडेच पहात आहे.
बायकांकडे नाही रे, चोळ्यांकडे!
साल्या अचरटा, काय बघतोस रे? देऊ कां एक कानाखाली?
आयला! आज बाजारात कसला घमघमाट सुटलाय!
घमघमाट नाही मसरनड्या घामाघामाट आहे! वर बघ, केवढ तापलय!
तुमी साले सगले पिसाटले आहे.
ए, चलारे, ते काका काय म्हणतील!
टवाळ टोळीचा तो उद्योग मिसळगावातल्या निदान ५५० बघ्यांनी पाहिला. पण टोळी सोडून बाकी सगळ्यांचीच बोलती बंद होती. एखाद दुसरा बघ्या सहानुभूतीचा शब्द तोंडातल्या तोंडात उच्चारून माझ्याकडे ओझरती नजर टाकून तिथून निसटला.
मी उद्गारलो “ अरे हे काय चाललंय?
आणि हद्द बघा, माझी उध्वस्त झालेली टपरी २६७ लोकांनी नुसती पाहिली, अन न बोलताच सगळे तिथून खसकले. नंतर एक फाडूबाळ मोडक्या टपरीसमोर उभा राहून म्हणतो- “अरे ही काय भानगड आहे?”
मी (मनात) म्हटले “You ask me, I ask who?”
वाचने
5230
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
२६७ लोकांनी - २७२.
आता ठरवा या बाजारात राहुटी
झेपेल तेवढीच घ्यावी म्हणतो मी
+111
In reply to झेपेल तेवढीच घ्यावी म्हणतो मी by नाना स्कॉच
नानाची तंग मिशिंग पात्येलं :)
डिसक्वालिफाई झालात! :D
In reply to नानाची तंग मिशिंग पात्येलं :) by जव्हेरगंज
रूपक कथा आवडली.....
अगदी बरोब्बर.
In reply to रूपक कथा आवडली..... by मुक्त विहारि
अगदी बरोब्बर.
अगागा!
+१
In reply to अगागा! by पैसा
=))
:):)
ह्या गँगची मिसळगावात वट असणार
मनोहर पंत रागे भरण्याचे काय कारण ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टुटी-फ्रुटी हुं में... ;) :- Karachi Se Lahore Takआमच्या एका मित्राने "मनास
ओहो!
In reply to आमच्या एका मित्राने "मनास by अरुण मनोहर
+१
In reply to ओहो! by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टुटी-फ्रुटी हुं में... ;) :- Karachi Se Lahore Takनको.
In reply to ओहो! by पैसा
इथे जंगलराज आहे!
In reply to नको. by अरुण मनोहर
जातीवंत मिपाकर कधीच व्यक्तीगत
In reply to इथे जंगलराज आहे! by मुक्त विहारि
+१
In reply to जातीवंत मिपाकर कधीच व्यक्तीगत by द-बाहुबली
मिसळपाववरचे उनाड मुले शरीफच
आवडले
In reply to मिसळपाववरचे उनाड मुले शरीफच by विवेकपटाईत
फारच लागलंय की तुम्हाला......
फाडूबाळ यांचा ओडिट
आहे
थोडंसं स्पष्टीकरण,
पटले रे सूडक्या.
In reply to थोडंसं स्पष्टीकरण, by सूड
दमामिसाठीही इथेच!! तुझ्या
In reply to थोडंसं स्पष्टीकरण, by सूड
+१११११११११११११११११११११११११११
In reply to थोडंसं स्पष्टीकरण, by सूड