नस्त्या उचापती- 2
शनिवारचा दिवस.
संध्याकाळी मी नुकताच बाहेरुन आलो होतो. इतक्यात आईने- ताईचा फोन आल्याची बातमी दिली आणि त्याचबरोबर भाईंदरला जाऊन दोघा मुलांचा रिझल्ट आणण्याची आठवण पुन्हा करुन दिली. ऐकून जरा आनंद वाटला पण त्याचबरोबर थोडासा मुडही ऑफ झाला. आनंद यासाठी कि दोघांचा रिझल्ट एकाच दिवशी नव्हता. दोन वेगवेगळ्या दिवशी होता. म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीसला. कारण भाचा सिनिअरला होता, तर भाची ज्युनिअरला! साहजिकच मला दोन दिवस भाईंदरमध्ये राहावं लागणार होतं.
मिसळपाव
परिक्षा संपल्या, त्या परिक्षांचे निकाल लागले. सुट्ट्या सुरु झाल्या आणी संपल्या. लगेच संपल्या? हो... लगेच संपल्या. शाळेत SSC बोर्ड बदलून CBSE चे वारे वाहायला लागल्याने शाळा 4 एप्रिलला सुरुही झाल्या.
दोन्ही चिरंजीवांच्या शाळा सकाळी, त्यात धाकटा CBSE ला तर मोठा SSC बोर्डच्या 10 वीच्या वर्गात पदार्पण.