Skip to main content

प्रकटन

आक्षी!

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 09/11/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आक्षी! ती तुम्हाला वाटते ती आक्षी नव्हे!नको तेव्हा येणारी किंव्वा पाहिजे तेव्हा न येणारी! ती नव्हे, अलिबाग आणि नागाव या दोघांच्या मध्ये असलेलं छोटसं गाव म्हणजे आमचं 'आक्षी' एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर जशी खळी पडावी ना अगदी तशीच खाली म्हणजे वळणावरच्या रस्त्यावरचा - आक्षी चा स्तंभ, आणि त्याच वळणावर यायची ती सुंदर लाल-पिवळी साडी नेसलेली एसटी, सुंदरच ती! सौन्दर्य मनात असतं, बाह्यरूप किती ही कळकट्ट असलं तरी!

'आन्ना' वय वर्ष ४५

लेखक अज्ञात यांनी रविवार, 08/11/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
'आन्ना' वय वर्ष ४५ त्याला २मूलं एक मुलगी, मुलगी सर्वात मोठी, लग्न करून सासरी गेलेली. तीच्या लग्नाच्या दिवशी गेलेलो मी आठवतय काहीतरी तसं, त्यानंतर कधी पाहिलं नाही तीला कधी पाहिलं नाही, बाकीची २मुलं उनाड पण आन्नाला मदत करायची, आन्नाच्या सायकल मध्ये २पायपा मधून तंगडं फीरवीत ये जा चालू असायची धाकट्याची, आन्ना बाघावं तेव्हा कधी आंबे, नारळ, फणस काढायला झाडावर, शेण सारवायला गोठ्यात, सरपण गोळा करायला वाडीत, असाच दीसला...

शिक्षणाच्या आई चा घो !

लेखक मीउमेश यांनी बुधवार, 04/11/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मुलीच्या शाळेतून फोन आला. आमच्या चिऊताई च्या टिचर नी आम्हा उभयतांना शाळेत बोलावले होते. शनिवारी शाळेला सुटी होती तरी आम्हाला बोलावले. मी जरा आमच्या कन्ये बद्दल सांगतो, येत्या शुक्रवारी ३ वर्षाची होइल. सौभाग्यवती खूपच काळजी करू लागली. काय झालं असेल, मुलीने काही पराक्रम तर नाही केला शाळेत. ( पूर्वी एकदा असंच एकदा शाळेतून बोलावणं आलं होतं , आमच्या कन्येने टिचर च्या कानाखाली गणपती काढला होता … ती कहाणी नंतर कधी तरी ) दोन दिवस सौभाग्यवती नीट झोपली नाही. सारखी काळजी. एकदाचा तो दिवस उगवला. आम्ही शाळेत पोहोचलो.

असचं काहीतरी

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 03/11/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
पप्पूने इन्फ़िल्ड ला किक मारली ,नारायण पेठेतली एवढीशी गल्ली,इफील्डचे इंजिन रोंरावू लागले  मग फिल्मी स्टाईल ने पाय फिरवून पप्पू गाडीवर बसला, नेहमीप्रमाणे आपली सर्व समावेशक नजर अवतीभवती टाकली  रजनीकांत सारखा गोगल डोळ्यासमोर धरून त्यातल्या प्रतीबिम्बातून पाठीमागे काय चाललाय ते पाहिले, मग सर्र कन फिरवून डोळ्यावर चढवला, दारातून आत नजर  फेकली तर आजी काहीतरी बडबड करत धडपडत येतांना दिसली .  आजी काय म्हणतेय ते गाडीच्या फायरिंग मध्ये काहीच कळेना.मग चावी फिरवून इंजीन बंद केले.  "काय म्हणतेस, आजी .

टेडी (भाग-२)

लेखक एकजटा अघोरी यांनी सोमवार, 02/11/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
टेडी (भाग -१) टेडी (भाग-२) दुसर्‍या दिवशी वीणाला पहाटेच जाग आली. डोळे चुरचुरत असून देखील तिला नाईलाजाने उठावं लागलं. गळ्यात हात घालून झोपलेल्या दियाचा हात तिनं अलगद बाजूला ठेवला. स्वतःची आह्निके आटोपून झाल्यावर तिने लगेच पोळी भाजी करायला घेतली. दोन्ही तयार झाल्यावर डब्यात भरण्यापूर्वी निवायला म्हणून बाजूला उघडी ठेवली. दियाला उठवणं थोडं मुश्किलच होतं. पण “मी तुला भूर नेते” म्हटल्यावर ती लगेच उठून बसली.

एक पिल्लू: तिचं आणि आमचं....

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 01/11/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता.... ते सगळं कुटुंब अंदाजे पंधरा सोळा जण त्यांच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथे त्या निसर्गरम्य ठिकाणी काही माकडेही होती. एका उंचशा झाडावर एक माकडीण आपलं पिल्लू सांभाळत बसली होती.

राष्ट्रीय पुरस्कार आणि आम्ही

लेखक nasatiuthathev यांनी शनिवार, 31/10/2015 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक पाहून धागा जरी राजकारणाशी संबधित वाटत असला तरी तो नाही --------------------------------------------------------------------------------------------------------- काल ख्वाडा पाहिला , प्रदर्शनापूर्वीच काही चित्रपटांना खूप पुरस्कार मिळतात त्या पैकीच हा १ चित्रपट. तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्याचा सपाटाच लावलाय , माफ करा मी अजूनही राष्ट्रीय पुरस्काराचा विचार करतोय ..

मुंगी उडाली आकाशी...

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 29/10/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आठ दिवस ऑफिसात शीतयुद्ध सुरु आहे. एच्चारने बारीकसारीक खुसपटे काढून फतवे काढून मला पिडायचे आणि मी शक्य तितक्या विणम्रतेने फतव्यांची अंमलबजावणी करायची किंवा ऑफिशियल भाषेत आदबशीर उत्तरे द्यायची. आज तर हायला, कहरच झाला ! उन्हातून धावतपळत बस पकडून खुर्चीवर येऊन बसते न बसते तोवर टेबलावर प्रेमपत्र हजर ! ‘गेल्या आठवड्यात सहापैकी तीन दिवस तुम्ही किमान वीस मिनिटे लेट आलात अशा नोंदी थंब मशीनने दर्शित केल्या आहेत. याबाबत आपणास सूचना देणेत येते की इत;पर आपण कार्यालयात निर्धारित वेळेत हजर राहावे अन्यथा....’ इ.इ. कालच एच्चारवाल्याचे पाचवे लौलेटर वाचून डोके भंजाळलेले तोवर आज आणि हे ?